पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 12, 2024 05:48 PM2024-04-12T17:48:46+5:302024-04-12T17:54:13+5:30

दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

lok sabha election 2024 52 applications for Solapur and 64 for Madha were sold on the first day | पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, १२ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ३८ जणांनी ५२ अर्ज तर माढ्यासाठी ३६ लोकांनी उमेदवारी ६४ अर्ज घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

तसेच दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महास्वामी हे अक्कलकोट येथील रहिवासी असून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या अर्जात नमूद केली आहे. प्रत्यक्षात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. १९ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Web Title: lok sabha election 2024 52 applications for Solapur and 64 for Madha were sold on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.