Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:58 IST2026-04-10T16:55:22+5:302026-04-10T16:58:08+5:30
Shocking Video: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात अत्यंत संतापजनक घटना घडली.

Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात अत्यंत संतापजनक घटना घडली. बाईक टॅक्सीवरून प्रवास करणाऱ्या तरुणीचा दोन दुचाकीस्वारांनी विनयभंग केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. ही घटना ७ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडल्याचे समजत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) जयपूरमधील इस्कॉन रोड परिसरात घडली. पीडित तरुणी रॅपिडो बाईक टॅक्सीने प्रवास करत असताना, दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला या दोघांनी तरुणीवर अश्लील शेरेबाजी केली. तरुणीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे तरुणांची हिंमत अधिकच वाढली. त्यांनी आपली दुचाकी तरुणीच्या बाईकच्या अगदी जवळ आणली आणि तिला लज्जास्पद रितीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, चालत्या दुचाकीवर तरुणीचा शर्ट वर उचलण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला.
घाणेरड कृत्य कॅमेऱ्यात कैद
हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला, ज्याची दखल जयपूर पोलिसांनी स्वतःहून घेतली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी तपास केला असता, आरोपींची ओळख पटली आहे.
पोलीसाचा तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनराज आणि सुदामा अशी आरोपींची नावे असून दोघेही राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून दोन्ही आरोपी फरार आहेत. "आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. टोंक आणि आसपासच्या परिसरात त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील", असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.