
आंतरराष्ट्रीय: भारताने मोठे मन दाखवत पाकिस्तानला दिला पुराचा इशारा
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, मात्र आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय: भाजप आणि RSS मध्ये कोणताही वाद नाही: मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
राष्ट्रीय स्वायंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारंभाच्या आज(दि.२८) तिसऱ्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संघावर उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, आरएसएस आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. संघाचा केंद्र आणि राज्य सरकारांशी चांगला समन्वय आहे.

महाराष्ट्र: एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. आजच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आमचे संबंध फार चांगले आहेत. कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद आहे. आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आम्ही दरवर्षी येतो, पण यावर्षी काही पहिल्यांदात आले आहेत असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

नवी मुंबई: नवी मुंबईत मराठा मोर्चा: वाहतूक बदल, कोणते रस्ते बंद आणि खुले?
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. हा मोर्चा मुंबईकडे येत असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल केले गेले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते सामान्य वाहनांसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर पर्यायी रस्तेही खुले करण्यात आले आहेत.

सखी: प्रेमासाठी काही पण! क्वांटम डेटिंग: तरुणाईचा नवा ट्रेंड..
क्वांटम डेटिंग म्हणजे बंधनमुक्त नातेसंबंध! कमिटेमेंट नको पण नातं हवं असं सांगणारा एक नवीन ट्रेंड. अनेकांना आपलं करिअर, जगण्यातली अनिश्चतता यामुळे नात्याची कमिटमेंट नको वाटते, पण प्रेम आणि सहवास हवासा वाटतो. त्यातून हे नातं तयार होतं. अर्थात त्याचेही अनेक फायदेतोटे आहेतच.

आंतरराष्ट्रीय: रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४८ जण जखमी आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, कीववरील रशियन हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन मुलांचा समावेश आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय: 'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले
हिमाचल प्रदेशपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणी नद्यांना महापुर आले असून, भारतीय लष्कर पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी उतरले आहे. पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये पुराने वेढा दिल्याने मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या २७ जणांना भारतीय लष्कराने सुखरुपपणे बाहेर काढले.

मुंबई: मराठा समाजावर कुणावरही अन्याय होऊ देणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढणार, कुणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली. आंदोलन लोकशाहीच्या चौकटीत असावे, असे आवाहन करत मराठा नेत्यांनी अभ्यासपूर्ण मागणी मांडावी, असेही ते म्हणाले.

सखी: मुलांच्या डब्याला काय द्यायचं? रवाबेसन इडलीचा बेस्ट पर्याय
मुलांच्या डब्याला रोज काय द्यायचं असा प्रश्न गंभीरच असतो. शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही रवा बेसन मसाला इडली हा झटपट सोपा आणि पौष्टिक पर्याय आहे. रवा, बेसन, दही, मसाले मिक्स करून पीठ तयार करा. इडल्या वाफवून घ्या आणि मसालेदार फोडणीत टाका. चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता!

सखी: कुकर लावताना रोज 'या' ४ गोष्टी तपासा, स्फोट टाळा!
कुकर वापरताना घ्या दक्षता! जास्त पदार्थ भरू नका, पुरेसे पाणी वापरा. झाकण व शिट्टी स्वच्छ ठेवा, गॅस्केट तपासा. नियमित तपासणीने कुकरचा स्फोट टाळा आणि सुरक्षित राहा.

सखी: सुमंथा रुथ प्रभूचा शुगर कंट्रोल करण्याचा सोपा उपाय
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने 'मील सिक्वेन्सिंग'ने शुगर नियंत्रणात आणली. प्रथम भाज्या, मग प्रोटीन आणि शेवटी कर्बोदके खाल्ल्याने रक्तातील साखर हळूहळू वाढते. हा उपाय वजन कमी करण्यास आणि मधुमेह टाळण्यास मदत करतो असं ती सांगते. तिने हा उपाय केल्यावर तब्येतीत सुधारणाही झाली.

सखी: भाजी अन् मास्क विकली, कष्टानं शिकून झाली अधिकारी!
मधुबनीची पूजा कुमारी BPSC परीक्षेत उत्तीर्ण! भाजी विकली, मास्क शिवले, पण हार मानली नाही. कुटुंबाच्या त्यागातून आणि पूजानच्या जिद्दीने तिला यश मिळालं. आज ती बिहारमध्ये अधिकारी आहे, जी लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे! तिची ही गोष्ट..

व्यापार: भारतासाठी मोठी बातमी! अमेरिकेला मागे टाकत बनू शकते दुसरी मोठी अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था २०३० च्या अखेरीपर्यंत २०.७ ट्रिलियन डॉलरवर पोहचू शकते. तर २०३८ पर्यंत ३४.२ ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, असा अंदाज ईवाय इकॉनॉमी वॉचने व्यक्त केला आहे. पीपीपी विनिमय दराने अर्थात क्रयशक्ती समता सूत्राच्या आधाराने हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रीय: शी जिनपिंग यांचे 'गुप्त पत्र', मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संबंध सुधारणार?
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यापूर्वी भारत आणि चीन यांच्यातील संबंधांबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे चर्चेला सुरुवात झाली असल्याचं समोर आले. अमेरिकेच्या धोरणांवर चिंता व्यक्त करत, त्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यात सीमावाद आणि व्यापारावर चर्चा सुरू झाली. ट्रम्प यांच्या शुल्क धोरणामुळे भारत नवीन भागीदार शोधत आहे.

सखी: भारताच्या लेकीची कमाल, २ गोल्ड मेडल जिंकले आणि..
वेटलिफ्टर कोयल बारने कॉमनवेल्थ स्पर्धेत 2 सुवर्णपदके जिंकून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले! वडील मिथुन, पूर्वी वेटलिफ्टर होते, त्यांनी तिला प्रशिक्षण दिले. कोयलने 53 किलो गटात 192 किलो वजन उचलून विक्रम मोडला. कुटुंब आणि गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वजण तिच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत!

