
सखी: सुकलेले मस्कारा, लिपस्टिक, क्रीम – फेकू नका! ५ भन्नाट ट्रिक्स – होतील अगदी नव्यासारखे
लिपस्टिक सुकते, मस्करा घट्ट होतो, आयलाइनर ड्राय होतो, क्रीममध्ये गुठळ्या होतात. अशावेळी आपण वैतागून प्रोडक्ट फेकून देतो. महागडे तुटलेले, कोरडे मेकअप उत्पादने पूर्वीसारखं करण्यासाठी आपल्याला ५ टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील.

मुंबई: पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस; मुंबई, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसह, ठाणे पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फिल्मी: ‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; संपूर्ण टीमचे कौतुक केले
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'दशावतार' चित्रपटाचे कौतुक केले. जमिनींचा गंभीर विषय मांडला आहे. महाराष्ट्राने बोध घ्यावा, असा चित्रपट आहे. मनोरंजन असले तरी, महाराष्ट्रातील गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे, यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र: 'बंजारा-वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने वाद
बीडमध्ये बंजारा आरक्षणासाठी आज मोर्चा निघाला. यावेळी धनंजय मुंडे यांनी 'बंजारा आणि वंजारा एकच आहेत' असे वक्तव्य केले. या विधानावरून समाज आक्रमक झाला. बंजारा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत शब्द मागे घ्या, अशी मागणी केली. समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, वंजारा आणि बंजारा हे वेगळे समाज असून त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे.

जालना: हैदराबाद गॅझेट टिकवणे सरकारची जबाबदारी, जरांगे पाटलांचा इशारा
मनोज जरांगे पाटलांनी बंजारा आरक्षणास पाठिंबा दर्शवला. तसेच, हैदराबाद गॅजेटमधील कुणबी नोंदींचे काय? त्या आधारावर मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. अन्यथा सरकारला सुट्टी मिळणार नाही. हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.

सखी: ऋजुता दिवेकर यांचा वेटलॉस फंडा, महागड्या आणि स्पेशल डाएटऐवजी, घरीच तयार केलेले साधे जेवण जेवून करा झटपट वेटलॉस...
कोणत्याही महागड्या आणि स्पेशल डाएटऐवजी, घरी तयार केलेले साधे जेवण खाऊनही आपण वेटलॉस सहज करु शकतो. प्रत्येक प्रकारच्या सिझनल भाज्या, फळे आणि लोकल फूड, स्थानिक त्या - त्या भागात पिकवली जाणारी धान्ये व कडधान्ये यांचा समावेश आहारात केल्यास वेटलॉस करण्यास मदत होते.

पुणे: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार, पोलीस पोहोचले घरी
वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने नवी मुंबईतील ऐरोलीत एका ट्रकचालकाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला. ट्रकचालकाला घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला. त्यामुळे पोलीस माघारी आले आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस कारवाईला पोहोचले, त्यावेळी पूजा खेडकरचे आई-वडील घरातून फरार झाले. पोलीस गेटवरून उड्या मारून घरात गेले. त्यांनी परिसराची पाहणी केली.

सखी: नव्या झाडूने घर साफ करताना भुसा पडतो- घाण होते? भन्नाट ट्रिक - भुसा न पडता घर होईल स्वच्छ
नवीन झाडू विकत घेतल्यानंतर घरभर भुसा-घाण साचते. यासाठी आपण एक सोपी ट्रिक वापरली तर घर देखील स्वच्छ होईल. पण सतत झाडूने साफसफाई केल्यास त्याची पानं व काड्या गळून पडतात. या टिप्समुळे काही मिनिटात नव्या झाडूचा भुसा निघेल. शिवाय केर काढताना भुसा घरभर पसरणार नाही.

महाराष्ट्र: भारत-पाक सामना फिक्स, PCB ला 1000 कोटी मिळाले: संजय राऊतांचा गंभीर आरोप
दुबईत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन भारतात राजकीय वादळ उठले आहे. सामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली होती. अशातच आता, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबाबत एक मोठा दावा केला आहे. हा सामना पूर्णपणे फिक्स होता आणि यातून पाकिस्तानला तब्बल 1000 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे राऊतांचे म्हणने आहे.

राष्ट्रीय: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; कुकी नेत्यांची घरे जाळली! मोदी नुकतेच येऊन गेलेले
मणिपूरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुन्हा हिंसाचार झाला आहे. चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांच्या घरांना आग लावण्यात आली. यात एका नेत्याचे घर जळाले असून दुसऱ्या नेत्याच्या घरातील आग विझविण्यात आली आहे. शांतता प्रयत्नांना खीळ, राष्ट्रीय महामार्ग बंदच राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय: कतारवरील हल्ल्यानंतर तुर्कीलाही भीती; इस्रायली हल्ल्याचा वाढला धोका
कतारवरील हल्ल्याने तुर्कीच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हमासला केलेल्या मदतीमुळे अमेरिकेचा सहकारी देश कतारवरही हल्ला होतो मग आपल्यावरही हल्ला होण्याची भीती तुर्कीला वाटते. तुर्कीकडून हमासला मदत, पैसा, वैचारिक पाठिंबा आणि इतर गोष्टी मिळतात असा इस्रायलचा आरोप आहे. मागील २ वर्षात इस्रायलने यमन, लेबनान, इराण, सीरिया, पॅलेस्टाईन आणि कतार या देशांवर हल्ला केला आहे. त्यामुळे तुर्कीलाही हल्ल्याचा धोका सतावत आहे.

