
मुंबई: उपमुख्यमंत्र्यांनी धमकी देणे शोभते का?; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या!
अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांनाही दम दिला. अजित पवारांवर यामुळे टीकेची झोड उठली असून, अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला. अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मुंबई: लालबागच्या राजाचे विसर्जन: चंद्रग्रहणापूर्वी रात्री ९ वाजता निरोप!
जवळपास ३३ तासांनंतर, लालबागच्या राजाचे विसर्जन रात्री ९ वाजता करण्यात आले. भरती लवकर आल्याने व गिरगाव चौपाटीवर जाण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाल्याने अडचणी आल्या होत्या. अखेर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी राजाला निरोप देण्यात आला. भक्त उत्साहात होते.

राष्ट्रीय: PM मोदी देशाचे शत्रू, ट्रम्प tariff चा हवाला देत खरगेंची टीका
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'देशाचे शत्रू' असल्याची टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या tariff धोरणांचा उल्लेख करत खरगेंनी मोदींवर देशाचे वातावरण बिघडवल्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही खरगे यांनी केला.

नागपूर: ओबीसी आणि मराठा आरक्षणावर सरकार ठाम: चंद्रशेखर बावनकुळे
ओबीसी संघटनांना आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. मराठा व ओबीसी आरक्षणासाठी उपसमिती कार्यरत असून तिच्या शिफारशींमुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील. ओबीसी आणि मराठा आरक्षणावर सरकार ठाम आहे, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी प्रतिक्रिया महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बीड: बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावता न येणे खेदजनक: धनंजय मुंडे
बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावता न येणे सामाजिक समता नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. महापुरुषांना जातीत वाटून घेणे चिंताजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन जातीय भेदभावाला दूर ठेवा, असे आवाहन मुंडेंनी केले.

राष्ट्रीय: पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूरचा दौरा करणार आहेत. काँग्रेसने या दौऱ्यावरुन सरकारवर बोचरी टीका केली. काँग्रेसने म्हटले की, '२९ महिन्यांनंतर पंतप्रधान मणिपूरला जात आहेत, पण फक्त ३ तास तिथे घालवणार! हा मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे.'

राष्ट्रीय: संसदेत भाजपची कार्यशाळा: PM मोदी शेवटच्या रांगेत!
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी संसदेत भाजपच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात झाली आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी संसदेच्या आवारातून एक फोटो समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच चकीत केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्वतः मोदी आले होते, परंतु पुढच्या रांगेऐवजी ते सामान्य कार्यकर्त्यांसारखे सभागृहाच्या शेवटच्या रांगेत बसलेले दिसले.

आंतरराष्ट्रीय: जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देणार? कारण काय?
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात फूट टाळण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जुलैच्या निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर दबाव वाढला होता, यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला.

क्राइम: ११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार
११ वर्षाची मुलगी. तिच्या पोटात दुखायला लागलं. तिने आईवडिलांना सांगितलं. तिला घेऊन पालक रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सगळ्यांना धक्काच बसला. कारण मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत आढळून आलं. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावात ही घटना घडली आहे.

महाराष्ट्र: "याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; सुषमा अंधारेंनी बाबा जगतापांचा व्हिडीओच शेअर केला
ज्या व्यक्तीने अजित पवारांना कॉल केला होता, त्याच्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या व्यक्तीचे नाव बाबा जगताप असून, ते संरपच असल्याचे समोर आले आहे. ग्राम पंचायत कार्यालयात ते गांजा सेवन करत असल्याचा दावा शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

मुंबई: लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवण्यात येतेय अडचण
सुमारे २४ तास चाललेल्या मिरवणुकीनंतरलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र अखेरच्या क्षणी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात किरकोळ विघ्न आलं असून, विसर्जनासाठी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन काही काळ खोळंबलं आहे.

क्राइम: धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला!
दिल्लीतील ऐतिहासिक लालकिल्ला परिसरात जैन समुदायाकडून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक कोटींचा मंगल कलश आणण्यात आलेला होता. व्यासपीठावर मांडलेल्या पूजेच्या ठिकाणचा सोन्याचा मंगल कलश चोरीला गेला. मंगल कलश घेऊन फरार होणारा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून तो अनेकवेळा तिथे आला. रेकी केली आणि नंतर संधी मिळताच चोरी केली.

