Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:23 IST2026-01-16T14:19:55+5:302026-01-16T14:23:32+5:30

छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले

in a closely contested election in Ward Number Three in Miraj, the candidate from the NCP Ajit Pawar group won by just 10 votes In the Sangli Municipal Corporation defeating BJP's Chhaya Jadhav | Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

मिरज : महापालिकेच्या निवडणुकीत मिरजेत सात प्रभागात लढत झाली असली तरी सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग तीन मधील चूरशीची लढत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शैला शिवाजी दुर्वे  यांनी केवळ 10 मतांनी जिंकली. त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या छाया सचिन जाधव यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही लढत झाली. 

राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शैला दुर्वे व रेश्मा चौधरी या दोन महिला येथे विजयी ठरल्या. भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार सुरेश खाडे यांना आव्हान दिले होते. निवडणुकीत प्रभागात भाजपची हवा होती. मात्र शिवाजी दुर्वे यांनी प्रभागात  वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. मतमोजणी सुरु झाल्यापासून शैला दुर्वे  आघाडीवर होत्या.  मात्र नंतर छाया जाधव यांनी ही आघाडी कमी केल्याने अखेरच्या काही फेऱ्यात नेक टू नेक सुरु होते. मात्र मतदारांशी संपर्क असल्याने  निवडणूक जिंकता येते याचेच प्रत्यंतर या दुर्वे यांच्या विजयातून आले.

मिरजेत प्रभाग तीन मधील या लढतीला महत्व होते. आमदार सुरेश खाडे व भाजप नेते सुरेश आवटी यांना आव्हान देऊन दुर्वे यांनी पत्नीला राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे रिंगणात उतरवले होते.  निवडणुकीपूर्वी भाजप सोडून पक्षांतर केल्याने मतदारांत संमिश्र भावना होत्या. माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही प्रभागातील राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार केला. मात्र या प्रभागात समोर भाजपची बलाढ्य यंत्रणा असल्याने येथे विजयी कोण होते याकडे शहराचे लक्ष लागले होते. दुर्वे याचे प्रभागात वर्चस्व असले तरी छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले. या बिग फाईट मध्ये दुर्वे यांनी  बाजी मारल्याने त्यांच्या समर्थकांनी  विजयाचा जल्लोष केला.

Web Title : एनसीपी की दुर्वे ने 10 वोटों से मिरज चुनाव जीता, बीजेपी को हराया।

Web Summary : मिरज में, एनसीपी की शैला दुर्वे ने 10 वोटों के मामूली अंतर से वार्ड तीन जीता, जिसमें भाजपा की छाया जाधव को हराया। भाजपा की मजबूत उपस्थिति और जाधव की चुनौती के बावजूद, दुर्वे के स्थापित प्रभाव ने उनकी जीत सुनिश्चित की, जिसे समर्थकों ने मनाया।

Web Title : NCP's Durve wins Miraj election by 10 votes, defeats BJP.

Web Summary : In Miraj, NCP's Shaila Durve won ward three by a narrow margin of 10 votes, defeating BJP's Chhaya Jadhav. Despite a strong BJP presence and Jadhav's challenge, Durve's established influence secured her victory, celebrated by supporters.