अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

By राकेश कदम | Published: April 19, 2024 01:44 PM2024-04-19T13:44:49+5:302024-04-19T13:46:08+5:30

माढा लाेकसभा, शरद पवारांसाेबतच्या बैठकीनंतर निर्णय.

aniket deshmukh's rebellion cools down another rift in the politics of mhada lok sabha was soon resolved | अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

राकेश कदम, साेलापूर : माढा लाेकसभेच्या राजकारणातील आणखी तिढा लवकर सुटला. शेतकरी कामगार पक्षाचे सांगाेल्यातील नेते अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंडावले आहे. देशमुखांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारात सहभागी हाेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, माळशिरसमधील अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांचा आज शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीत पवार गटात प्रवेश हाेत आहे. 

माढ्याचा उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आराेप करून अनिकेत देशमुखांनी बंडाचे संकेत दिले हाेते. धैर्यशील माेहिते-पाटील, दीपक पवार यांनी गुरुवारी रात्री पुण्यात देशमुखांची शरद पवार यांच्याशी भेट घालून दिली. या भेटीनंतर देशमुख म्हणाले, आमच्या मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा झालेली नव्हती. आमच्या संस्था, भविष्यातील राजकारण यावर चर्चा झालेली नव्हती. पवारांच्या भेटीत या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली. त्यामुळे आम्ही माेहिते-पाटील यांच्यासाेबत जाण्याचा निर्णय घेतला. 

जानकरांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न-

उत्तम जानकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप नेत्यांचे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न् सुरू हाेते. भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, भाजप नेते नितीन गडकरी आणि जानकर यांच्यात चर्चाही झाली. जानकर राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करण्यावर ठाम हाेते. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जानकरांचा शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश हाेणार आहे.

Web Title: aniket deshmukh's rebellion cools down another rift in the politics of mhada lok sabha was soon resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.