
फिल्मी: 'या अली' फेम गायक जुबीन गर्गचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
प्रसिद्ध गायक जुबीन गर्गचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला आहे. 'गँगस्टर' मधील 'या अली' हे त्याचं गाणं लोकप्रिय झालं होतं. हृतिक रोशनच्या 'क्रिश ३' सिनेमातही त्याने पार्श्वगायन केलं होतं. जुबीन गर्गच्या निधनानंतर आसामचे आरोग्य मंत्री अशोक सिंघल यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. संगीत जगतातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

सखी: जुने उपाय फेल! काळाकुट्ट- घाणेरडा गॅस बर्नर होईल मिनिटांत साफ, १ सोपी ट्रिक- खसाखसा घासण्याची गरजही नाही
अनेकदा गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी आपण विविध ट्रिक्स वापरतो. जेवण बनवताना यावर तेल सांडते, मसाले किंवा दूध पडते ज्यामुळे बर्नर खराब होतो पण स्वयंपाकघरात असणाऱ्या काही पदार्थांनी काळाकुट्ट झालेला गॅस बर्नर स्वच्छ करु शकतो. यासाठी काय करायला हवं जाणून घेऊया.

जालना: जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांचा रोष
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात हल्ला झाला. मनोज जरांगे यांच्यावरील टीका आणि मराठा आरक्षणाला विरोध यामुळे आंदोलकांनी रोष व्यक्त केला. गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात होते. ते एका आंदोलनस्थळी जात असतानाच ताफा अडवत त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला.

क्रिकेट: शुबमन गिल बाहेर, संजू सॅमसन इन? भारत-पाक सामन्यात बदल?
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार, मागच्या सामन्यातील वादातून पाकिस्तान बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शुबमन गिलच्या खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता. गिलला उपकप्तान बनविल्याने पदाच्या इज्जतीसाठी त्याला खेळवावे लागत आहे. परंतू, या सामन्यात गिलला परत संधी दिली जाते की संजू सॅमसनला त्याची जागा परत मिळते, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

सखी: छोट्याशा कुंडीत बोगनवेलियाचं झाड वाढवण्याची सोपी ट्रिक, बाल्कनीत बहरतील रंगबेरंगी फुले
बोगनवेलिया म्हणजे खरं तर फुलांचा राजा. हे झाडं आपल्या घरासह बाल्कनीचे सौंदर्य वाढवतात. याच्या रंगबेरंगी फुलांसाठी हे ओळखले जाते. पण अनेकदा प्रश्न पडतो की, हे रोप आपण घराच्या बाल्कनीत लावू शकतो का? घरच्या बाल्कनीत हे झाड कसे लावायचे पाहूया.

जालना: मनोज जरांगे यांच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत आज (रविवार, दि. 21 सप्टेंबर) अचानक मधमाश्यांचा हल्ला झाल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे बैठक काही काळासाठी थांबवावी लागली. दरम्यान, मधमाश्यांनी हल्ला करताच समन्वयकांनी जरांगे पाटलांच्या अंगावर उपरणी टाकून सुरक्षित ठिकाणी नेले.

महाराष्ट्र: भारत-पाक सामन्याच्या दिवशी एकनाथ शिंदेंचे X खाते हॅक, खळबळ!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते हॅक झाले, त्यावर पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे पोस्ट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सायबर सेलने तातडीने खाते पूर्ववत केले. भारत-पाकिस्तान संघामध्ये आज आशिया कपमधील सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. भारत-पाक सामन्याच्या दिवशी घडलेली ही घटना चिंताजनक आहे.

पुणे: 'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
"तुमच्या मनामध्ये काही असेल, ते शहराच्या फायद्याचे असेल, सरकारने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये बसणार असेल, तर ते करायला आमची हरकत नाही. पण, ते करत असताना तुम्ही कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात आम्ही ऐकणार नाही", असा इशारा अजित पवारांनी गुंडगिरी, दहशत निर्माण करणाऱ्यांना दिला.

