Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:09 AM2024-06-04T09:09:43+5:302024-06-04T09:14:27+5:30

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

Sangli Lok Sabha Result 2024 Sanjay Kaka Patil vs. Chandrahar Patil vs. Vishal Patil Maharashtra Live result Shock for BJP in Sangli, Independent candidate Vishal Patil is leading | Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीत भाजपला धक्का, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

सांगली: Sangli Lok Sabha Result 2024 सांगली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज मंगळवारी सकाळी वेअर हौसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तिसरी फेरी  अखेर विशाल पाटील यांनी १७ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

भाजपचे संजय पाटील (Sanjay Kaka Patil) आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात  अत्यंत चुरशीने तिरंगी लढत झाली होती. दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी अकरा हजार मतांनी आघाडीवर घेतली आहे. 

१४ टेबलवर मतमोजणी 

सांगली लोकसभा मतदारसंघात १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या २० ते २५ फेऱ्या होणार आहेत. पलूस-कडेगाव, जत विधानसभेच्या २० तर सर्वाधिक खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे राज्याचे लक्ष

भाजपचे संजय पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय, अशी चर्चा सुरवातीला होती. विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीने तिरंगी झाली. यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Web Title: Sangli Lok Sabha Result 2024 Sanjay Kaka Patil vs. Chandrahar Patil vs. Vishal Patil Maharashtra Live result Shock for BJP in Sangli, Independent candidate Vishal Patil is leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.