महाकुंभसाठी मिरजेतून एक्स्प्रेसच्या तीन विशेष फेऱ्या, बुकिंग सुरु; जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:58 IST2025-02-05T15:53:19+5:302025-02-05T15:58:33+5:30
मिरज - प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी-बनारस-हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली ...

महाकुंभसाठी मिरजेतून एक्स्प्रेसच्या तीन विशेष फेऱ्या, बुकिंग सुरु; जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक
मिरज - प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी-बनारस-हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०७३८३ हुबळी-बनारस-हुबळी अशी विशेष एक्स्प्रेस ही गाडी मिरजेतून दि. १४, २१ व २८ फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी ०१:३५ वाजता सुटेल. किर्लोस्करवाडी येथून दुपारी ०२:३०,कराड येथून दुपारी ३ वाजता व सातारा येथून दुपारी ०४:०५ वाजता निघेल व प्रयागराज येथे १५, २२ व ०१ मार्च २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०७३८४ प्रयागराज येथून १७ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी सकाळी ८:५५ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७:४० वाजता मिरजेत पोहोचेल. या गाडीस सांगली, किर्लोस्करवाडी, कराड व सातारा या ठिकाणी थांबा आहे. यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभसाठी विशेष गाडीची मागणी केली होती. महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.