देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:56 AM2019-04-03T11:56:11+5:302019-04-03T11:59:23+5:30

२०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला - सुशीलकुमार शिंदे

Work on changing the country's event started by the Narendra Modi government: Sushilkumar Shinde | देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

देशाची घटना बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू : सुशीलकुमार शिंदे

googlenewsNext
ठळक मुद्देअनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावाआता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे - राजन पाटीलआज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू - राजन पाटील

अनगर : २०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणले खरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. शेतकºयांना योग्य दाम सरकार देऊ शकले नाही. युवा वर्गाला सरकार नोकºया देऊ शकले नाही. घटना बदलण्याचे काम हे सरकार करत आहे. या थापेबाज सरकारने नोटाबंदी, पुलवामा या घटनेवर राजकारण करणारे हे सरकार हुकूमशाहीचे आहे. अशा सरकारला आपण निवडून देणार की, लोकशाहीला हे ठरवण्याची वेळ आज आलेली आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभेचे काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

अनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, आ.प्रणिती शिंदे, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा  पाटील, उमेश पाटील, मानाजी माने, महेश पवार, देवानंद गुंड, प्रकाश पाटील, विश्वासराव कचरे उपस्थित होते.

बाळराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दिलीप कोल्हे, चेतन नरोटे , जाफरताज पटेल, डॉ. कौशिक गायकवाड , शहाजहान शेख , ब्रह्मदेव भोसले , नागनाथ सोनवणे यांच्यासह राष्टÑवादी-काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीची गणिते बदलली : राजन पाटील
- आज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हाच आधार घेत निवडणुका लढल्या जात आहेत तर दुसºया बाजूला देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा तत्परतेने पुढे येऊन संकटाला दोन हात करीत देशाचा विकास केला. आता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे, असे राजन पाटील म्हणाले.

Web Title: Work on changing the country's event started by the Narendra Modi government: Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.