महाराष्ट्र बंदला सोलापुरात प्रतिसाद नाही; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 08:50 IST2021-10-11T08:48:13+5:302021-10-11T08:50:05+5:30

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व व्यापार यांची मोठी गर्दी.

Maharashtra Bandla Solapur has no response; Smooth public transport system | महाराष्ट्र बंदला सोलापुरात प्रतिसाद नाही; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत

महाराष्ट्र बंदला सोलापुरात प्रतिसाद नाही; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत

सोलापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारला आहे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बंद परिणामकारक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच सोलापुरात मात्र महाराष्ट्र बंदला सकाळच्या सत्रात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार हे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाजार समितीत शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. 

Web Title: Maharashtra Bandla Solapur has no response; Smooth public transport system