सखी: मुलांसाठी कोबीचे थालीपीठ: पौष्टिक आणि झटपट तयार होणारा खाऊ
मुलांच्या वाढीसाठी भाजीतील पोषक घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. (Indian lunchbox ideas for kids) अशा वेळी भाजी लपवून, पण चव टिकवून ठेवणारे पदार्थ आईंच्या कामी येतात. कोबीचं थालीपीठ हा त्यापैकीच एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. (healthy Indian snacks)
महाराष्ट्र: २९ महापालिका निवडणूक झाल्यावर RSSचे व्यापक गृहसंपर्क अभियान
RSS ने व्यापक गृहसंपर्क अभियान सुरू केले, ज्यात स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती देत आहेत. ग्रामीण भागात स्वयंसेवक घरोघरी जात आहेत. निवडणूक असलेल्या शहरात हे अभियान १८ जानेवारीपासून सुरू होईल, राजकीय आरोप टाळण्याचा आणि तटस्थता राखण्याचा उद्देश आहे.
व्यापार: बँक कर्मचाऱ्यांचा संप; तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता.
बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करत २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिन आणि रविवारमुळे बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहण्याची शक्यता असून, चेक क्लिअरन्स आणि व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
मुंबई: ठाकरे बंधूंचा वचननामा नव्हे, 'वाचूननामा': CM फडणवीसांची खोचक टीका
फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर टीका केली, तो 'वाचूननामा' असल्याचे म्हटले. त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विकासाच्या भाषणांचे प्रदर्शन करण्याचे आव्हान विरोधकांना दिले, बक्षीस जाहीर केले. तसेच मुंबईतील विकास प्रकल्पांवर प्रकाश टाकला.
मुंबई: मुंबई: १० रुपयांत जेवण देण्याचे जाहीरनाम्यात ठाकरेंचे वचन
ठाकरे युतीचे १० रुपयांत जेवण, महिलांना आर्थिक मदत, परवडणारी घरे, पाळीव प्राण्यांसाठी सुविधा, तरुणांना रोजगार सहाय्य आणि पायाभूत सुविधा सुधारण्याचे आश्वासन. नदी स्वच्छता, बीपीटी जमीन विकास आणि महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत बेस्ट बस प्रवासावर लक्ष केंद्रित केले जाईल.
मुंबई: आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार. 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही,' असं म्हणत त्यांनी मराठी अस्मितेवर जोर दिला. शिवसेना भवनातील भेटीवर संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.
मुंबई: विधानसभा अध्यक्ष निलंबित करा: उद्धव ठाकरेंचा पदाच्या गैरवापराचा आरोप
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी पदाचा दुरुपयोग आणि पक्षपाती वर्तनाचा आरोप केला. नार्वेकरांच्या सभागृहाबाहेरील कृतींवर टीका करत, मराठी माणसांना धोका देणाऱ्या गद्दारांवर आरोप केला. तसेच, त्यांनी अलीकडील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर उपहासात्मक टिप्पणी केली.
मुंबई: उद्धव ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग बोलावे: आशिष शेलार यांचा टोला.
उद्धव ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असे आशिष शेलार म्हणाले. ते स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले ठाकरे, आता इतरांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. शेलार यांनी मुंबई आणि ठाण्यात महायुती उमेदवारांसाठी प्रचार केला.
मुंबई: ठाकरे महापौर झाल्यास, मुंबई पाकिस्तान होईल: साटम यांचा आरोप
ठाकरे महापौर झाल्यास मुंबई पाकिस्तान होईल, असा आरोप साटम यांनी केला. ठाकरे यांनी महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. कोस्टल रोडचे श्रेय फडणवीस यांचेच आहे, असेही ते म्हणाले.
ठाणे: बंडखोरी नियंत्रणात, तरीही ठाण्यात अपक्षांची डोकेदुखी कायम
ठाणे महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम आहे. प्रमुख पक्षांनी बंडखोरी शमवली असली, तरी ८६ अपक्ष उमेदवार १३१ जागांसाठी रिंगणात असल्याने प्रमुख पक्षांची चिंता वाढली आहे.
मुंबई: भाजप, शिंदेसेनेविरोधात मनसे; मराठी मते कोणाला मिळणार?
