छत्रपती संभाजीनगर: सायलेन्स प्लीज! छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा बुलेटच्या सायलन्सरवर बुलडोझर
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनीmodified सायलन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई करत 705 सायलन्सर नष्ट केले. शहरात कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले होते. अनधिकृत सायलन्सर बसवणाऱ्या मेकॅनिकांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय: होर्मुझ सामुद्रधुनीसाठी ४० देशांसह ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'
ब्रिटन आणि फ्रान्स होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी ४० राष्ट्रांना एकत्र आणत आहेत, ज्याचा उद्देश जागतिक व्यापार सुरळीत करणे आहे. ट्रम्प यांच्या नाकेबंदी धोरणाला बगल देत जागतिक सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संघर्ष टाळून जलमार्ग स्थिर करण्यावर ब्रिटन आणि फ्रान्सनं भर दिला आहे. आमचे लक्ष केवळ होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावर आहे. आम्ही युद्धात सहभागी होणार नाही असं ब्रिटनने खुलासा केला आहे.
व्यापार: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ७०२ अंकांनी कोसळला, तर निफ्टी २३,९०० खाली...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरणीचे वातावरण दिसून आले. प्रमुख निर्देशांक BSE Sensex ७०२.६८ अंकांनी (०.९१%) घसरून ७६,८४७.५७ वर बंद झाला, तर Nifty 50 २०७.९५ अंकांनी (०.८६%) घसरत २३,८४२.६५ वर स्थिरावला. निफ्टी २३,९०० च्या खाली घसरल्याने बाजारातील कमकुवतपणा स्पष्ट झाला.
व्यापार: अवघ्या ₹२००० हजारांच्या SIP तून उभा करू शकता ₹२.१७ कोटींचा फंड, फक्त हे काम करावं लागेल...
आजच्या काळात SIP (Systematic Investment Plan) हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी लोकप्रिय पर्याय बनला आहे. कमी रकमेपासून सुरुवात करून दीर्घकालीन कालावधीत मोठा फंड तयार करण्यासाठी SIP प्रभावी ठरत आहे. केवळ ₹२,००० मासिक गुंतवणुकीतूनही योग्य नियोजन केल्यास कोट्यवधींचा फंड उभा करता येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
व्यापार: भारताची श्रीलंकेत मोठी खेळी; शिपबिल्डिंग कंपनी केली खरेदी
श्रीलंकेतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारताने एक मोठी चाल खेळली आहे. नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बनवणारी कंपनी 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड'नं तिथे मोठी खरेदी केली आहे. कंपनीनं श्रीलंकेतील सर्वात मोठी शिपबिल्डिंग कंपनी 'कोलंबो डॉकयार्ड पीएलसी' (CDPLC) मधील ५१ टक्के नियंत्रण हिस्सा खरेदी केलाय.
व्यापार: इराण-अमेरिका तणावात कच्च्या तेलाचे दोन टँकर्स भारतात दाखल; पुरवठा लवकरच सुरळीत होणार
Fuel Crisis in India: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे ७ वर्षांनंतर इराणकडून कच्च्या तेलाची खेप भारतीय किनाऱ्यावर पोहोचली आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार, इराणी तेल घेऊन आलेले दोन मोठे सुपरटँकर(जहाज) भारतात दाखल झाले आहेत.
व्यापार: आठव्या वेतन आयोगाची भरती; १.८ लाखांपर्यंत पगार, कोणती आहेत पदं?
जर तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा असेल आणि उत्तम पगार हवा असेल, तर ८ व्या केंद्रीय वेतन आयोगानं तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. ८ व्या वेतन आयोगानं सल्लागार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये उमेदवारांना मासिक १.८० लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. विशेष म्हणजे, ही भरती फूल टाईम आणि पार्ट टाईम अशा दोन्ही तत्त्वांवर होत आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणी नेत्यांसाठी हवाई हद्दीत पाकिस्ताननं उभं केले सुरक्षेचे जाळं
इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने इराणी नेत्यांना अभूतपूर्व सुरक्षा पुरवली. हवाई सुरक्षा सक्रिय केली, लढाऊ विमाने तैनात केली. संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. इराणी विमानांना कुठलाही धोका होऊ नये यासाठी पाकिस्तानने वॉरफेअर सपोर्ट सिस्टम चालू केली होती. त्यात सर्व एअर सर्व्हिलान्स रडार सक्रीय होते आणि एअर डिफेन्ससोबत मिसाइल सिस्टमही हाय अलर्ट ठेवण्यात आल्या होत्या.
