Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवणाआधी पाणी प्यायल्याने नेमका काय फायदा होतो, का हेल्थ एक्सपर्ट ही सवय फॉलो करण्यास सांगतात?

जेवणाआधी पाणी प्यायल्याने नेमका काय फायदा होतो, का हेल्थ एक्सपर्ट ही सवय फॉलो करण्यास सांगतात?

Drinking Water Before Meals : जेवणाआधी पाणी का प्यावं? याबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही सवय आपल्या आरोग्यासंबंधी आहे. त्यामुळे आपण समजून घेणार आहोत की, डॉक्टर आपल्याला जेवणाआधी पाणी पिण्याचा सल्ला का देतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:11 IST2026-04-16T10:10:08+5:302026-04-16T10:11:40+5:30

Drinking Water Before Meals : जेवणाआधी पाणी का प्यावं? याबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही सवय आपल्या आरोग्यासंबंधी आहे. त्यामुळे आपण समजून घेणार आहोत की, डॉक्टर आपल्याला जेवणाआधी पाणी पिण्याचा सल्ला का देतात.

Is there any benefits of drinking water before meals, know the truth | जेवणाआधी पाणी प्यायल्याने नेमका काय फायदा होतो, का हेल्थ एक्सपर्ट ही सवय फॉलो करण्यास सांगतात?

जेवणाआधी पाणी प्यायल्याने नेमका काय फायदा होतो, का हेल्थ एक्सपर्ट ही सवय फॉलो करण्यास सांगतात?

Drinking Water Before Meals : आपण अनेक काही हेल्थ एक्सपर्टच्या किंवा डॉक्टरांच्या तोंडून ऐकलं असेल की, जेवणाआधी पाणी प्यावे. जास्तीत जास्त डॉक्टर हा सल्ला आपल्याला देत असतात. पण खरंच या सवयीने काय फायदा होतो किंवा कसा फायदा होतो, हे अनेकांना माहिती नसतं. पण याबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही सवय आपल्या आरोग्यासंबंधी आहे. त्यामुळे आपण समजून घेणार आहोत की, डॉक्टर आपल्याला जेवणाआधी पाणी पिण्याचा सल्ला का देतात.

जेवण्याआधी पाणी पिण्याचं कारण...

Harvard Healt च्या एका रिपोर्टनुसार, मुळात जेवणाआधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जाण्याचा मोठा तर्क हा आहे की, आपण पाणी प्यायल्यावर कमी खातो. आपल्याला पोटात अशा काही नसा असतात, ज्या आपल्या मेंदूला संकेत पाठवतात की, आता पोट भरलेलं आहे. असं मानलं जातं की, जर आपण आधी पाणी प्यायलो तर हा संकेत लवकर मेंदूला मिळतो आणि जास्त खाणं टाळलं जातं.

याचा फायदा काय होतो? 

काही संशोधनांमध्ये असं सांगण्यात आलंय की, जे लोक जेवणा करण्याआधी पाणी एक ग्लास पाणी पितात, ते इतरांच्या तुलनेत थोडं कमी खातात. खासकरून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी ही सवय फारच फायदेशीर ठरू शकते. पण या उपायाचा फायदा लाँग टर्मसाठी किती होतो, याबाबत ठोस पुरावे नाहीत. 

याबाबत आणखी एक कारण सांगितलं जातं की, अनेकदा आपल्याला भूक लागत नाही. तहान लागते. पण आपल्याला ते कळत नाही आणि आपण काहीतरी खातो. अशात जर आधी पाणी प्याल तर जास्तीच्या कॅलरी शरीरात जाणे टाळता येऊ शकतात. पण या थेअरीबाबतही ठोस असे काही पुरावे नाहीत.

वजन कमी करण्यास मदत

काही एक्सपर्टचं असंही मत आहे की, पाणी प्यायल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात. कारण शरीराला पाणी आपल्या तापमानावर गरम करावं लागतं. पण या प्रक्रियेत फार कमी कॅलरी बर्न होतात. त्यामुळे याचा वजन कमी करण्यात जास्त फायदा होणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की, जर आपण जर गोड ड्रिंक्स किंवा हाय कॅलरी ड्रिंक्सऐवजी पाणी प्याल तर याचा आरोग्याला नक्कीच फायदा होतो. पाण्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे जेवणाआधी पाणी प्यावं की नाही? या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही यात नाही. काही लोकांसाठी ही सवय फायदेशीर ठरू शकेल. असं केल्याने ओव्हरईटिंग टाळता येऊ शकते. पण हा काही चमत्कारिक उपाय मानला जाऊ शकत नाही.

Web Title : भोजन से पहले पानी पीना: फायदे, विशेषज्ञ सलाह और महत्व।

Web Summary : स्वास्थ्य विशेषज्ञ भोजन से पहले पानी पीने की सलाह देते हैं, क्योंकि इससे मस्तिष्क को तृप्ति का संकेत मिलता है और अधिक खाने से बचा जा सकता है। यह कैलोरी सेवन को कम करके वजन प्रबंधन में मदद कर सकता है, हालांकि दीर्घकालिक लाभों के ठोस प्रमाण नहीं हैं। शर्करा युक्त पेय की जगह पानी पीना फायदेमंद है।

Web Title : Drinking water before meals: Benefits, expert advice, and why it matters.

Web Summary : Health experts suggest drinking water before meals to potentially reduce overeating by signaling fullness to the brain. It may aid weight management by curbing calorie intake, though long-term benefits lack conclusive evidence. Replacing sugary drinks with water is beneficial.