
आंतरराष्ट्रीय: चांगली डील जिथे, तेल घेऊ तिथेच! अमेरिकेला भारताचा इशारा
अमेरिकेच्या टॅरिफला भारताचे सडेतोड उत्तर! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार. राजदूत विनय कुमार म्हणाले, 'जिथे स्वस्त मिळेल, तिथून तेल खरेदी करू,देशहित महत्त्वाचे!' ऊर्जेची गरज पूर्ण करणारच!

नागपूर: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

व्यापार: अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर! भारत 'या' ४० देशांसोबत करणार व्यापार!
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतातील कापड व्यवसायावर पडणार आहे. टॅरिफमुळे अमेरिकेतून कपड्यांची मागणी कमी होणार आहे. ऑर्डरमध्ये घट झाली, तर त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येईल. उत्पादन कमी झाले, तर लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. त्यामुळेच आता भारत सरकार ४० देशांमध्ये कपड्यांच्या निर्यातीचा विचार करत आहे.

राष्ट्रीय: गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय?
गंगेच्या मुख्य स्त्रोत असलेल्या गंगोत्री हिमनदीबद्दल चिंता वाढवणारी बाब एका संशोधनात दिसून आली आहे. गंगोत्री ग्लेशियर मागील ४० वर्षांत १० टक्क्यांनी वितळले असून, हे पर्यावरण बदलामुळे होत आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या नव्या अभ्यासात हे आढळून आले.

राष्ट्रीय: भाजपा नेत्याची इच्छा मृत्यूची मागणी; मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, कारण...
छत्तीसगडमधील भाजपा नेते विशंभर यादव यांनी आर्थिक अडचणींमुळे मुख्यमंत्र्यांकडे इच्छामृत्यूची मागणी केली. २ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला जाताना बस अपघातात ते कायमचे दिव्यांग झाले. त्यानंतर पक्षाकडूनही मदत न मिळाल्याने ते हतबल झाले. आता उपचारासाठी पैसेही नसल्याने त्यांनी इच्छामरण मागितले आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बघेल यांनी यादव कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले आहे.

क्राइम: पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून; संतप्त जमावाकडून तोडफोड
बिहारची राजधानी पाटण्यात एका १२ वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर अत्याचार केला गेला असावा. कुणीतरी तिला जाळले आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, लोकांनी घटनेनंतर शाळेत तोडफोड केली. आग लावण्याचाही प्रयत्न केला.

राष्ट्रीय: ट्रम्प यांच्या फोनमुळे मोदींनी युद्ध थांबवले; राहुल गांधींचा गंभीर आरोप!
राहुल गांधी यांनी बुधवारी(दि.२७) बिहारमधील मुझफ्फरपूर येथील 'मतदार हक्क यात्रे'तून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत राहुल म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरुन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानविरोधातील कारवाई थांबवली.'

महाराष्ट्र: मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनाची सशर्त परवानगी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. मात्र, सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. मात्र, आता न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी घातल्या आहेत.

राष्ट्रीय: गुजरातमध्ये निनावी पक्षांना देणगी; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
राजकीय पक्षांनी घेतलेल्या देणग्यांवरुन देशात अनेकवेळा राजकीय गदारोळ उडाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी तर हा मुद्दा लावून धरला होता. आता दैनिक भास्करच्या एका वृत्ताचा हवाला देत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. दैनिक भास्करच्या दाव्यानुार, गुजरातमधील १० निनावी पक्षांना ५ वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

क्राइम: सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला...
सचिन ग्रोवर आणि शिवानी ग्रोवर या दाम्पत्याने आधी त्यांच्या वर्षाच्या मुलाला विष दिलं. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज वाढले आणि मिळकत घडल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री ही घटना घडली.

