बेदाणे आणि मनुका हे दोन्हीही आपण खात असतो. दोन्ही पदार्थ द्राक्षांपासून तयार केले जातात हे देखील आपल्याला माहिती आहे. पण तरीही एकाचा रंग पिवळसर चॉकलेटी तर दुसऱ्याचा काळा कसा, हा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. शिवाय हे दोन्ही खाण्याचे नेमके काय फायदे, काेणता पदार्थ अधिक पौष्टिक असे प्रश्नही असतातच (What is The Difference Between Raisins and Munakka?). म्हणूनच आता आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती वाचा आणि तुमच्या तब्येतीसाठी नेमकं काय चांगलं हे स्वत:च ओळखा.(golden raisins or black raisins which one is more healthy?)
१. बेदाणे
बेदाणे हे सावलीमध्ये वाळवले जातात. त्यामुळे त्यांच्यात ओलावा जास्त असतो आणि त्यांचा रंगही पिवळसर चॉकलेटी असतो. बेदाणे हे प्रकृतीने थंड असतात. त्यामुळे आम्लपित्त किंवा ॲसिडीटी असे त्रास कमी करण्यासाठी तसेच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरतात.
आंबट कैरी आणि झणझणीत मिरचीची जमवा जोडी, घ्या कैरी मिरचीच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी
त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. बेदाणे नियमितपणे खाल्ल्यास कॉन्स्टिपेशनचा त्रास बराच कमी होतो आणि पचन सुधारते. तुम्हाला इंस्टंट एनर्जी हवी असल्यास बेदाणे हा एक चांगला पर्याय आहे. शिवाय कोरडा खोकला झाला असेल तर तो देखील बेदाण्यांमुळे बरा होतो.
२. मनुका
मनुका थेट उन्हामध्ये वाळवल्या जातात. त्यामुळे त्या काळसर आणि जास्त सुरकुतलेल्या असतात. त्यांच्यामध्ये ओलावादेखील कमी असतो. मनुकांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि लोह जास्त प्रमाणात असतं.
पाण्याच्या बाटलीच्या तळाशी साचलेली घाण कशी स्वच्छ करावी? बघा बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक
शिवाय हृदय, त्वचा आणि केस यांच्यासाठी ते जास्त पोषक असतात. रक्तशुद्धी होण्यासाठीही मनुक्यांची मदत होते. पोटाचे कित्येक त्रास कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरतात आणि पचायला बेदाण्यांपेक्षा जास्त हलके असतात.