ऑटो: डिझेल गाड्यांना दिलासा? इथेनॉलचा प्रयोग फसला, आता आयसोब्युटेनॉलचा विचार!
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यावर डिझेलमध्येही इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. गडकरी म्हणाले, सरकार आता डिझेलमध्ये इथेनॉलपासून बनवलेले आयसोब्युटेनॉल मिसळण्यावर काम करत आहे. डिझेल गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जाणार होते.

सखी: आता शुगर वाढणार नाही, या 5 भाज्या खा आणि डायबिटीस ठेवा कंट्रोलमध्ये!
डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. दोडका, तोंडली, कारले आणि गवार यांसारख्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात अशा भाज्यांच्या समावेश करणे फायद्याचे ठरते.

राष्ट्रीय: अनंत अंबानींच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीने गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा वाइल्डलाइफ फॅसिलिटीला क्लीनचिट दिली आहे. वनतारामध्ये हत्तींची कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि बेकायदेशीररीत्या कैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने अहवाल नोंदवला आणि प्राधिकाऱ्यांनी वंतारा येथे नियमांचे पालन आणि नियामक उपायांबाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले.

सखी: केस खूपच गळतात? जावेद हबीब सांगतात १ सोपा, इफेक्टिव्ह उपाय
जावेद हबीब सांगतात, केस गळती रोखण्यासाठी केस लहान ठेवा, कंडिशनर वापरा, आणि धुण्यापूर्वी कांद्याचा रस लावा. मोहरीचे तेल देखील फायदेशीर आहे. कांद्याचा रस केसांना मजबूत करतो.

आंतरराष्ट्रीय: जगातील ५० हून अधिक मुस्लीम देश एकाच व्यासपीठावर एकटवणार, कारण...
कतारमध्ये ५० हून अधिक मुस्लिम देश एकत्र येत आहेत, इस्रायली हल्ल्यांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लीम देश एकत्र येत असल्याने अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढली आहे. गाझा हल्ल्यामुळे मुस्लिम देश आधीच नाराज आहेत, त्यातच इस्रायलने दोहा येथेही हल्ला केला होता. इस्रायली हल्ल्याने अमेरिकेचे समर्थन करणाऱ्या अरब देशांच्या एकजुटीलाही बाधा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र: धुळे विधानसभा: अनिल गोटेंचा गंभीर आरोप, 45 हजार बोगस मतदान!
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत 45 हजार बोगस मतदान झाल्याचा अनिल गोटेंनी आरोप केला आहे. त्यांच्याकडे मतदार यादी असून, 27 हजार मतदारांची नावे अनेकवेळा नोंदवल्याचा दावा त्यांनी केला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही चौकशी झाली नाही, असा आरोप गोटेंनी केला.

फिल्मी: परेश रावल यांचे 'हेरा फेरी ३' वर भाष्य, म्हणाले, घाव भर गया है!
परेश राव यांनी 'हेरा फेरी ३'वर पुन्हा भाष्य केलं आहे. मधल्या काळात जे झालं त्यावर ते म्हणाले, 'घाव भर गया है'. तसंच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचं नातं पूर्वीसारखंच आहे. एवढ्या कारणाने नाती खराब होत नसतात. आमचं नातं आजही तितकंच पारदर्शक आहे असंही ते म्हणाले. बाबूराव भूमिकेवर वेगळा सिनेमा जरी आला तरी त्यातही श्याम आणि राजूची गरच लागणारच अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सखी: घरी विरजण लावलेले दही आंबट होते? १ सोपी युक्ती, दही होईल घट्ट!
बाजारातील दह्यापेक्षा घरचं दही अधिक ताजं, पौष्टिक आणि चविष्ट असतं. पण अनेकदा घरी तयार केलेलं विरजण खूप आंबट होतं किंवा घट्ट होण्याऐवजी ते पातळ आणि चविष्ट बनत नाही. त्याच्या चवीमुळे आपल्या दही फेकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो. पण ही एक सोपी युक्ती वापरली तर दही आंबट होणार नाही.

