>रिलेशनशिप > किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

Relationship: 'बायकांच्या पोटात काही राहात नाही......' असं म्हणतात ना, ते काही अगदीच चुकीचं नाही. काही जणी असतातच अशा. ज्या मनातलं सगळं सगळं बोलून मोकळं हाेतात. पण असं कुणाकडेही मन मोकळं करणं तुमच्यासाठीच घातक तर ठरत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 03:58 PM2021-11-25T15:58:57+5:302021-11-25T16:00:41+5:30

Relationship: 'बायकांच्या पोटात काही राहात नाही......' असं म्हणतात ना, ते काही अगदीच चुकीचं नाही. काही जणी असतातच अशा. ज्या मनातलं सगळं सगळं बोलून मोकळं हाेतात. पण असं कुणाकडेही मन मोकळं करणं तुमच्यासाठीच घातक तर ठरत नाही ना?

Any women should not share these things to anyone...... | किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

Next
Highlightsकोणत्या गोष्टीकडे कोण कसं बघेल आणि त्याचा काय अर्थ घेईल, हे सांगता येत नाही. 

बायका आणि गॉसिप्स (ladies and gossips), बायका आणि त्यांच्या गप्पा... किंवा बायकांची बडबड (girls talk)करण्याची, खूप बोलण्याची सवय... अशा काही गोष्टी नेहमीच चर्चेचा आणि बऱ्याचदा हसण्यावारी नेण्याचा आणि टिंगलीचा विषय असतो. बायका फार बोलतात, थांबतच नाहीत, सतत बकबक करतात असं पुरुष म्हणतात आणि बायका पुरुष सगळेच ते खरं मानतात. मात्र बायकाच गॉसिप करतात, अति बोलतात असं सरसकटीकरण अजिबात योग्य नाही. पुरुषही खूप बोलतात, गॉसिप आणि राजकारण करतातच. मात्र अनेक बायका बोलतात, एकदाचे तिकडे सांगतात, कुणाला सांगू नकोस म्हणून सिक्रेट (secret) शेअर करतात, तेव्हा त्यांच्या पोटात काही राहत नाही आणि मग पस्तावतात की कसं ग बाई मी चुकून बोलून गेले.. आपल्याला कळालेली माहिती कधी एकदा आपण दुसऱ्यांना सांगतो, असं काही जणींना होऊन जातं. 

 

आपल्याला माहीत असलेली गोष्ट जेव्हा दुसऱ्यांना सांगतात, तेव्हा त्यांना कुठे शांत वाटतं. पण मैत्रिणींनो असं करणं खरंच इतकं गरजेचं असतं का?
1. बऱ्याचदा बोलण्याच्या नादात आपण चार गोष्टी जास्तीच्या सांगून टाकतो तिखट मीठ लावून. अशा गोष्टी खरंतर कधीच कुणाजवळ शेअर करू नयेत. कारण कोणत्या गोष्टीकडे कोण कसं बघेल आणि त्याचा काय अर्थ घेईल, हे सांगता येत नाही. 
2.तुमच्या जवळच्या मैत्रिणीशी, बहिणीशी तुम्ही बोला... त्यांना सगळं सांगा.. पण काल परवा भेटलेल्या व्यक्तीजवळ भडाभड मन मोकळं करणं कधी- कधी तुमच्यासाठीच धोकादायक ठरू शकतं.
३. असं बोलण्यामुळे कदाचित नात्यांमध्ये दुरावाही येऊ शकताे. त्यामुळे स्वत:ला आणि आपल्या भाेवती गुरफटल्या गेलेल्या नात्यांना सांभाळण्यासाठी बोलताना थाेडं सांभाळून. विचार करून बोला.

 

या काही गोष्टी कुणाशी शेअर करू नका.... 
Do not share these things to anyone...

- तुमची एखादी लव्हस्टोरी असेल, तर ती अगदी जवळच्या व्यक्तीशिवाय कुणासोबतच शेअर करू नका.
- तुम्हाला एखादा आजार असेल, तर त्याची माहितीही भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देण्याची काही गरज नाही.
- जर तुम्हाला एखाद्याने त्याच्या आयुष्यातली खूप पर्सनल गोष्ट सांगितली असेल आणि ती कोणालाही तुम्ही सांगू नये, अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असेल, तर ती गोष्ट चुकूनही कुठे बोलू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर दाखवलेला विश्वास तोडू नका.
- तुमचे तुमच्या नवऱ्यासोबत, सासूसोबत, जावेसोबत किंवा घरातल्या कुणाही व्यक्तीसोबत झालेले लहान- मोठे वाद लगेच कोणा घराबाहेरील व्यक्तीला, मैत्रिणीला जाऊन सांगू नका. घरातल्या छोट्या- छोट्या गोष्टी घरातच ठेवा. कारण वादाचे, भांडणाचे कारण छोटे असते, ते लगेच मिटूनही जाते. पण त्या दुसऱ्या व्यक्तीने कान भरले तर विनाकारण मन कलुषित होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो.
- घरातल्या आर्थिक गोष्टी, तुमच्यावरचे कर्ज, नवऱ्याचा आणि तुमचा पगार अशा गोष्टी उगीच इतरांना सांगू नका, कुणी जवळचे योग्य सल्ला देणारे असेल तर गोष्ट वेगळी.

