
सखी: फक्त २० रुपयांत मिळवा डायमंड फेशियल ग्लो!
कच्च्या दुधाने घरीच करा सोपे फेशियल! क्लींजिंग, स्क्रबिंग, मसाज आणि फेस मास्क अशा चार स्टेप्समध्ये मिळवा चमकदार आणि मऊ त्वचा. टॅनिंग आणि कोरडेपणा दूर करा..पाहा सोपा उपाय

महाराष्ट्र: दोन ठाकरे दसऱ्याला एकत्र येणार: चंद्रकांत खैरे यांची घोषणा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले की विजयादशमीपासून दोन्ही भाऊ एकत्र दिसतील, कारण जनतेला दोन ठाकरेंचे सरकार हवे आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

राष्ट्रीय: देशभरात फटाक्यांवर बंदीची शक्यता? सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी
दिल्लीतील फटाक्यांवरील बंदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने फटाक्यांवर दिल्लीपुरती बंदी का? असा सवाल करत देशभरात धोरण लागू करण्याचे संकेत दिले. फटाके बनविणाऱ्या संघटनांनी ग्रीन फटाक्यांना परवानगी देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने काही नियम आहेत का असा सवाल केला. यावर सरकारने नीरीचा अहवाल सादर करतो असे सांगितले.

मुंबई: टेक ऑफवेळी चाक निखळले, मुंबईत स्पाइसजेटच्या विमानाचे सुरक्षित 'इमर्जन्सी लँडिंग'!
कांडलाहून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेट विमानाचे उड्डाणानंतर चाक निखळले. ७५ प्रवासी विमानात होते. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मुंबईत सुरक्षित लँडिंग झाले. कांडला एटीसीने माहिती दिल्यानंतर मुंबई विमानतळावर आपत्कालीन स्थिती जाहीर झाली.

सखी: 5 वर्षांखालील मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी पालकांनी कराव्यात अशा ३ सोप्या गोष्टी...
5 वर्षांखालील मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांना गोष्टी सांगा, स्मरणशक्ती वाढवणारे खेळ खेळा आणि पौष्टिक आहार द्या. यामुळे मुलांचा मानसिक विकास होईल.

महाराष्ट्र: "मी राजकारणातून निवृत्त होणार..."; पक्षांतराची चर्चा, गुजराथींचं स्पष्टीकरण
पक्षाच्या बैठकीला मी हजर नव्हतो, त्यामुळे मी पक्ष सोडणार अशी चर्चा आहे. शरद पवारांनी मला फार मोठे केले. एक चिंगारी को ज्वाला बना दिया अशी माझी पवारांविषयी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांना सोडून जाणार अशी बातमी आहे परंतु त्याऐवजी मी राजकारणातून हळूहळू निवृत्त होणार असं विधान करत कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून निर्णय घेईन असं अरुणभाई गुजराथी यांनी म्हटलं.

नांदेड: ट्रक उलटला अन् रेशन घोटाळा उघड झाला, ६५० पोती रस्त्यावर!
नांदेडमध्ये रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने काळाबाजार उघडकीस आला. फुलवळ टोलनाक्याजवळ ६५० पोती तांदूळ रस्त्यावर पडले. चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. शिवसेना (उबाठा) ने पुरवठादारांवर गंभीर आरोप केले. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

महाराष्ट्र: महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; तपशील येथे
महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर! ठाणे, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसाठी आरक्षण जाहीर. महिला, सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित. निवडणुकीची जोरदार तयारी, लवकरच बिगुल वाजणार!

राष्ट्रीय: भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून ट्रम्प यांनी शुल्क लादले: मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५०% शुल्कावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, 'हे शुल्क भारताच्या वाढत्या प्रभावाच्या भीतीचे परिणाम आहेत.'

क्रिकेट: भारत-पाक सामन्याला थंड प्रतिसाद; चाहत्यांचा बॉयकॉट, तिकीट विक्री घटली!
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला थंड प्रतिसाद! पहलगाम हल्ल्यामुळे वातावरण तापलेले असताना, दुबईत होणाऱ्या सामन्याची ५०% तिकीटं अजूनही शिल्लक. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह कमी, 'बॉयकॉट'ची मागणी जोर धरतेय. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची परवानगी, तरीही रसिकांचा थंड प्रतिसाद!

राष्ट्रीय: छत्तीसगड: बिजापूरमध्ये सुरक्षा दलांकडून २ नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गेल्या २४ तासांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याबाबत सुरक्षा दलांचे अभिनंदन केले असून, नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाचा इशारा दिला आहे.

