विनायक राऊतांचे राणेंबद्दल गैरसमज पसरवायचे काम : नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: April 24, 2024 18:04 IST2024-04-24T18:03:21+5:302024-04-24T18:04:18+5:30

'संजय राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानबाबत खरी माहिती सांगावी'

Vinayak Raut work to spread misconceptions about Rane says Nitesh Rane | विनायक राऊतांचे राणेंबद्दल गैरसमज पसरवायचे काम : नितेश राणे

विनायक राऊतांचे राणेंबद्दल गैरसमज पसरवायचे काम : नितेश राणे

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मातोश्रीवर गैरसमज पसरवायचे व चुकीची माहिती द्यायचे काम विनायक राऊतच करत होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व नारायण राणे एकत्र आल्यामुळे विनायक राऊत यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते आता काहीही बरळत आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी बुधवारी त्यांनी संवाद साधला.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानबाबत खरी माहिती सांगावी. या प्रतिष्ठानचे दहा वर्षे ऑडिट झालेले नाही. दहा वर्षे कोणी देणग्या दिल्या आणि ते व्यवहार कसे झाले याची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. काळा पैसा व्हाईट करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. शिवसेनेच्या सातबारावर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव होते आणि ते राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना अखंड ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काळजी करू नये.

Web Title: Vinayak Raut work to spread misconceptions about Rane says Nitesh Rane