 

Web Title: Any women should not share these things to anyone......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Men on marriage strike : ....म्हणून पुरूषांकडून ट्रेंड होतोय मॅरेज स्ट्राईक हॅशटॅग; जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय - Marathi News | Men on marriage strike : Men on marriage strike against marital rape laws some people laugh say good riddance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून पुरूषांकडून ट्रेंड होतोय 'मॅरेज स्ट्राईक' हॅशटॅग; जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय

Men on marriage strike : काहीजण या संपाला गांभीर्याने घेत आहेत. तर काहींना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेंडवर विनोदी कमेंट्स केल्या आहेत. ...

'तिने' स्वत:ला मुद्दाम होवू दिला कोरोना, लसही घेतलेली नव्हती..आणि शेवटी...  - Marathi News | 'She' allowed herself to be corona She didn't even take the vaccine .. and finally ... Story of folk singer Hana Horka | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'तिने' स्वत:ला मुद्दाम होवू दिला कोरोना, लसही घेतलेली नव्हती..आणि शेवटी... 

तिला आपल्या लोककला पथकात परतून पुन्हा लोकगीते गाण्याची इच्छा होती. पण तिच्याकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा नव्हता. म्हणून तिनं आत्मघातकी पाऊल उचललं. तिच्या या कृतीनं तिनं अख्ख्या जगाला धडा शिकवला.  ...

हिवाळ्यातही चकाकते कोरियन महिलांची त्वचा; कोरियन ब्यूटीचे 6  नियम, करा ट्राय - Marathi News | Korean women's skin shines even in winter; 6 rules of Korean beauty which we may possible to follow! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यातही चकाकते कोरियन महिलांची त्वचा; कोरियन ब्यूटीचे 6  नियम, करा ट्राय

हिवाळ्यात  त्वचा कोरड्या हवामानामुळे खराब होते तसं कोरियन महिलांच्या बाबतीत होत नाही. कडक हिवाळ्यातही कोरियन महिलांची त्वचा चकाकते. मऊ मुलायम दिसते. यामागे  कोरियन महिला पाळत असलेले सौंदर्य नियम आहेत. हिवाळ्यासाठीचे त्या पाळत असलेले सौंदर्य नियम आपल् ...

Happy Married Life Tips : लग्नाआधी प्रत्येक मुला मुलीनं करायला हव्यात या ५ गोष्टी; नात्यातील रोमान्स, विश्वास कधीच होणार नाही कमी - Marathi News | Happy Married Life Tips : Marriage tips for bride and groom should do these things before wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : लग्नाआधी प्रत्येक मुला मुलीनं करायला हव्यात या ५ गोष्टी; नात्यातील रोमान्स, विश्वास कधीच होणार नाही

Happy Married Life Tips : अनेक जोडपी लग्नानंतर होणारे बदल समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी वेळ घेतात. जर त्यांनी हे बदल सकारात्मकतेने घेतले तर काही हरकत नाही अन्यथा वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. ...

7 सवयींमुळे नवरा बायकोचं नातं होतं घट्ट आणि वाढतो रोमान्स; सवयीच चुकीच्या तर.. - Marathi News | 7 Habits strengthen the relationship between husband and wife and increase romance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :7 सवयींमुळे नवरा बायकोचं नातं होतं घट्ट आणि वाढतो रोमान्स; सवयीच चुकीच्या तर..

नवरा बायकोच्या नात्याची गाठ स्वर्गात बांधली जात असली तरी ती प्रत्यक्षात  घट्ट करायची असल्यास नवरा बायकोलाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं , की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक पर ...

रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी... - Marathi News | Young ladies/ women searches these 4 things on google privately at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी...

Google search: गुगलने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये तरूण मुलींना इंटरनेटवर (internet) काय सर्च करायला  आवडतं हे सांगितलं आहे...  ...