Hi-Tech Auto Rickshaw: वायफाय, AC, म्युझिक सिस्टीम, काचेचे दरवाजे; लक्झरी कारपेक्षा कमी नाही 'हा' ऑटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:53 IST2023-06-06T19:51:55+5:302023-06-06T19:53:18+5:30
Auto Rickshaw Modification : सध्या सोशल मीडियावर एका मॉडिफाइड ऑटोचा व्हिडियो व्हायरल होत आहे. एकदा पाहाच.

Hi-Tech Auto Rickshaw: वायफाय, AC, म्युझिक सिस्टीम, काचेचे दरवाजे; लक्झरी कारपेक्षा कमी नाही 'हा' ऑटो...
Bengaluru Amazing Auto Rickshaw Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या बंगळुरूमधील एका ऑटोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा ऑटो सामान्य ऑटो नसून, लक्झरी ऑटो आहे. हा ऑटो एखाद्या आलिशान कारपेक्षा कमी नाही. हा ऑटो पाहून, सर्व ऑटो असे व्हावेत, असं तुमच्या मनात येईल.
बंगळुरुच्या एका एका ऑटो चालकाने आपला ऑटो मॉडिफाय केला आहे. बाहेरुन आणि आतून हा ऑटो एखाद्या कारपेक्षा कमी नाही. त्याने ऑटोमध्ये आरामदायक कुशन, डिजिटल म्युझिक सिस्टीम, ट्रेटेबल, पंखा, एसी, एलईडीसह सुंदर क्रोम वर्कदेखील केले आहे. ऑटोमध्ये दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार आणि शंकर नाग यांचे पोस्टर्सदेखील आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ऑटोला काचेचे दरवाजे बसवण्यात आले आहेत.
Hello #Bengaluru what a beautiful and wonderful auto . Has anyone traveled so far pic.twitter.com/ISLEmup6we
— Ajith Sahani (@ajithkumar1995a) June 1, 2023
हा व्हिडिओ 'अजिथ सहानी' (@ajithkumar1995a) या ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. या ट्विटला 11 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 200 लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी त्यावर कमेंट्सही केल्या.