आंतरराष्ट्रीय: H-1B व्हिसा: ५००० परदेशी आले अने १६००० अमेरिकन नोकरीवरून काढले; ट्रम्प प्रशासनाचा आरोप!
अमेरिकेत H-1B व्हिसा गैरवापरामुळे हजारो अमेरिकनांना नोकरी गमवावी लागली. कंपन्यांनी कमी पगारात परदेशी कामगारांना घेतले. एका कंपनीने ५००० H-1B व्हिसावर भरती करून १६००० अमेरिकनांना काढले, असा ट्रम्प प्रशासनाने आरोप केला आहे. अमेरिकेत काम करणाऱ्यांपैकी ७३ टक्के भारतीय कर्मचारी या व्हिसावर काम करत होते. ट्रम्प प्रशासनाने या व्हिसाचे शुल्क ५ लाखांवरून थेट ८८ लाख रुपये केले आहे, यामुळे अमेरिकेतील कंपन्यांना या कर्मचाऱ्यांना ठेवणे आता परवडणारे नाही.

मुंबई: आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांच्या विधानानं वाद
दादर-माहिम मतदारसंघातील माजी आमदार सदा सरवणकर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. निवडून आलेल्याला आमदाराला २ कोटी मिळतात पण आमदार नसताना मला २० कोटी मिळतात असं सरवणकरांनी म्हटलं. सरवणकरांच्या विधानामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा विरोधकांचा आरोप होतो. त्याचाच प्रत्यय या विधानातून आला. आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

सखी: टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते? ग्लिसरीनमध्ये मिसळून लावा १ पदार्थ- टाचा होतील मऊ
टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणं आहेत. सतत पाणी, धूळ, माती किंवा योग्य चप्पल न घातल्यास त्वचा कोरडी पडते. जर आपल्यालाही हा त्रास वारंवार होत असेल तर ग्लिसरीनमध्ये हा पदार्थ मिसळून लावल्यास टाचा मऊ होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय: PM मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यावर देशवासियांशी संवाद साधणार आहेत, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्याचबरोबर नवीन जीएसटी दरही लागू होत आहेत. या मुद्द्यांवर मोदी बोलणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे.

फिल्मी: अनुराग कश्यपला 'छावा' आवडला नाही; विकी कौशलवर नाराजी?
अनुराग कश्यपने 'छावा' चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. याशिवाय विकी कौशलबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'छावा' सिनेमा हॉलिवूड सिनेमा 'द पॅशन ऑफ द ख्राइस्ट'सारखा आहे, असं अनुरागने सांगितलं आहे. याशिवाय आता तो हिंदी सिनेमांपासून का दूर आहे, हेही त्याने नमूद केलं आहे. अनुरागची 'छावा'बद्दल इतकी नाराजी का आहे? याचं सविस्तर उत्तर त्याने अलीकडेच एका मुलाखतीत दिलं आहे. काय म्हणाला अनुराग?

राष्ट्रीय: पंतप्रधान मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला किस्सा
जेव्हा नरेंद्र मोदींशी पहिल्यांदा भेट कधी आणि कशी झाली, असा प्रश्न अमित शाह यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी जुना किस्सा सांगत आठवणींना उजाळा दिला. "मी पहिल्यांदा ८०च्या दशकात भेटलो होतो. दशकाच्या सुरूवातीला. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. अहमदाबादमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करण्यासाठी ते मी जिथे राहायचो, तिथे आले होते."

फिल्मी: "लोक शिवीगाळ करतात, पण..." असं का म्हणाले अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. ते सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ते व्यक्त होत असतात. अलीकडेच त्यांनी प्रेम या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टचा संबंध थेट रेखा यांच्याशी जोडला आहे.

