Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:38 IST2025-07-01T16:38:16+5:302025-07-01T16:38:59+5:30

Indore Golden House Viral Video: महागड्या कार्स, भव्य दिव्य सजावट... सारंच डोळे दिपावणारं आहे!

viral-video-indore-golden-house-switch-to-wash-basin-24-carat-gold-vintage-cars | Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

Indore Golden House Viral Video: इंदूरमधील एका आलिशान बंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील बंगला पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की, या घरातील फर्निचरपासून ते वॉश बेसिन आणि अगदी इलेक्ट्रिकल सॉकेट्सपर्यंत सर्व काही २४ कॅरेट सोन्याचे बनलेले आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. १ जुलैला २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,५०० रुपये आहे. अशा महागाईच्या युगात हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याची तुफान चर्चा रंगली आहे.

कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी इंस्टाग्रामवर या घराची भव्यता दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. फक्त दोनच दिवसांत या व्हिडीओला २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये बंगल्याचा मालक असे म्हणताना दिसतो की, त्याच्या घरात खरेखुरे २४ कॅरेट सोने वापरले गेले आहे.

आलिशान बंगला, व्हिंटेज कार्स, सोन्याचे सॉकेट्स

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला, कंटेंट क्रिएटर घरमालकाकडून बंगल्यात प्रवेश करण्याची परवानगी मागताना दिसतो. यानंतर, त्याची पहिली नजर घरात पार्क केलेल्या आलिशान गाड्यांवर जाते. त्यामध्ये १९३६ची विंटेज मर्सिडीज देखील आहे. या गाड्यांची किंमत खूपच जास्त आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आत गेल्यानंतर, १० बेडरूम असलेल्या या आलिशान बंगल्याचे दृश्य पाहून कंटेट क्रिएटर देखील थक्क होतो. यानंतर तो आश्चर्याने म्हणतो, मला खूप सोनं दिसत आहे. यावर घराचा मालक अभिमानाने म्हणतो की, हे खरे २४ कॅरेट सोने आहे. वॉश बेसिनपासून ते स्विचेसपर्यंत सर्व काही सोन्याचे बनलेले आहे! पाहा व्हिडीओ-

मूळ व्हिडीओ डिलीट, सोशल मीडियावर मात्र चर्चा

घरात सजावटीच्या वस्तू, वॉश बेसिनपासून ते लहान इलेक्ट्रिकल सॉकेट्सपर्यंत सर्व काही सोन्याचे बनलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रियम सारस्वत यांनी हा व्हिडिओ तयार केला होता. पण त्यांनी नंतर तो डिलीट केला. तसे असले तरीही काही लोकांनी तो सोशल साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे आणि तो आता व्हायरल होत आहे.

Web Title: viral-video-indore-golden-house-switch-to-wash-basin-24-carat-gold-vintage-cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.