
राष्ट्रीय: कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने क्रिकेटरचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते अपघातात क्रिकेटर फरीद हुसेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका कार चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने फरीदची स्कूटर धडकली. फरीदला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना पूंछ जिल्ह्यात घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र: मुंबईचे रस्ते शक्य तितके लवकर सोडा: मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलकांना आवाहन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. कोर्टाच्या आदेशानंतर जरांगे यांनी आंदोलकांना मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आणि आझाद मैदानात शांतपणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र: आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; OBC समाज आक्रमक
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. OBC आरक्षणाला धक्का लागल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत येण्याचा इशारा. कुठल्या जातीला ओबीसीत समाविष्ट करता येत नाही. हा अधिकार कुणालाही नाही. ओबीसी प्रवर्गात सध्या ३७४ जाती आहेत. पवार असो वा फडणवीस कुणीही ओबीसीत जाती समाविष्ट करू शकत नाही असं त्यांनी सांगितले.

व्यापार: जीएसटी दरांमध्ये बदल: फक्त कारच नव्हे, १७५ वस्तू स्वस्त होणार!
जीएसटी परिषदेच्या बैठकीत १७५ वस्तू स्वस्त होणार, एसी, टीव्ही, सिमेंटच्या किमती घटणार आहेत. दिवाळीपूर्वी हायब्रीड कार, स्कूटरवरील जीएसटी कमी होणार, तर कार्बोनेटेड पेये, तंबाखू महागणार आहेत. या जीएसटी कपातीचा खरा फायदा हा टोयोटा, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपन्यांना होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर २८% वरून १८% पर्यंत कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर मोटरसायकल, स्कूटरवरील जीएसटी देखील कमी होणार आहे.

मुंबई: मराठा आंदोलनातील नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी, सरकारला निर्देश
मराठा आरक्षण आंदोलनातील नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. आझाद मैदानाबाहेर गर्दी न करण्याचे आणि मंगळवारी दुपारी ४ पर्यंत रस्ते रिकामे करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत. जरांगेंच्या वकिलांना कोर्टाने डिप्लोमेटिक न वागण्याचा सल्ला दिला. बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे सरकारला हायकोर्टाने आदेश दिलेत. मुंबईतील रस्त्यांवर आंदोलन नको, आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. जरांगेंची तब्येत बिघडल्यास तात्काळ उपचार द्यावे असं म्हटलं.

राष्ट्रीय: 'नरेंद्र मोदी देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत'- राहुल गांधीं
राहुल गांधी यांनी आपल्या 'मतदार हक्क' यात्रेच्या समारोपाच्या रॅलीतून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'जेव्हा आम्ही महादेवपुरा येथे मत चोरीचे सत्य उघड केले, तेव्हा आम्ही अणुबॉम्ब टाकला. आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. नरेंद्र मोदी या देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.'

राष्ट्रीय: भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० मृत्यू
भारतातील रस्ते सुरक्षेची स्थिती अतिशय वाईट होत चालली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये २०२३ मध्ये देशभरात झालेल्या रस्ते अपघातांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, २०२३ मध्ये रस्ते अपघातात १.७२ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: 'माझ्या पोरांवर दादागिरी करू नका, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यात पत्रकार परिषदेत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस पोलिसांचा कार्यकर्ता म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला. हुल्लडबाजी करून आंदोलकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मराठा आंदोलकांवर दादागिरी करू नका, एकाही पोराला काठी लागली तर मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा कधी सुरू होऊ देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

राष्ट्रीय: इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांनी इथेनॉलमुक्त पर्याय देण्याची मागणी केली होती, पण न्यायालयाने सरकारचे धोरण योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे यापुढेही देशभरात पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रण सुरूच राहणार आहे.

पुणे: शिक्रापूर एन्काउंटर: दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस आणि ७२ तास!
सातार्यात कोयता गँगचा धुमाकूळ! लोकमत सांगते, दोनशे सीसीटीव्ही आणि सव्वाशे पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी ७२ तासांत आरोपींना शोधले. एका आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि शिक्रापूरमध्ये झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

जालना: मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे 'आरक्षण बचाव' उपोषण
मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, अंतरवाली सराटी येथे ओबीसी समाजाने उपोषण सुरू केले आहे. 'ओबीसी आरक्षण बचाव' आणि कुणबी दाखले रद्द करण्याची मागणी आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या दुहेरी आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.