व्यापार: "जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा"; निर्मला सीतारामन यांचे विधान
"जर तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा मिळत नसेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी तिथे येईन. जर कुणी वस्तुंच्या किंमती कमी केल्या नाही. तर लोकांनी त्याची माहिती द्यावी", असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्या एका मुलाखतीत बोलत होत्या.

राष्ट्रीय: डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांचे कौतुक केले. यापूर्वी ट्रंप यांनी दोन्ही देशांच्या विशेष संबंधांचे कौतुक केले होते. त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, 'नेहमीच मोदी हे माझे मित्र राहतील. मात्र, सध्या मोदी जे करत आहेत, त्या गोष्टी मला पसंत नाहीत.' आपल्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीबद्दल ट्रंप यांनी नेमके स्पष्टीकरण दिलेले नाही.

मुंबई: भाजपा मुंबईनं नेमला अभ्यास गट, शेट्टी, मेहता, गुप्ता, मिश्रा, शर्मांवर जबाबदारी
मुंबई भाजपा आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. त्यातच नवे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसलेल्या इमारतीतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोपाळ शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. मात्र या समितीच्या सदस्यांवरून सोशल मीडियात काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र: मराठा आरक्षणासाठी टक्केवारी वाढ आवश्यक, तरच कायमस्वरूपी तोडगा: थोरात
मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. यापूर्वीही गुलाल उधळला, पण काय झाले? ओबीसीतून आरक्षण दिल्याने प्रश्न सुटणार नाही, टक्केवारी वाढवल्यासच कायमस्वरूपी तोडगा निघेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना मिळणार खास मान?
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना विशेष मान मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी दोघांनी एकत्र नेतृत्व करावे अशी लोक भावना आहे. आता दसरा येईल त्यात निश्चितपणे एखादी चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा केली तरी हरकत नाही परंतु नक्कीच यावेळचा दसरा मेळावा न भूतो, न भविष्य असा असेल असं सचिन अहिर यांनी सांगितले.

व्यापार: भारत टॅक्सी: ओला-उबरला टक्कर देणारी स्वस्त सेवा लवकरच!
अमित शहांची 'सहकार टॅक्सी' लवकरच 'भारत टॅक्सी' नावाने सुरू होण्याच्या तयारीत आहे. ओला-उबरला स्वस्त पर्याय असून यात चालकांना जास्त फायदा होणार नाही, याशिवाय सर्ज प्राइसिंग नाही. दिल्ली-गुजरातमध्ये या सेवेची पहिले सुरूवात होणार असून नंतर देशभरात विस्तार होणार आहे.

आंतरराष्ट्रीय: अमेरिकन मंत्री संतापला, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी!
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी रशियाकडून तेल खरेदी आणि चीनसोबतच्या संबंधांवरून भारतावर टीका केली. भारताने अमेरिकेची माफी मागावी, बाजारपेठ खुली करावी, रशियाशी संबंध कमी करावे, ब्रिक्समधून बाहेर पडावे अशा ४ अटी त्यांनी घातल्या. पुढील १-२ महिन्यात भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल. ही चर्चा ट्रम्प यांच्या शर्तींवर असेल असा दावा लुटनिक यांनी केला आहे.

राष्ट्रीय: निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का! NDA मधून आणखी एका मित्रपक्षाची Exit!
निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का! तामिळनाडूत टीटीवी दिनाकरन यांच्या AMMK नी NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. द्रमुकचे सगळे घटक एकत्रित आणण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. त्यात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी AMMK बिनशर्त एनडीएत सहभागी झाली होती. परंतु AIADMK ने त्यांना विरोध केला होता. आता तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी दिनाकरन यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

व्यापार: ट्रम्प यांच्यामुळे GST बदलला? अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की GST दर ट्रम्प यांच्यामुळे बदलले नाहीत. ही प्रक्रिया मागील दीड वर्षांपासून सुरू होती. GST दर कमी करण्यापूर्वी प्रत्येक वस्तूवर चर्चा झाली, आणि हे काम एका दिवसात होऊ शकत नाही. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार पाऊले उचलते, असंही त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय: पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा रद्द, जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचे प्रतिनिधित्व
गेल्या काही दिवसांमध्ये भारत-अमेरिकेतील संबंध कमालीचे बिघडललेले असतानाच पंतप्रधान मोदींचा पूर्वनियोजित अमेरिका दौरा रद्द झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, ते २७ सप्टेंबर रोजी आमसभेला संबोधित करतील.

