हैदराबादमध्ये ५ वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; थरारक घटनेचा व्हिडीओ 'CCTV' मध्ये कैद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:01 PM2023-12-16T12:01:37+5:302023-12-16T12:03:16+5:30

घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलावर एका भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Haydrabad 5 years old boy injured instreet dog aattack outside video goes viral on social media | हैदराबादमध्ये ५ वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; थरारक घटनेचा व्हिडीओ 'CCTV' मध्ये कैद 

हैदराबादमध्ये ५ वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; थरारक घटनेचा व्हिडीओ 'CCTV' मध्ये कैद 

Viral Video : अनेकदा रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या  प्राण्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच. त्यातच हैदराबादमधील दिलसुख नगरमध्ये घडलेली घटना  काळजाचा ठोकाच चुकवणारी आहे.  सध्या हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस पाहायला मिळत आहे.  शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर सर्सास पाहायला मिळतो. काही वेळा रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना या कुत्र्यांच्या नाहक त्रासाला देखील सामोरे जावे लागते.  अशाच एका घटनेने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. या भटक्या कुत्र्याने ५ वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. 

दोन लहान मुले रात्रीच्या वेळी त्यांच्या घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा मागोवा घेतला. घाबरलेल्या मुलांनी आपल्या घराकडे धूम ठोकली. धावत असताना अचानक या मुलाचा पाय घसरला आणि तो जमिनीवर पडला. त्याच दरम्यान मागुन येणाऱ्या या भटक्या कुत्र्याने चिमुकल्याच्या पायाचा चावा घेतला. यामुळे चिमुकल्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या हल्लाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत .तसेच प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Web Title: Haydrabad 5 years old boy injured instreet dog aattack outside video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.