मुंबई: मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, शिंदे-पवार उपस्थित
मराठा आरक्षणासंदर्भात बैठकांचा जोर वाढला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे-पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 'बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक' असे चित्र पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय: PM मोदींचा घणाघात: पाकला दहशतवादावरुन फटकारले, अमेरिकेलाही सुनावलं!
चीनमध्ये एससीओ शिखर परिषद होत आहे. यादरम्यान, सर्व राष्ट्रप्रमुखांच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली. तसेच, अमेरिकेलाही त्यांच्या संरक्षणवादी, एकतर्फी आणि वर्चस्ववादी वृत्तीबद्दल फटकारले.

मुंबई: मराठा आंदोलनाने मुंबई ठप्प; वाहतूक कोंडीने चाकरमानी हैराण
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सोमवारी मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली. सीएसएमटी परिसरातील रस्ते ठप्प झाले. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मंत्रालयासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे.

क्रिकेट: 'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ'; पंतप्रधान मोदींचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
चेतेश्वर पुजारा याच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी अभिनंदनपर पत्र पाठवले. ऑस्ट्रेलियातील योगदानासह पुजाराच्या महत्त्वपूर्ण खेळीची त्यांनी प्रशंसा केली. कुटुंबाच्या त्यागाचा उल्लेख करत, पुजाराच्या क्रिकेटमधील योगदानाला त्यांनी सलाम केला. पंतप्रधानांनी पुजाराना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुंबई: अमित ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा; मनसैनिकांना अन्न-पाणी पुरवण्याचे आदेश!
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलकांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. मनोज जरांगे-पाटील मुंबईत उपोषणाला बसले असून, राज्यभरातून मराठा आंदोलक त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत.

क्रिकेट: 'आशिया कप'साठी ओमानचा संघ जाहीर; भारतीय वंशाचा खेळाडू कर्णधार!
ओमानने आशिया कप २०२५ साठी १७ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, भारतीय वंशाचा जतिंदर सिंग संघाचे नेतृत्व करणार आहेत. संघात अनेक पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. जतिंदर सिंग मूळचा पंजाबचा असून, आता तो भारताविरुद्ध कसा खेळतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

फिल्मी: सुमोना चक्रवर्तीच्या कारला आंदोलकांनी घातला घेराव, आला भयानक अनुभव
मुंबईत मराठा आंदोलनादरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला भयानक अनुभव आला. काही आंदोलकांनी तिच्या गाडीला घेरले, बोनेटवर मारले आणि 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा दिल्या. पोलिसांच्या निष्क्रियतेवर सुमोनाने नाराजी व्यक्त केली आणि शहरात असुरक्षित वाटल्याची भावना व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय: टॅरिफ चुकीचे ठरवल्याने ट्रम्प संतापले; म्हणाले, 'तर आमचा देश उद्ध्वस्त होईल!'
अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले. यावर ट्रम्प म्हणाले, शुल्क न आकारल्यास देश उद्ध्वस्त होईल, सैन्याची ताकद संपेल. ट्रम्प यांनी निर्णयाला पक्षपाती ठरवत न्यायाधीशांवर टीका केली, काहींचे आभार मानले.

मुंबई: मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक, जरांगेंचे आंदोलन सुरूच
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षण उपसमिती आणि महाअधिवक्त्यांशी झालेल्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडल्याचे समजते.

आंतरराष्ट्रीय: ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात निदर्शने; हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, कारण काय?
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, या रॅलीत 'ऑस्ट्रेलिया फर्स्ट' च्या घोषणा देण्यात आल्या आणि स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. प्रचार साहित्यात भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य केले. निदर्शनांमुळे तणाव वाढला, सरकारने या रॅलीचा निषेध नोंदवला आणि सामाजिक एकतेचे आवाहन केले. ही रॅली सिडनी, मेलबर्न, कॅनबरा यासह अनेक राजधानी शहरांमध्ये झाली ज्यात मुख्यतः भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य करण्यात आले.

