Viral Video: घरात घुसला बिबट्या, पण महिलेने त्यालाच बांधून टाकलं; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:11 IST2025-09-30T12:10:20+5:302025-09-30T12:11:07+5:30
Udaipur Leopard Viral News: राजस्थान येथील उदयपूरमध्ये एका महिलेने घरात घुसलेल्या बिबट्याला चक्क दोरीने बांधून टाकल्याचा प्रकार समोर आला.

Viral Video: घरात घुसला बिबट्या, पण महिलेने त्यालाच बांधून टाकलं; व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
राजस्थान येथील उदयपूरमध्ये एका महिलेने घरात घुसलेल्या बिबट्याला चक्क दोरीने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित महिलेच्या धाडसाचे नेटकरी कौतुक करत आहेत.
बिबट्याला पाहून अनेकजण आपला रस्ता बदलतात, पण या घटनेत घरात उपस्थित असलेल्या महिलेने जे धाडस दाखवले, ते पाहून सगळेच चकित झाले. बिबट्याला अशा प्रकारे पकडून ठेवणे, हे खूपच असामान्य आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
उदयपुर में घर में तेंदुआ घुसा। पत्नी ने रस्सी से बाँध दिया।
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) September 29, 2025
सोचिए… जब तेंदुए की ये हालत की है, तो पति की क्या करती होगी!
😜😜😜😜😜 pic.twitter.com/3BqM1Ye6CI
हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, "उदयपूरमधील एका घरात एक बिबट्या घुसला; पत्नीने त्याला दोरीने बांधले." यासोबतच गंमत म्हणून असेही लिहिले आहे की, "जर बिबट्याची अशी अवस्था आहे, मग पतीचे काय होत असेल, विचार करा."
हा व्हिडिओ २४,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि नेटिझन्सकडून यावर गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, "भारतीय पत्नीचा नाद करायचा नाही." तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "पत्नी बिबट्यापेक्षा कमी असते का?" या घटनेचे नेमके ठिकाण आणि वेळ याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी, घरातील महिलेच्या या धाडसामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.