नाशिक: नाशिकमध्ये शिवसेना-मनसेचा संयुक्त मोर्चा; भाजपा सरकारला दिले आव्हान
नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेने संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या गुन्हेगारी व पालिका भ्रष्टाचारावर जोरदार टीका करत भाजपाला आव्हान दिलं. 'ही तर फक्त सुरूवात' असल्याचा इशारा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिला. मोर्च्यात मुख्यतः नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध करण्यात आला.

सखी: मलूल - थकलेले डोळे होतील सुंदर, करा ४ उपाय
थकलेले डोळे हे ताणाचे लक्षण आहेत. डोळ्यांना पुरेशी विश्रांती द्या, गुलाबजल वापरा, काजळ लावा, डोळ्यांचे व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या. व्हिटॅमिन ए आणि ई युक्त आहार घ्या. थोडी काळजी घ्या म्हणजे डोळे सुंदर दिसतील.

सखी: केसांना तेल किती वेळा लावावे? लावल्यावर किती वेळ ठेवावे ?
केसांना तेल पोषण देते, पण किती वेळा लावावे? सारखे लावणे त्रासदायक ठरेल. लावल्यावर दोन-तीन तास पुरेसे आहेत. तेलकट त्वचा असल्यास जास्त तेल लावल्याने पिंपल्स येतात. तेल फक्त मुळांना लावा. योग्य प्रमाणात लावा आणि रात्रभर ठेवणे टाळा.

फिल्मी: ज्वाला गुट्टाकडून ३० लीटर ब्रेस्ट मिल्क दान: सर्वच स्तरातून होतंय कौतुक
जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. तिने आतापर्यंत ३० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केले, ज्या नवजात बालकांना आई नाही, त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयात ज्वालाकडून दररोज ६०० मिलीमीटर दूध दान केले जाते. ४ महिन्यापूर्वीच ज्वालाने एका मुलीला जन्म दिला आहे. मागील ४ महिन्यापासून ज्वाला गुट्टा आईचा आधार नसलेल्या बाळांसाठी आईची माया देत आहे.

राष्ट्रीय: काँग्रेसने शेअर केला PM मोदींचा AI व्हिडिओ; भाजपने केला पलटवार!
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडिओ शेअर केला. यानंतर आता भाजपने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत हा मोदींच्या आईचा अपमान असल्याचे म्हटले. जेडीयूनेही काँग्रेसवर हल्लाबोल करत हे निंदनीय कृत्य असल्याची टीका केली.

सखी: आई-वडिलांच्या 'या' चुकांमुळे मुलांचा आत्मविश्वास होतो कमी, सतत करतात चिडचिड
मुलं जशी घरात पाहतात, तशीच त्यांची मानसिकता घडते. आई-वडिलांचे बोलणं,त्यांची प्रतिक्रिया हे सगळं मुलांच्या मनावर खोल परिणाम करतं. त्यामुळे पालकांनी मुलांशी वागताना किंवा त्यांच्यासमोर बोलताना काळजी घ्यायला हवी.

ऑटो: जीएसटी २.० चा साईड इफेक्ट: इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होण्याची शक्यता!
पेट्रोल-डिझेल गाड्या स्वस्त झाल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपन्यांना किंमती कमी कराव्या लागतील किंवा डिस्काउंट द्यावे लागतील. नेक्सॉनच्या किंमतीतील फरक वाढेल, ज्यामुळे ग्राहक पेट्रोल गाड्यांकडे वळू शकतात. तसाच प्रकार दुचाकींच्या बाबतही होणार आहे. दुचाकींच्या किंमतीत मोठा फरक पडणार आहे.

महाराष्ट्र: 'माधुरी' हत्तीणीची कोल्हापूर वापसी लांबणीवर
गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आलेल्या कोल्हापूरमधील नांदणी येथील मठातील माधुरी हत्तीणीची घरवापसी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्य्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर माधुरीची घरवापसी लांबणीवर पडली आहे.

सखी: 15 मिनिटांत गव्हाच्या पिठाचा करा कुरकुरीत खाकरा, विकतपेक्षाही भारी!
घरीच तयार करा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! बेसन, कसुरी मेथी आणि मसाल्यांचे मिश्रण तयार करा. पातळ लाटून खरपूस भाजून घ्या. नाश्त्याला किंवा चहासोबत सर्व्ह करा.

जालना: या अशिक्षिताने तुम्हाला रडकुंडीला आणले: भुजबळांना जरांगेंचे सडेतोड उत्तर
भुजबळांच्या 'अशिक्षित' टीकेला जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडवले; मराठा नेत्यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी.' प्रकाश आंबेडकरांना सर्व जातींना समान लेखण्याची विनंती. आत्महत्येवर राजकारण नको, असे जरांगे म्हणाले.

