Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

Weight loss Tips : फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:33 AM2021-07-19T11:33:03+5:302021-07-19T11:47:36+5:30

Weight loss Tips : फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात.

Weight loss Tips : Rice or chapati what better food health and weight loss | Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय कमी खायचं? हा घ्या फिटनेससाठी फायदेशीर आहार

Highlightsजर तुम्हाला भात खाणं आवडत असेल तर त्यासोबत आहारात चपाती, भाजी, डाळ, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. भातासोबत या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्हाला आवश्यक ती पोषक तत्व मिळण्यासही मदत होते. प्लेन, पॉलिश व्हाइट राइसऐवजी अनपॉलिश्ड, ब्राउन किंवा रेड राइसचा आहारात समावेश करावा.

आपल्या रोजच्या जेवणात डाळ, भात, चपाती, भाजी अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो. आपणही डाएट सुरू करायला  हवं, आता खातोय त्यापेक्षा वेगळं आणि हेल्दी काय खाता येईल असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठी तुम्हालाही काय खावं आणि काय खाऊ नये. असा प्रश्न पडला असेल चपाती आणि भाताच्या आहारातील समावेशाबद्दल काही गोष्टी माहीत असायला हव्यात.

रात्रीच्या जेवणामध्ये चपाती खाणं चांगलं असतं की, भात?

चपाती गव्हापासून तयार करण्यात येते यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. तर भात हा तांदळापासून तयार करण्यात येतो, त्यामुळे यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे भात पचण्यास हलका असतो. जाणून घेऊया चपाती किंवा भातापैकी कोणत्या पदार्थाचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 

तज्ज्ञांच्या मते, आहारात चपातीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. परंतु आहारात दोन्ही पदार्थांचा समतोल राखणंही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. पण प्लेन राईसचा जेवणात समावेश करणं शक्यतो टाळा. भात डाळीसोबत किंवा भाज्यांसोबत खाणं फायदेशीर ठरतं. रात्रीच्या जेवणामध्ये चपातीचा समावेश करावा. कारण भातापेक्षा चपाती खाणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. 

पोषक घटक किती प्रमाणात असतात? 

1/3 कप भातामध्ये 80 कॅलरी, 1 ग्रॅम प्रोटीन, 0.1 ग्रॅम फॅट्स आणि 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. तेच एका मध्यम आकाराच्या चपातीमध्ये 71 ग्रॅम कॅलरी, 3 ग्रॅम प्रोटीन, 0.4 ग्रॅम फॅट आणि 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. 
चपातीमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, कॅल्शिअम आणि आयर्न असतं. एवढचं नाही तर एका चपातीमध्ये एक कप भातापेक्षा जास्त फायबर असतं. जे पाचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाणं फायदेशीर ठरतं. 

चपातीच्या सेवनाचे फायदे

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चपाती खाणं फायदेशीर ठरतं. चपातीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्सच्या डायजेशनसाठी शरीरातील अधिक एनर्जी वापरण्यात येते. ज्यामुळे वजन कमी होतं. 
चपाती पचण्यास भातापेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला सतत भूक लागत नाही. चपाती खाल्यानंतर आळस आणि जास्त झोपही येत नाही. परंतु भात खाल्यामुळे आळस तर येतोच पण अनेकदा झोपही येते. 

हेल्दी भात कसा तयार कराल?

भात कुकरऐवजी एखाद्या पातेल्यामध्ये जास्त पाण्यामध्ये शिजवा. उकळल्यामुळे यातील स्टार्च निघून जातं. स्टार्च असलेलं पाणी काढून टाका. यामुळे भाताची न्यूट्रिशियस वॅल्यू वाढते. भात डाळीसोबत खा. या कॉम्बिनेशनमुळे शरीराला अमीनो अॅसिड मिळण्यास मदत होते.  जर तुम्हाला भात खाणं आवडत असेल तर त्यासोबत आहारात चपाती, भाजी, डाळ, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. भातासोबत या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्हाला आवश्यक ती पोषक तत्व मिळण्यासही मदत होते. 

जर तुम्हाला भात खाणं आवडत असेल तर त्यासोबत आहारात चपाती, भाजी, डाळ, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. भातासोबत या पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्हाला आवश्यक ती पोषक तत्व मिळण्यासही मदत होते. प्लेन, पॉलिश व्हाइट राइसऐवजी अनपॉलिश्ड, ब्राउन किंवा रेड राइसचा आहारात समावेश करावा.

Web Title: Weight loss Tips : Rice or chapati what better food health and weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.