मुंबई: १५ माजी नगरसेवकांची घरवापसी?; BMC निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेत नाराजी
मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन पदाधिकारी निवडीवरून १५ माजी नगरसेवक नाराज असून ते ठाकरे गटात परतणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र ज्या नगरसेवकांबाबत गैरसमज पसरवले जात आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हे सर्व नगरसेवक खंबीरपणे पक्षातच असून येणारी निवडणूक दणदणीत मताधिक्याने जिंकू असा शब्द त्यांनी शिंदे यांना दिल्याचा दावा आहे.

राष्ट्रीय: "आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू" -सरसंघचालक भागवत
"ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते की, ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारत टिकणार नाही. विभागला जाईल. पण, असे झाले नाही. आता स्वतः इंग्लडचं विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. पण, आपण वेगवेगळे झालो नाही. आपण पुढे जात राहू. आपण कधीतरी तोडले गेलो होतो, पण, आपण तेही परत घेऊन टाकू", असे विधान मोहन भागवत यांनी केले.

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ परिसरात रविवारी (१४ सप्टेंबर) ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर,बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिके अक्षरश: पाण्याखाली गेली. चिंचपूर पांगुळ वडगांव, जोगेवाडी, मानेवाडी, ढाकनवाडी, पिंपगाव तप्पा, कुत्तरवाडी भागात जोरदार पुनरागमन केले. परतीच्या पावसाने रौद्रवतार धारण केल्याने शेत जलमय झाली.

राष्ट्रीय: वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; संपूर्ण कायद्यावर बंदी नाही
वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. त्यात वक्फ बोर्डात ३ गैर-मुस्लीम सदस्य बनू शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे. त्याशिवाय सदस्य बनण्यासाठी कमीत कमी ५ वर्ष इस्लामचं पालन करण्याची अट ठेवली होती ती कोर्टाने रद्द केली आहे. जोपर्यंत सरकार यावर स्पष्ट नियम बनवत नाही तोपर्यंत ही तरतूद लागू नसेल असं कोर्टाने स्पष्ट केले आहे. महसूल नोंदी प्रकरणांवरही न्यायालयाने निर्देश दिलेत.

महाराष्ट्र: टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल रात्री झालेल्या सामन्याला देशभरातून तीव्र विरोध झाला होता. त्या पार्श्वभूमीवर चौफेर दबावाखाली खेळताना भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर आता केंद्रातील सत्ताधारी भाजपाने विरोधकांना डिवचलं आहे.

मुंबई: मुंबईला रेड अलर्ट! जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता. रविवारी रात्रीपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपले आहे. त्यात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. किंग्स सर्कल, माटुंगा, सायन, भायखळा, महालक्ष्मी, पेडर रोड, कुर्ला, चेंबूरसह सखल भागात पाणी साठलं. पावसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

फिल्मी: आता मनासारखं जगावंस वाटतंय, नाना पाटेकरांनी केली निवृत्तीची घोषणा?
मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले. ७५ वर्षांनंतर सिनेमातून निवृत्त होऊन समाजसेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. मकरंद अनासपुरे ‘नाम’चं काम पाहणार आहेत. नानांच्या या निर्णयाने चाहते नाराज झाले आहेत.

मुंबई: मोनोरेल पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना त्रास सोसावा लागला. चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनो रेल्वे वडाळा परिसरातच अचानक बंद पडली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशी अडकले. भर पावसाता प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि चेंबूरकडून आलेली मोनो रेल्वे थांबवून त्यात बसवण्यात आले.

महाराष्ट्र: पाऊस जाता जाता महाराष्ट्राला झोडपणार! चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मान्सूनने परतीची वाट धरली असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात संततधार सुरूच आहे. आज (१५ सप्टेंबर) दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

क्रिकेट: IND vs PAK : आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित- सूर्यकुमार यादव
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला पुन्हा एकदा पराभवाचा दणका दिला. टीम इंडियाला अगदी सहज विजय मिळवून देण्यात कर्णधार सूर्यकुमार यादवनंही महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत', असे म्हणत आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित. असे तो म्हणाला.

क्रिकेट: IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! टीम इंडियानं मॅचनंतर हस्तांदोलन करणं टाळलं, कारण...
आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले, पण 'पहलगाम' हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियातील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळले. सरकारच्या आदेशानुसार खेळलो, पण आम्ही काही विसरलेलो नाही, असा स्पष्ट संदेश टीम इंडियाने मॅचनंतर दुबईच्या मैदानातून दिलाय. विजयानंतर खेळाडूंनी कोणतीही औपचारिकता दाखवली नाही.

नाशिक: पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र धोरणावर लक्ष द्यावे: शरद पवार
शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी, कांदा निर्यात आणि नाशिक जिल्हा बँकेच्या समस्यांवरून सरकारला धारेवर धरले. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका संकटात असून मोदींनी परराष्ट्र धोरण सुधारावे, असा सल्ला दिला. कृषीप्रधान भारताने अमेरिकेचे अंधानुकरण टाळावे, असे मत व्यक्त केले.