‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:06 IST2024-04-21T09:05:09+5:302024-04-21T09:06:11+5:30

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

'...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | ‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

अकलूज - प्रलोभने धुडकावून तालुक्याचा स्वाभिमान उंचावण्यासाठी शरद पवार गटाला पाठिंबा देणाऱ्या उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभेची उमेदवारी दिली जाईल. जर जानकर यांचा जातीचा दाखला रद्दच केला तर त्यांना विधान परिषदेवर घेतले जाईल, असे ठोस आश्वासन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

शुक्रवारी वेळापूर येथील मेळाव्यात पाटील यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

Web Title: '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance