Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > पाण्याच्या बाटलीच्या तळाशी साचलेली घाण कशी स्वच्छ करावी? बघा बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

पाण्याच्या बाटलीच्या तळाशी साचलेली घाण कशी स्वच्छ करावी? बघा बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Cleaning Tips For Water Bottle: पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी या काही साध्या सोप्या टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2026 15:32 IST2026-04-22T15:30:59+5:302026-04-22T15:32:19+5:30

Cleaning Tips For Water Bottle: पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी या काही साध्या सोप्या टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतात...

how to clean water bottle from inside, simple tricks and tips to clean water bottle, how to clean the bottom of water bottle | पाण्याच्या बाटलीच्या तळाशी साचलेली घाण कशी स्वच्छ करावी? बघा बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

पाण्याच्या बाटलीच्या तळाशी साचलेली घाण कशी स्वच्छ करावी? बघा बाटल्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Highlightsरोजच पाणी भरून भरून त्यांच्या आत एक चिकट थर जमा व्हायला लागतो. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने बाटल्यांची आतून स्वच्छता कशी करायची ते पाहुया..

पाण्याच्या बाटल्या आपल्याला रोजच लागतात. मुलांना शाळेत नेण्यासाठी, मोठ्यांना ऑफिसमध्ये नेण्यासाठी किंवा प्रवासात घराबाहेर पडल्यावर पाण्याची बाटली सोबत घेण्याची सवय कित्येकांना असते. सध्या तर उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत तर पाण्याच्या बाटल्यांचा वापर वाढतो. बाटल्या भरून फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. अगदी रोजच्या रोज आपण त्यातलं पाणी बदलून तर टाकतोच, पण तेवढंच पुरेसं नसतं. बाटल्या आतून स्वच्छ करणंही खूप गरजेचं आहे (simple tricks and tips to clean water bottle). कारण रोजच पाणी भरून भरून त्यांच्या आत एक चिकट थर जमा व्हायला लागतो. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने बाटल्यांची आतून स्वच्छता कशी करायची ते पाहुया...(how to clean water bottle from inside?)

 

पाण्याच्या बाटल्या आतून कशा स्वच्छ करायच्या?

बाटल्यांमध्ये कोणतेही डिशवॉश लिक्विड किंवा साबण घालणं खरंतर टाळायलाच हवं. कारण त्या आतून जर स्वच्छ झाल्या नाही आणि डिशवॉश लिक्विड किंवा साबणाचे काही कण त्यात राहिले, तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाटल्या धुण्यासाठी तांदूळ, मीठ असे पदार्थ वापरायला हवे.

यासाठी बाटलीमध्ये थोडं पाणी घाला. त्यात १ चमचा तांदूळ घाला. आता बाटली चांगली खळबळून घ्या. यानंतर हे पाणी १० मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर काढून टाका. असं साधारण २ ते ३ वेळा करा. बाटली आतल्या बाजुने चांगली स्वच्छ होईल. 

 

बाटली स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू देखील खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सुुरुवातीला बाटलीमध्ये एक कप गरम पाणी घाला. त्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालून अर्ध लिंबू पिळा.

आंबट कैरी आणि झणझणीत मिरचीची जमवा जोडी, घ्या कैरी मिरचीच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी

आता बाटली वर खाली या पद्धतीने चांगली हलवून घ्या. यानंतर बाटली रिकामी करून त्यात थोडे तांदूळ, मीठ आणि पाणी घाला. पुन्हा एकदा बाटली वर- खाली करून हलवून घ्या. बाटली स्वच्छ होईल. 

 

Web Title : पानी की बोतलों से जमी गंदगी को साफ करने के आसान तरीके।

Web Summary : चावल, बेकिंग सोडा और नींबू का उपयोग करके पानी की बोतलें साफ करें। हानिकारक अवशेष छोड़ सकने वाले डिश सोप से बचें। चावल से रगड़कर गंदगी दूर हो जाती है। बेकिंग सोडा और नींबू प्रभावी ढंग से कीटाणुरहित करते हैं, जिससे एक साफ, सुरक्षित बोतल सुनिश्चित होती है।

Web Title : Easy tricks to clean grime from water bottles effectively.

Web Summary : Clean water bottles using rice, baking soda, and lemon. Avoid dish soap which can leave harmful residue. Rice scrubs grime away. Baking soda and lemon disinfect effectively, ensuring a clean, safe bottle.