आंतरराष्ट्रीय: बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा गंभीर परिणाम होतील; ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
अफगाणिस्तानने बगराम हवाई तळ अमेरिकेला परत द्यावे अन्यथा परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. तालिबानने बंड करून सत्ता ताब्यात घेतली तेव्हा अमेरिकेने हे तळ सोडले होते. पण, आता ट्रम्प यांनी पुन्हा या हवाई तळावर दावा केला आहे.

आंतरराष्ट्रीय: एच-१ बी धारकांना तातडीने अमेरिकेत परतण्याचं आवाहन, IT कंपन्यांची धावपळ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या नियमांमुळे एच-१ बी व्हिसाधारकांसमोर संकट! २५ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत परतण्याचे आवाहन. भारतीय आयटी कंपन्यांची धांदल, ऑफशोअर मॉडेलवर भर. खर्च वाढल्याने कंपन्या स्थानिक भरतीवर लक्ष केंद्रित करणार. नव्या शुल्कामुळे TATA कंपनीने ऑफशोअर डिलिव्हरी मॉडेल अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली. अमेरिकेने नुकतेच लागू केलेल्या १ लाख अमेरिकी डॉलर एच-१बी शुल्क नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे.

महाराष्ट्र: युद्धबंदीवरून माओवाद्यांमध्ये फूट; सरकारची आक्रमक कारवाई सुरू
माओवादी नेता भूपतीच्या युद्धबंदी प्रस्तावाला तेलंगणा समितीचा विरोध! शस्त्रसंधी नाही, संघर्षच करणार, असा इशारा. नक्षल नेता बसवराजू मारला गेल्याने अनेकांनी आत्मसमर्पण केले. मे महिन्यात माओवादी नेत्यांनी पत्रक जारी करून सरकारला नक्षलविरोधी कारवाया थांबवण्याची विनंती केली होती. यामध्ये शस्त्रसंधीसह शांतीवार्ता प्रस्तावदेखील होता; परंतु सरकारने आधी शस्त्रे टाका, आत्मसमर्पण करा, नंतर चर्चा करू, ही भूमिका घेतली.

महाराष्ट्र: राज्यात पावसाचा कहर, धरणे तुडुंब, नद्यांना पूर, विसर्ग सुरूच!
राज्यात जोरदार पावसामुळे धरणे पूर्णपणे भरली आहेत. ३५ धरणातून ३ लाख १८ हजार ८५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये ९७ टक्के जलसाठा, तर इतर २९९७ लहान-मोठ्या प्रकल्पांत आजमितीला ८९ टक्के जलसाठा आहे.

आंतरराष्ट्रीय: युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रक कोलमडलं
युरोपातील अनेक विमानतळांवर सायबर हल्ला झाल्याने चेक-इन आणि बोर्डिंग सेवा विस्कळीत झाली. ब्रुसेल्स, बर्लिनमध्ये उड्डाणे खोळंबली. प्रवाशांना उड्डाण तपासण्याचा सल्ला. कॉलिन्स एरोस्पेस कंपनीचे सिस्टम लक्ष्य होते. हल्ल्यामुळे युरोपमध्ये मोठा व्यत्यय. कॉलिन्स ही एक अमेरिकी विमानचालन, संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी असं तंत्रज्ञान पुरवते ज्याद्वारे प्रवासी स्वतःच चेक-इन करू शकतात, बोर्डिंग पास आणि बॅग टॅग छापू शकतात.

राष्ट्रीय: पाकिस्तानच्या राफेल पाडल्याच्या दाव्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे: काँग्रेसची मागणी
पाकिस्तानने राफेल पाडल्याच्या दाव्यावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान नेहमी अशा प्रकारचे दावे करुन आपल्या सेनेचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानला तात्काळ उत्तर द्यावे, पुराव्यांसह पाकिस्तानचे दावे खोडून काढावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

फिल्मी: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची घोषणा
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारकडून २०२३ च्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ४०० हून अधिक चित्रपटात मोहनलाल यांनी अभिनय केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान २३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार: CM योगींचा गुन्हेगारांना कडक शब्दांत इशारा
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना सोडणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चकमकीत एक जण जखमी झाला आहे. तसेच, दोन जणांना चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

