lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च

शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च

Social viral: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डाएट, फिटनेस याबाबत लोकांनी जोरदार गुगल सर्च (google search of 2021) केले. पण त्यातही सर्वाधिक चर्चा कोणत्या अभिनेत्रीच्या डाएटची होती, याची इंटरेस्टिंग माहिती नुकतीच समोर आली आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:17 PM2021-12-30T17:17:23+5:302021-12-30T17:24:34+5:30

Social viral: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डाएट, फिटनेस याबाबत लोकांनी जोरदार गुगल सर्च (google search of 2021) केले. पण त्यातही सर्वाधिक चर्चा कोणत्या अभिनेत्रीच्या डाएटची होती, याची इंटरेस्टिंग माहिती नुकतीच समोर आली आहे. 

Shilpa-Anushka or Malaika Which actress's diet plan is most popular on Google? 2021 google Diet Search | शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च

शिल्पा-अनुष्का की मलायका कोणत्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन लोकांनी सर्वाधिक केला 'गुगल'? २०२१ चा डाएट सर्च

Highlights२०२१ या वर्षात काही अभिनेत्रींच्या डाएट प्लॅनचीही जबरदस्त चर्चा झाली. कोणत्या अभिनेत्रींचा डाएट प्लॅन गुगलवर सर्वाधिक सर्च झाला?

मागील काही वर्षांपासून लोकांचा फिटनेस (fitness) आणि डाएट (diet) याविषयीचा अवेअरनेस वाढला असला तरी कोरोनापासून मात्र फिटनेसबाबत लोक खूपच जास्त सतर्क झाले आहेत. वेगवेगळे डाएट प्लॅन, नवनविन फिटनेस ॲक्टीव्हिटीही त्या निमित्ताने पुढे येत आहेत. कोणती सेलिब्रिटी वेटलॉससाठी (weight loss) काय करते, कोणाचा फुड चार्ट किंवा डाएट प्लॅन (diet plan) कसा आहे, कोणते सेलिब्रिटीज कोणता व्यायाम करण्याला प्राधान्य देतात, याबाबत लोकांच्या मनात नेहमीच कुतुहल असते आणि कोरोनानंतर मात्र ते जास्तच वाढले आहे. म्हणूनच तर २०२१ या वर्षात काही अभिनेत्रींच्या डाएट प्लॅनचीही जबरदस्त चर्चा झाली. बघूया त्यापैकी कोणत्या अभिनेत्रींचा डाएट प्लॅन गुगलवर सर्वाधिक सर्च (most searched diet plan on google) झाला ते...

 

१. कतरिना कैफ (Katrina Kaif)
मलायका, शिल्पा शेट्टी, करिना कपूर या फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींच्या डाएटची, फिटनेसची जेवढी चर्चा झाली, तेवढी चर्चा कधीच कतरिनाच्या डाएटची आणि फिटनेसची झाली नाही. पण डिसेंबरमध्ये मात्र कतरिनाचं लग्न झालं आणि त्याच्या साधारण एक महिना आधीपासून कतरिनाच्या डाएटची, फिटनेसविषयी जबरदस्त सर्च सुरू झाले. ती काय खाते, कसं आणि किती तिचं डाएट आहे, याविषयी तिच्या चाहत्यांना खूपच जास्त उत्सूकता होती.

 

२. करिना कपूर (Kareena Kapoor)
करिना कपूर तर तिच्या डाएटबाबत नेहमीच चर्चेत असते. झीरो फिगरपासून करिना याबाबतीत चर्चा असते. पण यावर्षी तिच्या डाएटविषयी सर्च करण्याचा लोकांचा मुड थोडा बदललेला दिसला. म्हणजे असं की करिनाचं दुसरं बाळंतपण झालं, तेव्हा तिचं वजन खूप जास्त वाढलेलं होतं. हे वजन तिनं कंट्रोल कसं केलं, तसंच बाळंतपणानंतरचं तिचं डाएट कसं होतं, याविषयी लोकांनी सर्वाधिक प्रश्न विचारले होते.

 

३. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं पोर्नोग्राफी प्रकरण याच वर्षात गाजलं. त्यामुळे या काळात शिल्पाविषयीचे सर्च खूप जास्त वाढले होते. तिचा फिटनेस मंत्र, सोशल मिडियावरून ती देत असलेले योगाचे धडे या सगळ्याचीच यावर्षी चांगलीच चर्चा होती. त्या ओघात तिच्या डाएटविषयीही लोकांना कमालीची उत्सूकता असलेली दिसून आली.

 

४. भुमी पेडणेकर (Bhoomi Pednekar)
भुमी पेडणेकरच्या डाएटबाबतही लोकांच्या मनात खूपच उत्सूकता असल्याचे दिसून आले. यावर्षी भुमी पेडणेकरने ४ महिन्यात तब्बल २१ किलो वजन कमी केलं. तिचे वेटलॉस नंतरचे फोटोही कमालीचे व्हायरल झाले होते. यानंतर तिने नेमका कोणता वेटलॉस फॉर्म्युला वापरला, नेमकं काय करून वजन घटवलं, याबाबत लोकांना खूप जास्त माहिती पाहिजे होती. त्यामुळे यंदा ती देखील चांगलीच चर्चेत होती.

 

५. अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
करिना कपूरप्रमाणेच अनुष्का शर्मानेही बाळंतपणानंतर वजन कमी कसं केलं, पुन्हा तिच नेहमीची कर्व्ही, हॉट फिगर कशी मिळवली, हा अनेक महिलांचा उत्सूकतेचा विषय होता. घरचा आहार घेऊन अनुष्काने वजन कमी केल्यामुळे तिच्या डाएट प्लॅनविषयीही तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. 

 

Web Title: Shilpa-Anushka or Malaika Which actress's diet plan is most popular on Google? 2021 google Diet Search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.