रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 22:27 IST2025-07-27T22:24:33+5:302025-07-27T22:27:10+5:30
Solapur Madha Railway Accident: सोलापुरात रेल्वे रूळ ओलांडताना तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
सोलापुरातील माढा रेल्वे स्टेशनपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळ ओलांडताना एक्स्प्रेसच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. गोलघुमट एक्सप्रेस पंढरपूरहून सोलापूरकडे येत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात विजय कैय्यावाले आणि राहुल अशोक बेंजरपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, तिसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.