मनसे मुंबईत भाजपच्या विरोधात १०१ ठिकाणी, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी लढणार. युती बदलती; मनसे दोन्ही गटांशी लढत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत प्रमुख लढती, मराठी मतांवर परिणाम.
मुंबई: महापालिकांची रणधुमाळी: बिनविरोध निवडीवरून राज्यात रणकंदन;
बिनविरोध निवडणुकांमुळे राज्यात राजकीय वाद सुरू. ठाकरेंनी फेरनिवडणुकीची मागणी केली; राज ठाकरेंनी बंगालमधील स्थिती निदर्शनास आणली. फडणवीसांनी विरोधकांना फटकारले, न्यायालयात आव्हान दिले तरी जनमतावर विश्वास व्यक्त केला. सत्ताधारी आघाडीवर विरोधकांकडून सक्तीचा आरोप.
ठाणे: "पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेला", अविनाश जाधवांनी व्हिडीओच दाखवला
एक पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर घेऊन जातो आणि त्यानंतर तो उमेदवार अर्ज मागे घेतो. पोलीस अधिकारी त्याला शिंदेंच्या घरी घेऊन का गेला?, असे सांगत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अधिकारी उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडीओ दाखवला.
मुंबई: ठाकरेंचा शब्द यू टर्न मारणारा; शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळेंची टीका
शिंदेसेनेचे नेते माजी खासदार राहुल शेवाळेंनी उद्धवसेना-मनसे यांच्या वचननाम्यावर टीका केली आहे. विशिष्ट समुदायांना खूश करण्याचा आणि 'हिंदुहृदयसम्राट' सारख्या प्रमुख शब्दांना वगळून मराठी अस्मितेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. एकमेकांना विश्वासघातकी म्हणणारे, पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे आणि आपलाच शब्द गिळणारे ते आहेत. त्यामुळे मुंबईकर जनता ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
पुणे: माजी नगरसेवकामुळे एकानं आयुष्य संपवलं, चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं?
हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण टोळीविरोधात मकोका कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) हडपसरमधील एका माजी नगरसेवकासह अन्य काही जणांची नावे आढळली. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी -चिंचवड: PCMC Election 2026: उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र सर्वच पक्षांनी खासदार, आमदार, महापौर, माजी पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. ‘उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं?’ असा सवाल कार्यकर्तेच करत आहेत.
पिंपरी -चिंचवड: पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित पवारांकडून खोटे ‘नरेटिव्ह’
पिंपरी : महापालिका निवडणुकीत पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते खोटे ‘नरेटिव्ह’ पसरवत आहेत. ते एजन्सीने दिलेले स्क्रिफ्ट वाचतात. एजन्सीने सांगितलेले कपडे घालतात. एजन्सीज भाड्याने घ्यायच्या आणि हजार-दोन हजार लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोल करायला पैसे द्यायचे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. पवार केंद्रात आणि राज्यात आमच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे: जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीराला शिखरी काठ्यांची देवभेट
जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये पौष पौर्णिमा पारंपरिक 'काठी' देवभेटीने साजरी झाली. भाविकांनी भंडारा उधळून मंदिराची प्रदक्षिणा करत जल्लोष केला. खैरे आणि होलम कुटुंबीयांनी खंडोबा-म्हाळसा विवाह वर्धापन दिनानिमित्त आपली जुनी परंपरा जपली. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत मानकऱ्यांचा सन्मान केला.
ठाणे: कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह
६० वर्षाच्या महिलेने ३५ वर्षीय सुनेची हत्या केल्याच्या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. सासूने सून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शोध सुरू असताना पोलिसांना वालधुनी पुलाच्या खाली रक्तबंबाळ अवस्थेत सुनेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर महिलेची हत्या सासुनेच केली असल्याचे समोर आले.
सखी: दलिया-बेसनाचा मऊ, जाळीदार ढोकळा; २० मिनिटांत होईल तयार
योग्य प्रमाणात साहित्य आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर झटपट ढोकळा तयार होईल. अशावेळी आपण दलिया आणि बेसनाच्या पीठापासून झटपट होणारा ढोकळा बनवू शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
पुणे: उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या चिन्ह वाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यातील थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. काही प्रभागांत मात्र उद्धवसेना-मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारही करिष्मा करू शकतात, असे चित्र आहे.
