माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच! विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांची माहिती

By राकेश कदम | Updated: March 27, 2024 13:01 IST2024-03-27T12:59:55+5:302024-03-27T13:01:01+5:30

माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबीयांनी विरोध केला होता.

Dhairyasheel Mohite Patil will contest from Madha says Jay Singh brother of Vijay Singh Mohite Patil | माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच! विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांची माहिती

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच! विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांची माहिती

राकेश कदम, सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अकलूजमध्ये केला.

माढ्याचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबीयांनी विरोध केला होता. भाजपा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर आले होते. मोहिते पाटील आणि परिचारक यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा झाली. या दरम्यान शिवरत्न बंगल्यावर जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हजर होते. जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांची संवाद साधला. जयसिंह म्हणाले, राजकारणात काही निर्णय घेताना वाट बघावी लागते. माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही. केवळ माढाच नाही तर बारामती सोलापूर मतदारसंघातून ही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत माण, करमाळा, माढा विधानसभा मतदारसंघात ही भाजपाला यश मिळणार नाही. दरम्यान जयसिंह आणि मोहिते पाटील कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लवकरच प्रवेश करतील असे संकेत दिले.

Web Title: Dhairyasheel Mohite Patil will contest from Madha says Jay Singh brother of Vijay Singh Mohite Patil