राष्ट्रीय: अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नीचे राजस्थान दौरे!
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ठावठिकाण्यासंदर्भात विविध प्रकारचे तर्क लावले जात आहेत. राहुल गांधी म्हणाले, जी व्यक्ती राज्यसभेत एवढे बोलत होती, ती व्यक्ती अचानक गप्प झाली आहे. अमित शाह यांनी आरोग्याचे कारण दिले. दरम्यात, त्यांची पत्नी सुदेश धनखड जयपूरमधील आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी राजस्थानला जात असतात. तर धनखड योग, टेबल टेनिस आणि चित्रपटांचा आनंद घेत आहेत.

क्रिकेट: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, आता परदेशी लीगमध्ये धमाका!
भारतीय फिरकीपटू आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेत क्रिकेट विश्वाला धक्का दिला. अश्विन आता जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. अश्विनने बीसीसीआय आणि आयपीएलचे आभार मानले असून नव्या सुरुवातीसाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.

व्यापार: भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली!
एसबीआयच्या अहवालानुसार, भारतावर अधिक शुल्क लावण्याचा उलटा परिणाम अमेरिकेवरच होऊ शकतो.नव्या टॅरिफमुळे अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ घसरून 40-50 बेसिस प्वाइंट वर येऊ शकतो. अमेरिकेत, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासारख्या पूर्णपणे आयातीवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. हा टॅरिफ आज सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून लागू झाला आहे.

महाराष्ट्र: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शन घेतले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी दाखल झाले. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून मनसे-शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. त्यात ठाकरे कुटुंबातील दुरावा कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर निवासस्थानी जात राज ठाकरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले आहे.

जालना: मोदी-शाहांच्या सरकारमध्ये देवदेवतांच्या नावाखाली हिंदूंची अडवणूक: जरांगेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटलांचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप! मराठा आरक्षणाच्या आड सरकार देव-देवतांना आणत असल्याचा आरोप. फडणवीसांवरही निशाणा साधला. ही मराठा आरक्षणासाठीची शेवटची लढाई असून शांततेत जिंकण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच राजकारणात असलेल्या मराठ्यांना त्यांनी समाजाचं रक्षण करण्याची संधी सोडू नका, असे आवाहन करत सगळ्यांनी साथ देण्याची विनंती केली.

आंतरराष्ट्रीय: भारतासमोर अमेरिकेचं धोरण अयशस्वी; मोदींनी का टाळले ट्रम्प यांचे फोन?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर मोदी नाराज असल्याचं बोलले जाते. मोदींनी ट्रम्प यांचे ४ फोन टाळल्याचा दावा एका जर्मन वृत्तपत्राने केला आहे. भारत चीनविरोधात अमेरिकेसोबत उभा राहण्यास तयार नाही. अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास भारताचा नकार, मोदी आणि ट्रम्प यांच्यात शेवटचे बोलणे १७ जून रोजी झाले होते. २७ ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लागू झाला आहे.

जालना: मुंबई मोर्चा: 'शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही,' मनोज जरांगेंचा निर्धार!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईच्या दिशेने एल्गार! 'शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अमित शहांना हिंदू विरोधी कारवायांवर सवाल आणि फडणवीसांवरही निशाणा साधला. तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करत, जरांगे यांनी आरपारच्या लढाईचा नारा दिला.

जालना: मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाला जालना पोलिसांची 40 अटींसह परवानगी!
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाला जालना पोलिसांनी 40 अटींसह परवानगी दिली. सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार. शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन.

महाराष्ट्र: अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावोगावी स्वागताची जय्यत तयारी
न्यायदेवता आमचे म्हणणे ऐकून आम्हाला न्याय देईल, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाणार असल्याचे सूचित केले आहे. अंतरवाली सराटी येथून बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मनोज जरांगे यांच्यासह समाजबांधव मुंबईकडे निघणार आहेत.

महाराष्ट्र: वसईत मोठी दुर्घटना: चार मजली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू!
वसई येथे एका चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. - लोकमत

राष्ट्रीय: वैष्णोदेवी भूस्खलन: ३० जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती!
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रेदरम्यान भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे यात्रा स्थगित. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गाड्या रद्द: लोकमत.

