आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; निवडणूक प्रचारातून झाला संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 13:25 IST2021-04-07T11:05:01+5:302021-04-07T13:25:04+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; निवडणूक प्रचारातून झाला संसर्ग
सोलापूर : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे ते क्वारंटाईन झाले आहेत. संपर्कात आलेल्या सर्वानी कोरोना टेस्ट करावी तसेच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी सोशल मिडियातून संदेशाव्दारे केले आहे. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी मोहिते-पाटील पितापुत्रांवर होती. मात्र आता रणजितदादा क्वारंटाईन झाल्याने आता प्रचाराची धुरा विजयदादांवर आल्याचे सांगण्यात आले.
मागील काही दिवसांपासून रणजितसिंह मोहिते-पाटील हे पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते, दरम्यान रणजितदादा यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या, याशिवाय विविध बैठकांना उपस्थिती दर्शविली होती. निवडणूक प्रचारातूनच संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.