Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 14:36 IST2024-05-07T14:35:42+5:302024-05-07T14:36:12+5:30
उमेदवार रामचंद्र साळुंखे यांच्या एजंटवरून शिवसेना आणि जयंत पाटील गटात वाद उफळला

Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील बुथ क्रमांक ६२ आणि ६३ वर उमेदवार साळुंखे यांच्यावर नेमलेल्या २ एजंट बोगस आहेत असा आरोपावरून शिवसेनेचे उमेदवार खा. धैर्यशील माने आणि उबाठाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या दोन गटामध्ये राडा झाला. यामध्ये वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील हाणामारीचा अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की, साखराळे तालुका वाळवा येथील बुथ क्र. ६२ आणि ६३ मध्ये मतदान सुरू झाले होते. याठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रामचंद्र गोविंदराव साळुंखे त्यांचे चिन्ह कपाट आहे. त्यांनी साळुंखे यांनी बुथ ६३ मध्ये संतोष राजेंद पाटील व संतोष विष्णू पाटील असे दोन बुथ एजंट नेमले आहेत. हे एजंट बोगस असल्याचा आरोप शिवसेना समर्थकांनी केला.
यातूनच शिवसेना आणि शरद पवार प्रणित राष्ट्रवादी यांच्यामध्ये वादावादी होवून राडा झाला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.