सखी: आशा भोसलेंनी गाण्यासह स्वयंपाककलेवरही केलं भरभरुन प्रेम!
खाण्याखिलवणाऱ्यावर भरभरुन प्रेम करणारी एक सुगरण आशा भोसले...
व्यापार: ITR दाखल करण्यापासून ते TDS सर्टिफिकेटपर्यंत, जाणून घ्या FY २०२७ मधील महत्त्वाच्या तारखा
आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयकर संबंधित तयारीला सुरुवात झाली असून, करदाते आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ITR फा/लिंग, TDS/TCS भरणा, ऑडिट रिपोर्ट सादर करणे यांसारख्या सर्व प्रक्रियांसाठी वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. एक दिवसही उशीर झाल्यास व्याज, दंड आणि नोटिसांचा सामना करावा लागू शकतो.
छत्रपती संभाजीनगर: घरात कोब्रा शिरला, बालकाला दंश, उपचारापूर्वीच अंत
कुंभेफळ येथे दोन वर्षांच्या मुलाला कोब्राने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला. घराच्याजवळ खेळत असताना ही घटना घडली. उपचारासाठी नेत असतानाच त्याचा जीव गेला. उन्हाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढल्याचे या घटनेतून दिसून येते.
व्यापार: सर्वात सुंदर नाणं! 'ऊना अँड द लायन'ची १.३७ कोटींना विक्री
ब्रिटनमधील ग्विनेड येथे एका घराची साफसफाई आणि मूल्यांकन (प्रॉबेट) सुरू असताना एक जुनं नाणं सापडलं असून त्याची तब्बल १,३७,५०,००० रुपयांना म्हणजेच १,१०,००० पौंड्सना लिलावात विक्री झाली आहे. ‘ऊना अँड द लायन’ (Una and the Lion) असं नाव असलेलं हे पाच पाउंडचं नाणं असून, ब्रिटनमध्ये आतापर्यंत पाडलेले हे ‘सर्वात सुंदर नाणं’ मानलं जातं. सोन्याचं हे नाणं कधीही सर्वसामान्यांच्या वापरासाठी चलनात आलं नव्हते.
व्यापार: IPO ची चर्चा! अचानक १२ टक्क्यांनी वधारला Tata समूहाचा 'हा' शेअर; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. मात्र, अशा परिस्थितीतही टाटा समूहातील काही शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. विशेषतः Tata Chemicals आणि Tata Investment Corporation च्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. या वाढीमागे Tata Sons च्या संभाव्य आयपीओ (IPO) लिस्टिंगची चर्चा महत्त्वाची ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर: आशा भोसले आणि छत्रपती संभाजीनगर: गजानन महाराजांसाठी स्वरसेवा.
आशा भोसले यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गजानन महाराज मंदिरासाठी केलेली 'स्वरसेवा' आजही स्मरणात आहे. १९८७ च्या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून मंदिराच्या उभारणीत मोठी मदत झाली. त्यांच्या निस्वार्थ योगदानाला शहरवासियांकडून आदराने श्रद्धांजली.
सखी: चेहऱ्यावरील नको असणारे केस काढण्यासाठी सोपा घरगुती उपाय
जर आपल्याला घरच्या घरी कोणत्याही वेदनेशिवाय आणि नैसर्गिक पद्धतीने वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर स्वयंपाकघरातील बटाटा हा रामबाण उपाय ठरु शकतो.
आंतरराष्ट्रीय: पाकचा दुहेरी डाव! सौदीमध्ये पाठवले १३ हजार सैनिक अन् लढाऊ विमाने
US-इराण चर्चा निष्फळ ठरताच पाकिस्तानने संरक्षण करारानुसार सौदीमध्ये १३००० सैनिक आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत. सौदी-इराणमधील शत्रुत्व आणि पाकिस्तानचे सौदी अरेबियाशी असलेले आर्थिक संबंध पाहता इराणसोबत संभाव्य संघर्षाची चिंता वाढली आहे. मागील सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान आणि सौदी अरेबियात स्ट्रॅटेजिक म्युचुअल डिफेन्स एग्रीमेंट झालं होते. आता पाकिस्तानी सैन्य इराणविरोधात थेट युद्धात उतरणार का असा प्रश्न पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर: सिमेंट मिक्सरचा स्पर्श तारांना, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मजुरांचा मृत्यू.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिमेंट मिक्सर विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. सुरक्षा उपायांमधील कमतरतेमुळे ठेकेदारावर निष्काळजीपणाचा आरोप.