राष्ट्रीय: जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांना दिलासा! 'रेल नीर' स्वस्त, नवे दर जाणून घ्या
जीएसटी कपातीनंतर रेल्वेने 'रेल नीर'च्या किमती घटवल्या आहेत. आता १ लीटरची बाटली ₹१४, तर ५०० मिलीची बाटली ₹९ मध्ये मिळणार आहे, यापूर्वी याची किंमत १५ रुपये आणि १० रुपये अशी होती. इतर ब्रँडेड पाण्याच्या किमतीतही कपात होणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात, मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

सखी: नवरात्री 2025: लाकडी देवघर स्वच्छ करण्यासाठी २ सोप्या टिप्स
नवरात्रीपूर्वी लाकडी देवघर स्वच्छ करताना, प्रथम इअर बड्सने धूळ काढा. गरम पाणी आणि डिशवॉशने पुसून, नंतर ऑलिव्ह ऑईल किंवा व्हॅसलिनने पॉलिश करा. या टिप्स वापरून देव्हारा नव्यासारखा करा!

सखी: नवरात्री २०२५: उपवासासाठी साबुदाण्याची तिखट खीर, हलका आहार!
नवरात्रीत नेहमीची साबुदाणा खिचडी आणि खीर खाऊन कंटाळा आला आहे? यंदा साबुदाण्याची तिखट खीर करून बघा! साबुदाणा भिजवून, बटाटा आणि हिरव्या मिरचीचा तडका द्या, मग पाणी घालून शिजवा. चवीनुसार मीठ आणि तिखट घालून पौष्टिक आणि चविष्ट खीर तयार..

व्यापार: पुढच्या आठवड्यात आयपीओचा धमाका! २२ कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी
शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात आयपीओची जोरदार लाट येणार आहे. मेनबोर्ड आणि एसएमई सेगमेंटमधील २२ कंपन्या आयपीओ घेऊन येत आहेत, ज्यातून ५००० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. आनंद राठी, गणेश कंझ्युमर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असेल.

महाराष्ट्र: एसटी महामंडळात १७ हजार ४५० पदांची भरती
एसटी महामंडळ लवकरच १७ हजारांहून अधिक चालक आणि सहाय्यकांची भरती करणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती होणार असून, ३० हजार रुपये मासिक वेतन मिळेल. यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी वाढतील आणि परिवहन सेवेत सुधारणा होईल. - लोकमत

महाराष्ट्र: शिंदे, पवार आणि भाजपचे आमदार मते चोरून निवडून आले: संजय राऊत
संजय राऊत यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात असे लोक निवडून आले आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांनाही माहिती नाही की, ते आमदार आहेत. हे सगळे लोक 'मत चोरी'मुळे आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा भाजपचे ९०% आमदार मते चोरुन किंवा हेराफेरी करुन आमदार झाले,' असा दावा संजय राऊत यांनी केला.

सखी: केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल! आता केस होतील लांबसडक
केसांची वाढ होत नाही? जास्वंद आणि कढीपत्त्याच्या तेलाचा उपाय! शाम्पू, कंडिशनर असे केमिकलयुक्त पदार्थ वापरले तर केस अजूनच गळतील की काय अशी भीती असतेच. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. या उपायामुळे केसांचं नुकसान निश्चितच होणार नाही. यामध्ये आपण जे तेल तयार करणार आहोत, ते तेल वापरल्यामुळे केसांची वाढ पटापट होईल

आंतरराष्ट्रीय: भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
"अमेरिकन ड्रीम" पाहणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. नवीन निर्णयानुसार, आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी नवीन अर्जदारांना आणि जुन्या व्हिसा धारकांना नुतनीकरणासाठी १००,००० डॉलर्स (८८ लाख रुपये) भरावे लागतील. हा नवीन निर्णय भारतीयांसाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण ठरू शकतो.