काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष

By Appasaheb.patil | Updated: April 30, 2024 12:24 IST2024-04-30T12:24:11+5:302024-04-30T12:24:47+5:30

या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते.

Madha Lok Sabha Constituency - Meeting of Prime Minister Narendra Modi | काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष

काठी, घोंगडं अन् पिवळा फेटा; पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या लुकने वेधले हजारो लोकांचे लक्ष

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस येथे सभा झाली. या सभेत हजारो लोकांचा जनसमुदायांनी एकच गर्दी केली होती. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन मंचावर प्रवेश करताच उपस्थित यांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, सोमवारी सोलापुरातील होम मैदानावर भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातीच माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस येथे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा झाली. या सभेला ५० हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे.

या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. या सभेला सोलापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील लोकांनीही गर्दी केली होती. मोदीच्या सभेसाठी हजारो पाेलिसांचा मोठा बंदोबस्त होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काठी, घोगडं अन् पिवळ्या फेट्याचे आकर्षण दिसून आले

Web Title: Madha Lok Sabha Constituency - Meeting of Prime Minister Narendra Modi