व्यापार: चुकीच्या युपीआय ID वर पैसे पाठवल्यास परत कसे मिळवाल? पाहा
चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत आजकाल सर्वत्र यूपीआय (UPI) द्वारेच पेमेंट केलं जातं. मार्च २०२६ मध्ये भारतात २२.६४ अब्ज यूपीआय व्यवहार झाले, जे याच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. मात्र, तंत्रज्ञानाच्या या वेगात एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी मनात येतो, जर चुकून पैसे चुकीच्या यूपीआय आयडीवर गेले, तर ते परत मिळवण्यासाठी काही 'Undo' बटण आहे का?
व्यापार: सोनं-चांदी स्वस्त! पाहा काय आहेत आजचे नवे दर
आज १३ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्याच्या भावात १,०४० रुपये आणि चांदीच्या भावात ५,३३९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. एकीकडे कमोडिटी बाजार कोसळताना दिसत आहे, तर दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये मजबूती कायम आहे.
व्यापार: ट्रम्प यांच्या धमकीनं शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स गडगडला, निफ्टी २४ हजारांखाली
अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३९९.७७ अंकांनी घसरून ७६,१५०.४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
क्रिकेट: रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला असलेल्या वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पुन्हा एकदा हवा केली. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगाातील रविवारी खेळवण्यात आलेल्या २० व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मुंबई इंडियन्ससमोर २४१ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
आंतरराष्ट्रीय: आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
US-Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला ठेवण्याचे वचन मोडल्याचा आरोप केला आहे. तसेच, या महत्त्वाच्या जलमार्गावर अमेरिकेची कडक भूमिका कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी इराणला तीव्र शब्दात इशाराही दिला आहे.
ठाणे: ठाण्यात पाणीबाणी: २४ तासांऐवजी ३६ तास उलटले, तरी पाणी नाही!
ठाण्यात २४ तासांसाठी शटडाउन, ३६ तास उलटूनही पाणी नाही. गळतीमुळे समस्या वाढली, नागरिकांना गैरसोय झाली. टँकर उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात मोठी अडचण. अनेक भागांमध्ये अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
जालना: गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
वडीगोद्री(जालना)- मराठा आंदोलनाशी संबंधित दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. 'सरकारने सर्व गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण झाला नाही, तर आम्ही सर्वात मोठं आंदोलन उभारू,' असा इशारा त्यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय: इराण-US तणावात पुतिन यांची ऑफर; इराणी राष्ट्रपतींना केला कॉल
पाकिस्तानमधील US-इराण चर्चा निष्फळ ठरल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी इराणला मध्यस्थीची ऑफर दिली आहे. त्यांनी मध्य पूर्वेतील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक मदत करण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानमध्ये २१ तास चाललेल्या वाटाघाटींनंतरही कोणताही करार या दोन्ही देशांमध्ये होऊ शकला नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
US-Iran-Israel: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानात आयोजित उच्चस्तरीय चर्चा निष्फळ ठरली. सुमारे 21 तास चाललेल्या या चर्चेचा उद्देश युद्धविरामाला कायमस्वरूपी शांततेत रूपांतरित करणे हा होता. मात्र, राजनैतिक मतभेद आणि जटिल प्रादेशिक समीकरणांमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला.
क्रिकेट: IPL 2026: प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा; गिल-बटलरचा अर्धशतकी तोरा! LSG च्या घरच्या मैदानात GT चा रुबाब
प्रसिद्ध कृष्णा आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने लखनौचं मैदान मारत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील १९ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय निश्चित केला.
पुणे: कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत; प्रत्येकाला सन्मान देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती : आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम लोकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी रणनीती स्पष्ट केली.
महाराष्ट्र: मतभेद विसरून शिवसेना एकसंध करा; एकनाथ शिंदेंची पदाधिकाऱ्यांना सूचना
एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मतभेद दूर करून एकजूट होण्याचे आवाहन केले. शिवसेना हे कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये काही कुरबुरी असतील काही मतभेद असतील ते दूर करा आणि एकसंघ व्हा. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, कोणाच्या दावणीला बांधलेली नाही. मी आजही कार्यकर्ता आहे. असली कोण आणि नकली कोण हे वारंवार सिद्ध झालंय. विरोधकांचा टांगा पलटी झाला आहे असा टोला शिंदेंनी लगावला.
राष्ट्रीय: माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Odisha Crime: ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर या क्रुर महिलेने स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.
पिंपरी -चिंचवड: Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका
पिंपरी-चिंचवड - सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या ‘थार’ गाडीने भररस्त्यात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. मात्र, त्याचा हा ‘स्वॅग’ वाकड पोलिसांसमोर फार काळ टिकला नाही.