देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:04 IST2024-05-08T16:02:21+5:302024-05-08T16:04:06+5:30

१ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित

Narayan Rane's victory in the Lok Sabha elections is certain, Deepak Kesarkar expressed his belief | देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी : देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. मोदींमुळे भारत बलवान देश बनणार आहे. त्यामुळेच रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी, मुलगी आणि जावई सोबत होते.

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. यापुढेही देश मोदींसोबतच राहणार असून, भारत बलवान देश बनणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन ही मंत्री केसरकर यांनी केले.

कोकण एका विकासाच्या दिशेने जात आहे. शेतकरी, महिला व युवक यांचा विकास हा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी विकासाला मत दिले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारपेक्षा अधिकचे मताधिक्य राणेंना मिळेल. १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर - वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जुन वगळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Web Title: Narayan Rane's victory in the Lok Sabha elections is certain, Deepak Kesarkar expressed his belief