Viral Video: इंधनासाठी रांगा लागल्या असताना तरुणाचा अजब कारनामा, डिलिव्हरी एजंट्सना फुकटात वाटलं पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:21 IST2026-03-27T16:20:14+5:302026-03-27T16:21:30+5:30

Free Petrol Viral Video: मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Free Fuel Frenzy: Hyderabad Man Distributes Petrol to Delivery Agents Amid Shortage Fears | Viral Video: इंधनासाठी रांगा लागल्या असताना तरुणाचा अजब कारनामा, डिलिव्हरी एजंट्सना फुकटात वाटलं पेट्रोल

Viral Video: इंधनासाठी रांगा लागल्या असताना तरुणाचा अजब कारनामा, डिलिव्हरी एजंट्सना फुकटात वाटलं पेट्रोल

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातही अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशाच तणावपूर्ण वातावरणात सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये एक व्यक्ती डिलिव्हरी एजंट्सना चक्क मोफत पेट्रोल वाटताना दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेटकऱ्यांमध्येही याची मोठी चर्चा रंगली आहे.

'@ChapraZila' नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, ही घटना हैदराबादमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण पेट्रोल पंपावर उभा राहून स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी एजंट्सना हाक मारताना दिसत आहे. हा तरुण या एजंट्सना पेट्रोलच्या बाटल्या मोफत वाटत असल्याचे पाहून बघ्यांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी हा अजब प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

या व्यक्तीने मोफत पेट्रोल नेमके कोणत्या हेतूने वाटले? याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. काहींच्या मते ही एक निखळ मदत आहे. तर, काहींनी याला राजकारणाचा किंवा प्रसिद्धीचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना आणि पुरवठ्याबाबत अनिश्चितता असताना,  मोफत पेट्रोल मिळल्याने डिलिव्हरी एजंट्सना मोठा दिलासा दिला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युझर्सनी याला पुण्यकर्म आणि आपत्तीत केलेली मोठी मदत म्हटले आहे. मात्र, काही तांत्रिक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, "नियमांनुसार, वाहनांव्यतिरिक्त बाटलीत पेट्रोल देणे बेकायदेशीर आहे." तर दुसऱ्या एका व्यक्तीने उपरोधिक टोला लगावत म्हटले, "कदाचित या भावाला कुबेराचा खजिना सापडला असावा किंवा तो स्वतः पेट्रोल पंपाचा मालक असावा."

Web Title : ईंधन संकट के बीच युवक ने डिलीवरी एजेंटों को मुफ्त पेट्रोल बांटा।

Web Summary : ईंधन की कमी की आशंकाओं के बीच, हैदराबाद का एक वीडियो एक आदमी को डिलीवरी एजेंटों को मुफ्त पेट्रोल बांटते हुए दिखाता है, जिससे ऑनलाइन तरह-तरह की प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं। कुछ लोग इस कार्य को मददगार इशारा बता रहे हैं, वहीं अन्य अनिश्चित समय में इसकी वैधता और इरादों पर सवाल उठा रहे हैं।

Web Title : Youth's kindness: Free petrol for delivery agents amid fuel crisis.

Web Summary : Amidst fuel shortage fears, a video from Hyderabad shows a man distributing free petrol to delivery agents, sparking varied reactions online. While some applaud the act as a helpful gesture, others question its legality and motives during uncertain times.