नांदेड: अतिवृष्टी, कर्जाच्या डोंगराने त्रस्त शेतकऱ्याने संपवलं जीवन
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे दिनेश ठाकूर या तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, जमीन खरडून गेली. एसबीआय बँकेच्या कर्जाने ते हतबल झाले होते. प्रशासनाने तातडीने मदत करावी, ग्रामस्थांची मागणी.

मुंबई: BMC: वेळेवर पगार न दिल्याने महापालिकेला दणका! प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजार देण्याचे हायकोर्टाचे आदेश
प्रदीर्घ लढाईनंतर महापालिकेच्या ५८० स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यात आले. मात्र, गेले दोन महिने त्यांचे वेतन रखडले आहे. तसेच थकबाकीही दिली नाही. यावर पालिकेने लवकरच वेतन आणि थकबाकी देण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. त्यानंतर न्यायालयाने प्रत्येक कामगाराला ५० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश महापालिकेला दिले.

लातुर: 'ओबीसी आरक्षण संपले' म्हणत तरुणाची नदीत उडी, जीवन संपवले
लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथे भरत कराड यांनी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या भीतीने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत ओबीसींसाठी न्यायाची मागणी केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

व्यापार: टाटा कॅपिटलचा आयपीओ ऑक्टोबरमध्ये! जाणून घ्या डिटेल्स
टाटा कॅपिटलचा बहुप्रतिक्षित आयपीओ ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. याद्वारे कंपनी १७,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी आता आरबीआयच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

सखी: सुकलेले मस्कारा, लिपस्टिक, क्रीम – फेकू नका! ५ भन्नाट ट्रिक्स – होतील अगदी नव्यासारखे
लिपस्टिक सुकते, मस्करा घट्ट होतो, आयलाइनर ड्राय होतो, क्रीममध्ये गुठळ्या होतात. अशावेळी आपण वैतागून प्रोडक्ट फेकून देतो. महागडे तुटलेले, कोरडे मेकअप उत्पादने पूर्वीसारखं करण्यासाठी आपल्याला ५ टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील.

आंतरराष्ट्रीय: इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लिम देशांवर हल्ले, अमेरिकाही नाराज
इस्त्रायलने गेल्या ७२ तासांत गाजासह ६ इस्लामिक देशांवर हल्ला चढवला, ज्यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि १ हजाराहून अधिक जखमी झाले. इस्त्रायलने या हल्ल्यात दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इस्त्रायलने सोमवारी सीरियाच्या एअरफोर्स बेस आणि सैन्य तळांवर हल्ले केले. त्याशिवाय ड्रोनने ट्यूनिशियाच्या पोर्टवर फॅमिली बोटवर हल्ला केला.

कोल्हापूर: कोल्हापूरचा शाही दसरा राज्याच्या प्रमुख महोत्सवांत
राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासूनची कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची परंपरा आता राज्याचा प्रमुख महोत्सव! पर्यटन वाढणार, जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण. शासनाच्या पाठिंब्यामुळे उत्सवात अधिक रंगत!

सखी: चांदीचे पैंजण काळे पडले? 3 सोप्या ट्रिक्स, घरच्या घरी करा पॉलिश!
चांदीचे पैंजण काळे पडलेत तर बेकिंग सोडा, लिंबू, टूथपेस्ट आणि व्हिनेगर वापरून घरच्या घरी पॉलिश करा. तुमचे पैंजण पुन्हा चमकतील यासाठी फार खर्चही लागणार नाही.

फिल्मी: आदित्य ठाकरे पडले दिलीप प्रभावळकरांच्या पाया, 'दशावतार'च्या प्रिमियरचा व्हिडीओ
'दशावतार'च्या प्रिमियरला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी दिलीप प्रभावळकर दिसताच आदित्य ठाकरेंनी त्यांना वाकून नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ पाहून चाहते आदित्य ठाकरेंचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.

फिल्मी: OLaचा घोटाळा? वेळेवर पैसे भरूनही लावला दंड, मराठी अभिनेत्री संतापली
अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने OLA कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. कॅब ड्राइव्हचे पैसे वेळेवर भरूनही वारंवार १०० रुपयांचा दंड भरण्याची मागणी केली जात आहे. पेमेंट लिंक ओपन होत नाही आणि मग नंतर दंड लागतो, असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. हा ओलाचा स्कॅम आहे का? असा सवाल अभिनेत्रीने उपस्थित केला आहे.