Crime News miraj: ५० एकरचा मालक असल्याचे सांगून केला दुसरा विवाह, तोतया उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:51 IST2022-06-15T12:48:53+5:302022-06-15T12:51:27+5:30
तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी दुसरे लग्न केले

Crime News miraj: ५० एकरचा मालक असल्याचे सांगून केला दुसरा विवाह, तोतया उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
मिरज : आरग-शिंदेवाडी (ता. मिरज) येथील मारुती श्रीकांत माने या तरुणाने आपण पाेलीस उपनिरीक्षक असून, ५० एकर जमिनीचा मालक असल्याचे सांगून दुसरा विवाह केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने शहर पोलिसात केली आहे.
मारुती माने (वय ३७) हा ट्रकचालक आहे. लग्न झाले असतानाही त्याने वेगवेगळ्या दुचाकी व चारचाकी गाड्यांतून फिरत मी पीएसआय असून, माझ्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी आहेत, असे सांगून एका तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी दुसरे लग्न केले.
अन् पळ काढला
लग्न झाल्यानंतर तरुणीस भाड्याच्या खोलीत ठेवून कामावर जात असल्याचे सांगून तेथून पळ काढला. त्याने पहिल्या पत्नीला न विचारता दुसरा विवाह केल्याने पहिली पत्नी निकिता निर्मळे (रा. मालगाव रोड मिरज) यांनी त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसात तक्रार केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांनी मारुती माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.