महाराष्ट्र: राज ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचं सडेतोड उत्तर; 'आधी माहिती घ्यायला हवी होती...'
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठा आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले होते. यावर शिंदेंनी पलटवार करत मराठा आरक्षण कुणामुळे गेले त्यांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारायला हवा होता. आम्ही मराठा समाजाला १०% आरक्षण दिले, कुणबी नोंदी शोधल्या, नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली. पण आधीच्या सरकारने काय केले? असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय: रशिया, चीन ब्रिक्सची ताकद वाढवणार; पुतिन यांचा अमेरिकेवर निशाणा!
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले, 'ब्रिक्स देशांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात अडथळा आणणाऱ्या भेदभावपूर्ण निर्बंधांविरुद्ध रशिया आणि चीनने एक समान भूमिका घेतली आहे. रशिया आणि चीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी संयुक्तपणे संसाधने एकत्रित करत आहेत आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्रिक्स संघटनेची ताकद वाढवण्यासाठी काम करत आहेत. '

महाराष्ट्र: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकीत काय झाला निर्णय?
सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणापत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या मागण्यांबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. मागण्यांवर निर्णय घेताना आणि घेतल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण होऊन नये म्हणून राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याचे ठरले.

मुंबई: मराठा आरक्षण: आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, संतप्त घोषणाबाजी!
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर त्यांची भेट घेतली. आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी केली.

मुंबई: सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाल्या, 'मी आयुक्तांशी बोलते'
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (३१ ऑगस्ट) मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. त्यांना इलेक्ट्रॉल घेण्याची विनंतीही केली. यातून आपण सगळे मार्ग काढू असेही त्या जरांगे यांना म्हणाल्या.

मुंबई: मराठा आरक्षण: 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे पवारांनी जाहीर करावं': विखे-पाटील
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विखे-पाटलांनी पवारांवर टीका केली. सत्तेत असताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही? राजकीय स्वार्थासाठी पवारांचे प्रयत्न असल्याचा आरोप विखे-पाटलांनी केला.

राष्ट्रीय: भाजपच्या माजी आमदारासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण
भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया, अमरेलीचे माजी पोलीस अधीक्षक जगदीश पटेल, माजी पोलीस निरीक्षक अनंत पटेल यांच्यासह १४ जणांना दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अहमदाबाद शहर लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. २०१८ मध्ये एका बिल्डरचे अपहरण करून बिटकॉइन लुटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने माजी आमदारासह १४ जणांना दोषी ठरवले.

राष्ट्रीय: PM मोदींच्या चीन दौऱ्यावर काँग्रेसचा हल्ला; क्लीन चिट दिल्याची टीका!
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यावर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे. गलवानमधील शहीदांना विसरून मोदींनी चीनच्या अध्यक्षांशी हस्तांदोलन केले, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. तसेच, त्यांनी गलवानसाठी चीननला क्लीन चिट दिल्याची टीकाही केली.

महाराष्ट्र: "मराठा जातीने मागास नाहीत, कोर्टात अडकवायचं आहे का?", चंद्रकांत पाटलांचा जरांगेंना सवाल
सर्व मराठा समाजाला कुणबी करणे कायद्यात बसत नाही. मराठा समाज हात जातीने मागास नाहीये. त्यांना दलितांसारखी वागणूक मिळालेली नाही. त्यांना गावाबाहेर रहा, स्पर्श करू नको, अशी वागणूक मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक आरक्षण देता येत नाही. आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं आरक्षणच देता येऊ शकते, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मांडली.

मुंबई: ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; उद्यापासून जलत्याग करणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही. उद्यापासून पाणी त्यागून उपोषण सुरू करणार. येत्या शनिवारी-रविवारी मुंबईत एकही मराठा घरात थांबणार नाही. सर्वांनी शांततेत आंदोलन करायचे. मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजू नये तर समाजाची वेदना समजावी. आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांतता राखायची. काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.