क्रिकेट: विराट-युवराज मैत्रीवर योगराज सिंगांचा हल्लाबोल; 'पाठीत खंजीर खुपसणारे' ठरल्याचा आरोप
युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहलीवर गंभीर आरोप केले आहेत. 'विराट आणि धोनीसह अनेकांनी युवराजच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ सचिन तेंडुलकरनेच त्याला साथ दिली,' असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी, मच्छीमार त्रस्त
महाराष्ट्राच्या समुद्रात ६०० चिनी जहाजे व परराज्यातील बोटींची घुसखोरी! लाखो टन मासळीची लूट, मच्छीमार संकटात. कारवाईची मागणी! - लोकमत न्यूज नेटवर्क.

मुंबई: गणेश विसर्जन २०२५: एआय ट्रॅकिंग, ड्रोन आणि २५ हजार पोलिस सज्ज
लोकमत: मुंबईत गणेश विसर्जनासाठी एआय ट्रॅकिंग, ड्रोन आणि २५ हजार पोलिसांचा बंदोबस्त! ६,५०० सार्वजनिक आणि लाखो घरगुती गणपतींचे विसर्जन होणार. वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर. संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्ही आणि सायबर पोलिसांची नजर. नागरिकांसाठी हेल्पलाइन उपलब्ध.

मुंबई: बाप्पाला निरोप, वरुणराजाची साथ, प्रशासनाचे निर्विघ्न विसर्जनाचे नियोजन.
दहा दिवसांच्या भक्तिभावाने पार पडलेल्या गणरायाच्या आराधनेनंतर, शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार आहे. या विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने सुरळीत आणि सुरक्षित व्यवस्थेसाठी सखोल तयारी केली आहे. दरम्यान, निरोपाच्या दिवशी वरुणराजाही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यामुळे पावसातही गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.्

आंतरराष्ट्रीय: भारत माफी मागेल, चर्चेसाठी टेबलवर येईल; ट्रम्प यांच्या सचिवांची धमकी!
भारताने माफी मागावी आणि चर्चेसाठी तयार राहावे, अशी ट्रम्प यांच्या सचिवांनी धमकी दिली आहे. भारत-अमेरिका संबंध ताणले, कारण भारत रशिया आणि चीनच्या जवळ जात आहे. भारताने अमेरिका किंवा रशिया-चीनमध्ये निवड करावी, अन्यथा ५०% कर भरावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पुणे: वनराज आंदेकर हत्याकांड: बदला! नाना पेठेत आयुष कोमकरचा खून
पुण्यात वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. आंदेकर टोळीने नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. आयुष कोमकरचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. या घटनेवरून आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्याची आग अद्याप धुमसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यापार: सिगारेट, तंबाखू महागणार! ४०% जीएसटीनंतर 'सेस'चा अतिरिक्त भार?
सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% जीएसटी व्यतिरिक्त 'सेस' लागू होण्याची शक्यता आहे. कराचा भार कमी करण्यासाठी राखण्यासाठी सरकार विचार करत आहे. लक्झरी गाड्यांवर मात्र कोणताही अतिरिक्त कर ठेवलेला नाही. २८% चा हानिकारक उपकर डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

फुटबॉल: अनोळखी अब्जाधीशाने फुटबॉलपटू नेमारला दिली १० हजार कोटींची संपत्ती!
ब्राझीलमधील एका अनोळखी अब्जाधीशाने फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला १० हजार कोटींची संपत्ती दान केली! दोघांची कधी भेट झाली नाही. नेमारचे वडिलांशी असलेले चांगले संबंध पाहून हा निर्णय घेतला. कोर्टाची मंजुरी बाकी आहे, या अब्जाधीशाने जूनमध्ये आपले मृत्यूपत्र बनविले होते, त्याला मुलबाळ नव्हते.

राष्ट्रीय: भारताचे पीटर नवारोंना चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले
पीटर नवारो यांच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांचे भारताने खंडन केले. भारत-अमेरिका संबंध मजबूत असून ते समान हितसंबंध आणि लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.