कल्याणरावांनी विचारले, भाजपमध्ये जायचं का ? कार्यकर्त्यांनी हात उंचावून दिला प्रवेशासाठी होकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:26 IST2019-04-02T12:24:31+5:302019-04-02T12:26:36+5:30
श्रीराम मंगल कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

कल्याणरावांनी विचारले, भाजपमध्ये जायचं का ? कार्यकर्त्यांनी हात उंचावून दिला प्रवेशासाठी होकार
पंढरपूर : सर्व कार्यकर्ते व पदाधिकाºयांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे बोलण्यास उभारले़ त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जायचे का? असा सवाल उपस्थित करताच सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून ‘हो’ असा होकार दिला.
येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी कल्याणराव काळे यांनी गत आठवडाभरात झालेल्या घटना-घडामोडी कार्यकर्त्यांना सांगताना म्हणाले, २५ मार्च रोजी अचानक मुख्यमंत्र्यांचा फोन आला, चेअरमन भेटायला या, त्यानंतर त्यांची मुंबईत भेट घेतली. भाजप प्रवेशाला काही अडचण आहे का? असा सवाल करून अडचणीत आलेल्या संस्थांना मदत तसेच शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवितो, असे सांगून आज आपल्याशी चर्चा केली. त्यामुळे लवकरच वाडीकुरोली येथे मेळावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे कल्याणराव काळे यांनी जाहीर केले.
यावेळी नारायण मोरे, राजेंद्र शिंदे, महादेव देठे, समाधान काळे, गणेश ठिगळे, नागेश फाटे, दिनकर चव्हाण, सुधाकर कवडे, डॉ. सुधीर शिनगारे, विश्रांती भुसनर यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.