पुणे: ना घर, ना चारचाकी, ना महागडी दुचाकी! या महिला उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त दोन हजार रुपयांची रक्कम.
धनकवडी : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय ताकदीसोबतच उमेदवारांची आर्थिक क्षमताही चर्चेचा विषय ठरली आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून कोट्यधीशांचे राजकारण ठळकपणे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक ३७ मधील अनेक उमेदवार कोटींहून अधिक मालमत्तेसह कोट्यधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत तर दुसरीकडे एक महिला उमेदवाराच्या खात्यात अवघे दोन हजार रुपये असून नावावर ना घर, ना चारचाकी ना महागडी दुचाकी आहे, या महिला उमेदवाराचे नाव आहे.
पुणे: PMC Elections 2026: विमाननगर-लोहगाव प्रभाग ३ मधील भाजप महिला उमेदवार आहेत ‘कोट्यधीश’
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्र. ३ (विमाननगर-लोहगाव) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला असून, या प्रभागातील बहुतांश उमेदवार ‘कोट्यधीश’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये इतर उमेदवारांचा तुलनेत भाजपच्या ऐश्वर्या अतुल पाटील (बापूसाहेब पठारेंच्या सून) यांनी २७२ कोटींच्या एकूण मालमत्तेसह प्रभागात आघाडी घेतली आहे.
पुणे: PMC Elections 2026: हडपसर कार्यालयाचा प्रताप; उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे गहाळ
हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेली संपत्तीची प्रतिज्ञापत्रे नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयातील फलकावर लावण्यात येतात. मात्र ही प्रतिज्ञापत्रे गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र याबाबत काहीच कारवाई आम्ही स्वत:हून करणार नसल्याची माहिती येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून वचननामा प्रसिद्ध, दिली अशी आश्वासने
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करून लढत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला आहे. तसेच ठाकरे बंधूंनी यावेळीमुंबईचा महापौर हा मराठीच होणार, या आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला.
फिल्मी: अटक झाल्यावर जय दुधाणेने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. मुंबई विमानतळावरुनच जयला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी फक्त जयच नव्हे तर त्याचे आजी-आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ''मी या सर्व प्रकरणाला हिंमतीने सामोरं जाणार आहे. मी कुठेही पळून जाणार नाही'', असं जय म्हणाला. जाणून घ्या सविस्तर
फिल्मी: जय भानुशाली-माही विज एकमेकांपासून झाले विभक्त! पोस्टद्वारे दिली माहिती
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर टीव्हीवरील लोकप्रिय कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि ते दोघेही घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. अभिनेता जय भानुशाली आणि पत्नी माही वीज यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. १४ वर्ष संसार केल्यानंतर या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे: घायवळ अन् जैन बोर्डींग जमीन गैरव्यवहारावरून अजित पवारांनी साधला निशाणा
पुणे : उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी ‘जय जिनेंद्र’ म्हणत जैन बोर्डींग जमीन विक्रीतील गैरव्यवहाराची आठवण करून देत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता प्रहार केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्ला चढवताना अजित पवार म्हणाले, कोथरूडमधील घायवळ हा गुन्हेगार परदेशात कसा पळून गेला, हे त्यांनी सांगावे. तसेच, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डींगच्या जागेच्या गैरव्यवहारावरून मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला.
पुणे: ..तेव्हा कारवाई केली असती, तर आज माझा बाप मेला नसता; कुटुंबीयांचे गंभीर आरोप
पुणे - कुख्यात टिपू पठाणसोबतच्या मकोका गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीने कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी सादिकने तब्बल ३० ते ३३ पानांची सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये हडपसर परिसरातील एका माजी नगरसेवकाचे नाव स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.
सखी: मुलांचा स्क्रीन टाइम बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ गोष्टी..
मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवताना केलेला हट्ट थांबवण्यासाठी अनेक पालक लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल देतात. सुरुवातीला ही सवय सोयीची वाटते, मात्र २ ते ३ वर्षांच्या मुलांच्या मेंदूवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे अनेक अभ्यासांतून समोर येत आहे.