ठळक मुद्देशिवलेखाच्या आईची स्थिती नाजूक आहे

'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंग याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गत गुरुवारी रायपूरजवळच्या परिसरात त्यांची कार एक ट्रकला जाऊन धडकली. त्यावेळी शिवलेख आपल्या आई-वडिलांसोबत कारमध्ये होता. 


आजतकच्या रिपोर्टनुसार रायपूरचे पोलिस अधिक्षक आरिफ शेख यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी 3 च्या आसपास हा अपघात झाला. या अपघातात शिवलेखचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या आई-वडीलांना गंभीर दुखापत झाली आहे. शिवलेखाच्या आईची स्थिती नाजूक आहे.  


सिंग कुटुंबीय बिलासपूरवरून रायपूरला जात होते, त्यावेळी त्यांच्या कारसमोरुन येणाऱ्या ट्रकवर त्यांची गाडी जाऊऩ धडकली.  अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. पोलिसांची टीम तपासाला लागली आहे. शिवलेखच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की तो रायपूरला मीडिया इंटरव्हुसाठी जात होता.   


शिवलेख मुळाचा छत्तीसगढचा असून गेल्या 10 वर्षांपासून तो आई-वडिलांसोबत मुंबईत राहत होता. शिवलेखने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यात संकटमोचन सोनी टिव्हीवरील हनुमान, बालवीर, खिडकी आणि कलर्सवरील ससुराल सिमर का सारख्या मालिका सहभागी आहेत. तसेच तो झी-टिव्ही इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला होता. याशिवाय शिवलेखला स्वीमिंग, स्केटिंग, टेबल टेनिस आणि क्रिकेटची देखील आवड होती. 
 

English summary :
'Sasural Simar Ka' fame child actor shivalak singh died in a road accident. His car hit a truck on Thursday (18-07-2019) in the area near Raipur. shivalak singh was in the car with his parents.


Web Title: 14 years old tv child artist shivlekh singh dies in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.