परप्रांतीय कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:03 IST2021-04-09T12:01:19+5:302021-04-09T12:03:13+5:30
Crimenews Banda Sindhudurg-शेर्ले कापईवाडी येथे केरळीयन कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

परप्रांतीय कामगाराची आत्महत्या
ठळक मुद्देपरप्रांतीय कामगाराची आत्महत्या बांदा पोलीसांत फिर्याद
बांदा : शेर्ले कापईवाडी येथे केरळीयन कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी बांदा पोलीसांना याबाबत माहिती दिली. विहीर खोदाईचे काम करणारे सात कामगार एकत्र राहत होते.
दारु पिऊन बर्याच वेळा त्यांच्यात आपापसांत भांडणे होत असत. कामगारांचा मुकादम प्रशांत व पोलीस पाटील विश्राम जाधव बांदा पोलीसांत फिर्याद देण्यासाठी दाखल झाले आहेत.