Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:16 IST2025-08-19T18:15:53+5:302025-08-19T18:16:11+5:30

नशेत त्याने हे कृत्य केल्याचा संशय

A person committed suicide by grabbing a railway electric wire, incident at Miraj station Sangli | Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना 

Sangli: रेल्वेच्या विद्युत तारेला पकडून एकाची आत्महत्या, मिरज स्थानकातील घटना 

मिरज : मिरजरेल्वे स्थानकात मालगाडीवर चढून विद्युत तारेला स्पर्श करून सुमारे ४० वर्षाच्या अज्ञात एका व्यक्तीने आत्महत्या केली. नशेत त्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे. आज, बुधवारी दुपारी ही घटना घडली.

मिरज स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरुन धिम्या गतीने जात असलेल्या इंधन वाहतूक करणाऱ्या वॅगनवर एक तरुण चढला. त्याने उच्च दाबाच्या ओव्हर हेड वायरला हात लावल्याने तीव्र विजेचा धक्का बसून तो वॅगन वरून खाली पडून जागीच ठार झाला. तरुणाचे शरीर जळून काळे पडले होते. 

या घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वॅगन वर चढून विद्युत तारांना स्पर्श करण्यापूर्वी संबंधित हा प्लॅटफॉर्मवर फिरत होता. मिरज कोल्हापूर पॅसेंजरमधील काही प्रवाशांना त्याने फोन करण्यासाठी मोबाईल मागितला होता. मात्र त्यास कोणी फोन दिला नाही.

त्याने प्लॅटफॉर्मवर भेळ खाल्ली. समोरून एवढ्या समोरून इंधन वाहतूक करणारी मालगाडी जात असताना अचानक एका व्हॅगनवर चढून त्याने विद्युततारांना हात लावला. मृताची ओळख पटलेली नाही. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचा रेल्वे पोलिसांचा संशय आहे. मिरज रेल्वे पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला असून याबाबत रेल्वे पोलिसात नोंद आहे.

Web Title: A person committed suicide by grabbing a railway electric wire, incident at Miraj station Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.