आंतरराष्ट्रीय: अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून
अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे.

राष्ट्रीय: सर्व भारतीयांचा DNA एकच; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
मोहन भागवत म्हणतात, जेव्हा आपण हिंदू राष्ट्राबद्दल बोलतो, तेव्हा लोक प्रश्न उपस्थित करतात. आपला देश आधीपासून अस्तित्वात आहे. हिंदू हा शब्द काढून टाकला, तरी देशाचा विचार केला पाहिजे. आपण हिंदू राष्ट्र म्हटले, तर आपण कोणाला तरी सोडून जात आहोत, ते योग्य नाही. आपण कोणाच्याही विरोधात नाही.

राष्ट्रीय: ट्रम्प यांचे ४ फोन, PM मोदींचा बोलण्यास नकार: जर्मन वृत्तपत्राचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लावल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. अशातच, एका जर्मन वृत्तपत्राने दावा केला आहे की, ट्रम्प यांनी टॅरिफ वादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार वेळा फोन केला, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.

नागपूर: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा, मुसळधार बरसणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, २७ ऑगस्टपासून विदर्भात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्हे पावसाने व्यापले जातील. बुधवारी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय: वैष्णोदेवी यात्रेत भूस्खलन: ५ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; यात्रा स्थगित
माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर आज(दि.२६) भूस्खलनाची घटना घडली आहे. अर्धकुंवारीजवळ घडलेल्या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कटरा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बचाव कार्य सुरू असून, मार्गावरील इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

आंतरराष्ट्रीय: चीनमध्ये SCO शिखर बैठक: २० देशांचे प्रमुख नेते हजर राहणार, अमेरिकेला आव्हान?
चीनमधील SCO शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह २० देशांचे प्रमुख नेते एकत्रित येणार आहेत. यात ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांना प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. मोदी आणि पुतिन यांच्या उपस्थितीने अमेरिकेवर दबाव वाढेल. संमेलनातील सदस्य देश संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करतील, ज्यात सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर भर दिला जाईल. हे शिखर संमेलन अमेरिकेच्या विरोधात एक मजबूत आघाडीचं चित्र जगाला दिसणार आहे.

राष्ट्रीय: वडोद्यात गणेश मूर्तीवर अंडी फेकली; चौघे ताब्यात
गुजरातमधील बडोदा शहरात पवित्र गणेश चतुर्थी सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील पाणीगेट परिसरात काल (२५ ऑगस्ट) रात्री ३ वाजता निर्मल पार्क युथ क्लबने स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर समाजकंटकांनी अंडी फेकल्याची घटना घडली आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, सध्या चौकशी सुरू असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र: जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनास मनाई; हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते यांचा टोला
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला हायकोर्टाने मनाई केली आहे. सदावर्ते यांनी निर्णयाचे स्वागत केले तर जरांगे यांनी न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंचे आंदोलन राजकीय आहे. त्यांचे आंदोलन मराठा समाजाची दिशाभूल करणारे आहे. आझाद मैदानातील आंदोलनाच्या संहिता सगळ्यांना लागू आहे. न्यायालयापेक्षा कुणी मोठे नाही. जर न्यायालयाचा अवमान केला तर ६ महिने जेलमध्ये राहावे लागेल असं सदावर्ते म्हणाले.

जालना: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने गणेशोत्सवामुळे आझाद मैदानावरील परवानगी नाकारली तरी, जरांगे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आमचे वकील या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागतील. न्यायदेवता नक्कीच न्याय देईल, असे जरांगे म्हणाले.

राष्ट्रीय: जम्मूच्या डोडा येथे ढगफुटी; चार जणांचा मृत्यू, अनेक घरं वाहून गेली!
जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात ढगफुटी झाली आहे. यामुळे १० हून अधिक घरे वाहून गेली आहेत. ढगफुटीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालपासून आलेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित भागात मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.