राष्ट्रीय: IIT पदवीधराने ८ कोटींचे पॅकेज असणारी नोकरी ५ महिन्यात सोडली; कारण काय?
META मध्ये ८ कोटींचे पॅकेज मिळालेल्या IIT बॉम्बेच्या ऋषभ अग्रवालने अवघ्या ५ महिन्यात नोकरी सोडली. काहीतरी नवीन करण्याची इच्छा असल्याने त्याने हा निर्णय घेतला. गूगल आणि मेटामध्ये काम करूनही तो समाधानी नव्हता. त्याच्यासोबत इतर रिसर्चर्सने देखील राजीनामा दिला. मेटामधून नोकरी सोडणे हा सर्वात कठीण निर्णय असल्याचे त्याने म्हटलं. काही तरी वेगळे करायचंय हा विचार डोक्यात असल्याने राजीनामा दिल्याचं त्याने म्हटलं.

राष्ट्रीय: धक्कादायक: काँग्रेसच्या कार्यक्रमात पीएम मोदीना शिव्या
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव 'मतदान अधिकार यात्रे'च्या निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या भाषणांमधून राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर मत चोरीचा आरोप करत आहेत. अशातच, दरभंगा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात पीएम मोदींना आईच्या नावाने शिव्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र: "गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही", जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
"मी मॅनेज होत नाही. फडणवीस साहेब, मी हटत नाही. तुम्ही गोळ्या जरी घातल्या, तरी मनोज जरांगे झेलणार आहे. पण, आता मागे हटत नाही", असा इशारा मनोज जरांगे यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रीय: मतदानानंतर रेशन आणि आधारही काढून घेतील; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला
बिहारमधी जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही घेतील. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.

फिल्मी: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालंय. त्यांनी दूरदर्शनवरील 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' मालिकेत साकारलेली 'गुंड्याभाऊ'ची भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेत दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. तीन दिवसांपूर्वीच बाळ कर्वे यांनी त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा केला होता.

महाराष्ट्र: तर मुख्यमंत्र्यांचं राजकीय करिअर बरबाद होईल" जरांगे पाटलांचा इशारा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्याचे मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली तर, येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील, असाही इशारा त्यांनी दिला.

क्राइम: आमदाराच्या मुलाच्या घरी काम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या आमदार चंदा सिंह गौर यांच्या मुलाच्या बंगल्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सपना असे २० वर्षीय तरुणीचे नाव आहे, तिच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, बंगल्यातील सर्व सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केले आहेत.

राष्ट्रीय: लेकीच्या वाढदिवसाचा केक कापला आणि ५ मिनिटांत इमारत कोसळली
विरारमध्ये इमारत दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेला आहे, या दुर्घटनेत जोईल कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर पाच मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला आहे. तर वडील बेपत्ता आहेत.

सखी: पाण्याच्या बाटल्यांना घाणेरडा वास येतो?
शाळेच्या-ऑफिसच्या पाण्याच्या बाटलीला दुर्गंधी येेते, शेवाळंही साचतं. झाकणं खराब होतात, त्यामुळे इन्फेक्शनचाही धोका असतो. म्हणून बाटल्या स्वच्छ धुणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी काही सोपे उपाय आहेत, ते पाहा कसे करायचे..

वसई विरार: विरार इमारत दुर्घटना: १४ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, चाळही उद्ध्वस्त.
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू! ३० तासांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. ढिगाऱ्याखाली चाळ दबल्याने मृतांचा आकडा वाढला. जखमींना रुग्णालयात केलं दाखल.

आंतरराष्ट्रीय: पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प; म्हणाले...
रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. यातच आता ट्रम्प यांनी आपला राग झेलेन्स्कीवरच काढला आहे. "यासाठी एकालाच दोषी ठरवणे चुकीचे आहे. हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, त्यांना वाचवायचे असेल, तर मला निर्बंध लादावे लागतील. हे प्रकरण माझ्या पद्धतीने सोडवावे लागेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी
महाविकास आघाडीमधील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी निवडणुकीत अनियमितता, बोगस मतदार आणि मृत मतदारांच्या नावावर मतदानाचे आरोप केले आहेत.

राष्ट्रीय: टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे भारतामधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यादरम्यान, भारत आणि अमेरिकेमधील व्यापाराबाबतच्या चर्चा अद्याप थांबलेली नाही, असे संकेत सरकारी सूत्रांकडून मिळाले आहेत. तसेच दोन्ही देशांमधील चर्चेचे दरवाजे अद्याप खुले आहेत, असे सांगितले जात आहे.

नागपूर: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

व्यापार: अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर! भारत 'या' ४० देशांसोबत करणार व्यापार!
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतातील कापड व्यवसायावर पडणार आहे. टॅरिफमुळे अमेरिकेतून कपड्यांची मागणी कमी होणार आहे. ऑर्डरमध्ये घट झाली, तर त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येईल. उत्पादन कमी झाले, तर लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. त्यामुळेच आता भारत सरकार ४० देशांमध्ये कपड्यांच्या निर्यातीचा विचार करत आहे.

राष्ट्रीय: गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय?
गंगेच्या मुख्य स्त्रोत असलेल्या गंगोत्री हिमनदीबद्दल चिंता वाढवणारी बाब एका संशोधनात दिसून आली आहे. गंगोत्री ग्लेशियर मागील ४० वर्षांत १० टक्क्यांनी वितळले असून, हे पर्यावरण बदलामुळे होत आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या नव्या अभ्यासात हे आढळून आले.