आधी पाण्याची सोय करा, नंतर मतांचं बघू; पांडे गणातील नागरिक भडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:19 PM2019-04-08T12:19:31+5:302019-04-08T12:24:48+5:30

प्रत्येक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी, जनावरांना चारा,पाणी व हाताला काम या गोष्टी येत्या आठ दिवसात केल्या तरच आम्ही मतदान करण्याचा विचार करु, असा निर्धार पं. स. सदस्य अ‍ॅड. राहुल सुभाष सावंत यांनी व्यक्त केला. 

First serve water, then look at the opinions; Pandey started filling the villagers | आधी पाण्याची सोय करा, नंतर मतांचं बघू; पांडे गणातील नागरिक भडकले 

आधी पाण्याची सोय करा, नंतर मतांचं बघू; पांडे गणातील नागरिक भडकले 

googlenewsNext
ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. तालुक्यातील जनता पिण्यासाठी पाणी मागत आहे - वालचंद रोडगेआम्हाला कोण उभे आहे माहीत नाही, कोणाला मतदान करायचे हेही माहीत नाही - विठ्ठलराव रासकरआमच्या जनावरांची चाºयाची व पाण्याची सोय करा, आमच्या हाताला काम द्या - प्रशांत बागल

करमाळा : अगोदर पिण्याच्या पाण्याची सोय करा, जनावरांना चारा व पाणी द्या, हाताला काम द्या, मगच मताचे काय ते बोला असा संतप्त सवाल पं. स. सदस्य अ‍ॅड. राहुल सावंत यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पांडे गणातील मतदारांनी केला.

प्रत्येक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी, जनावरांना चारा,पाणी व हाताला काम या गोष्टी येत्या आठ दिवसात केल्या तरच आम्ही मतदान करण्याचा विचार करु, असा निर्धार पं. स. सदस्य व करमाळा तालुका हमाल पंचायत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल सुभाष सावंत यांनी व्यक्त केला. 

अ‍ॅड. राहुल सावंत म्हणाले की, करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. तालुक्यातील जनता पिण्यासाठी पाणी मागत आहे. जनावरांना चारा व पाणी मागत आहे. तर हाताला काम द्या म्हणून आम्हाला सांगत आहेत. असे असताना आम्ही याबाबत जिल्हाधिकाºयांकडे वारंवार निवेदने दिली. तरी पण त्यांचा उपयोग झाला नाही.

पांडे गणात हिवरवाडी, पोथरे, देवीचामाळ, बीटरगाव, पांडे, धायखिंडी, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, निलज, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव, पाडळी, घारगाव, वाघाची वाडी, बोरगाव, दिलमेश्वर आदी गावे येत असून या गावामध्ये मतदान करणाºयांची संख्या २१ हजार असून, सध्या या भागात एखादा दुसरा टँकर सुरु आहे. 

आम्हाला कोण उभे आहे माहीत नाही, कोणाला मतदान करायचे हेही माहीत नाही, काय म्हणून मतदान करावयाचे असाही प्रश्न आमच्यासमोर आहे, आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा. आमच्या जनावरांची चाºयाची व पाण्याची सोय करा, आमच्या हाताला काम द्या, मगच आम्ही मतदान करायचे की नाही ते ठरवू, असा  इशारा बाजार समितीचे संचालक वालचंद रोडगे, माजी संचालक विठ्ठलराव रासकर, प्रशांत बागल मांगी, भागवत वाघमोडे, धायखिंडी, बापू बेंद्रे यांच्यासह आदी शेतकºयांनी विचारला आहे.  

Web Title: First serve water, then look at the opinions; Pandey started filling the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.