Lok Sabha Election 2019 : परिचारक, विजयदादांनी घेतली गणपतरावांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:08 IST2019-04-03T12:05:18+5:302019-04-03T12:08:23+5:30

एकमेकांच्या प्रकृतीविषयी, जुन्या राजकीय आठवणींना उजाळा त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोंडीबाबत झाली चर्चा.

Lok Sabha Election 2019: Convener, Vijayadad took Ganapatrav's visit | Lok Sabha Election 2019 : परिचारक, विजयदादांनी घेतली गणपतरावांची भेट

Lok Sabha Election 2019 : परिचारक, विजयदादांनी घेतली गणपतरावांची भेट

ठळक मुद्देभेटीदरम्यान, परिचारक व आ. देशमुख या उभयतांमध्ये एकमेकांच्या प्रकृतीविषयी चर्चा झाली.जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आलाउभयतांमध्ये सुमारे अर्धा  तास राजकीय चर्चा झाली

सांगोला : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना मित्रपक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुसºयाच दिवशी सांगोल्यात येऊन खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, माजी आ. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील, रणजित निंबाळकर यांनी आ.गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

भेटीदरम्यान, परिचारक व आ. देशमुख या उभयतांमध्ये एकमेकांच्या प्रकृतीविषयी चर्चा झाली. नंतर जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देण्यात आला. उभयतांमध्ये सुमारे अर्धा  तास राजकीय चर्चा झाली, मात्र कोणत्या विषयावर चर्चा  झाली हे मात्र समजू शकले नाही. आ. देशमुख यांच्या भेटीमुळे तालुक्यात दिवसभर राजकीय चर्चा रंगली.

त्यानंतर या सर्वांनी सांगोला अर्बन बँकेत जाऊन बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, अध्यक्ष के. एस. माळी यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाºयांच्या भेटी घेतली़ झेडपी सदस्य अतुल पवार यांच्या कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Web Title: Lok Sabha Election 2019: Convener, Vijayadad took Ganapatrav's visit