>सोशल वायरल > Social Viral : बाबौ! पत्नीची करामत पाहून आजोबांनी दिली भन्नाट रिएक्शन; पाहा ५ सेकंदाचा व्हिडीओ

Social Viral : बाबौ! पत्नीची करामत पाहून आजोबांनी दिली भन्नाट रिएक्शन; पाहा ५ सेकंदाचा व्हिडीओ

Social Viral : सोशल मीडिया एका वृद्ध जोडप्यांमधील प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:22 PM2021-09-14T13:22:46+5:302021-09-14T13:24:01+5:30

Social Viral : सोशल मीडिया एका वृद्ध जोडप्यांमधील प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Social Viral : Best instagram reels indian old couple kissing video created a sensation on the social media | Social Viral : बाबौ! पत्नीची करामत पाहून आजोबांनी दिली भन्नाट रिएक्शन; पाहा ५ सेकंदाचा व्हिडीओ

Social Viral : बाबौ! पत्नीची करामत पाहून आजोबांनी दिली भन्नाट रिएक्शन; पाहा ५ सेकंदाचा व्हिडीओ

Next

प्रेमाला कशाचंच बंधन नसतं हे वाक्य अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. तरुण जोडप्यांनीच फक्त आपलं प्रेम व्यक्त करावं असं काही नाही. वृद्ध जोडपीसुद्धा आपल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करून जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता. सोशल मीडिया एका वृद्ध जोडप्यांमधील प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओनं सगळ्यांचे मन जिंकलं आहे. इंस्टाग्रामवर या आजी आजोबांच्या रिलनं धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध जोडपं अत्यंत साध्या कपड्यात जमिनीवर बसलं आहे. 

 या आजी अचानक  आजोबांच्या गालावर प्रेमान किस करतात त्यानंतर जे होतं ते पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्य येतं. कारण आजींना अशी करामत करताना  पाहून आजोबा लाजून आपली मान खाली घालतात. तर आजी हसत हसत आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवतात. या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेजवर @kethamma__avva या युजरनं शेअर केला आहे. आतापर्यंत ६.१४ मिलियन व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. या पेजच्या बायोमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या पेजवर प्रेक्षकांना 'मध्यमवर्गीय कुटुंबातील मजेशीर व्हिडीओज पाहायला मिळतील, हसत राहा.  हसल्याशिवाय दिवसाचा चांगला आनंद  घेता येत नाही.'  जवळपास ११ हजार लोक या पेजला फॉलो करतात. 
 

Web Title: Social Viral : Best instagram reels indian old couple kissing video created a sensation on the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.