Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Relationship > नवरा-बायकोचं नातं मजबूत आणि रोमॅण्टिक करणाऱ्या २ गोष्टी, नात्याची वीण होईल घट्ट कायमची...

नवरा-बायकोचं नातं मजबूत आणि रोमॅण्टिक करणाऱ्या २ गोष्टी, नात्याची वीण होईल घट्ट कायमची...

2 simple rules every couple should follow for a happy marriage : simple habits to strengthen marriage bond : best relationship rules for couples to follow : सुखी संसाराचे २ साधे नियम! नात्यात कधीच येणार नाही दुरावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 15:07 IST2026-04-25T14:55:46+5:302026-04-25T15:07:51+5:30

2 simple rules every couple should follow for a happy marriage : simple habits to strengthen marriage bond : best relationship rules for couples to follow : सुखी संसाराचे २ साधे नियम! नात्यात कधीच येणार नाही दुरावा...

2 simple rules every couple should follow for a happy marriage best relationship rules for couples to follow | नवरा-बायकोचं नातं मजबूत आणि रोमॅण्टिक करणाऱ्या २ गोष्टी, नात्याची वीण होईल घट्ट कायमची...

नवरा-बायकोचं नातं मजबूत आणि रोमॅण्टिक करणाऱ्या २ गोष्टी, नात्याची वीण होईल घट्ट कायमची...

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसून, दोन भिन्न स्वभाव आणि विचारांचा मिलाफ असतो. सुरुवातीचे काही दिवस स्वप्नवत वाटणारे हे नाते कालांतराने संसाराच्या जबाबदाऱ्या आणि रोजच्या धावपळीत कुठेतरी हरवू लागते. अनेकदा आपण मोठ्या सुखांच्या शोधात असताना, नात्यातील त्या छोट्या पण महत्त्वाच्या आनंदी क्षणांकडे दुर्लक्ष करतो. जर आपल्याला आपले वैवाहिक आयुष्य कायम सुखी आणि समृद्ध ठेवायचे असेल, तर केवळ प्रेम असून चालत नाही, तर त्या प्रेमाला समजुतदारपणाची आणि आदराची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे(2 simple rules every couple should follow for a happy marriage).

आजच्या काळात वाढता तणाव आणि संवादाचा अभाव यामुळे पती-पत्नीच्या नात्यात लवकर दुरावा निर्माण होताना दिसतो. संसार म्हटला की कुरबुरी आल्याच, पण या कुरबुरींचे रूपांतर कधी भांडणात (simple habits to strengthen marriage bond) आणि कटुतेत होते, हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाच आहे. लग्नानंतर काही वर्षांनी नात्यातील तो जुना उत्साह का कमी होतो? आणि काही जोडपी वर्षानुवर्षे इतकी आनंदी कशी राहू शकतात? असा प्रश्न आपल्याला कित्येकदा पडतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या सवयी आणि वागणूकही नात्यावर मोठा परिणाम करतात. त्यामुळेच वैवाहिक (best relationship rules for couples to follow) आयुष्य अधिक मजबूत आणि आनंदी ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं ठरतं. वैवाहिक आयुष्य कायम सुखी आणि समृद्ध ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते पाहूयात. 

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी लक्षात ठेवा २ गोष्टी... 

१. इतरांसमोर कधीही भांडू नका :- पती-पत्नीमध्ये छोटी-मोठी भांडणं होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की, तुमचे खाजगी वाद कधीही इतरांसमोर करू नका. मग समोर कुटुंबातील सदस्य असोत, मित्र असोत किंवा इतर कोणीही; तुमच्या नात्यातील गोष्टी फक्त तुमच्या दोघांपर्यंतच मर्यादित राहिल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही इतरांसमोर भांडता, तेव्हा समस्या छोटी असो वा मोठी, त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. समोरचे लोक तुमच्या गोष्टी लक्षात ठेवतात, तुमच्याबद्दलच मत तयार करतात आणि अनेकदा नात्यात हस्तक्षेप करू लागतात. यामुळे वाद सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होऊ शकतो. सोबतच, पती-पत्नी दोघांचाही सन्मान कमी होतो. म्हणूनच, जर एखाद्या गोष्टीचा राग आला, तर त्या वेळी स्वतःला शांत ठेवा आणि योग्य वेळी एकांतात एकमेकांशी बोला. बेडरूममध्ये बसून शांतपणे आपले म्हणणे मांडा. यामुळे तुमच्यातील भांडणं - वाद लवकर संपण्यास मदत होईल.

मुलांना भीती न दाखवता कसं शिकवाल 'गुड टच - बॅड टच'? आईबाबा तुमची जबाबदारी - मुलांशी बोला मोकळेपणाने...

२. वाद न सोडवता कधीही झोपू नका :- पती-पत्नीच्या नात्यात दुरावा तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा त्यांच्यातील भांडणं - वाद वेळीच संपवला जात नाही. जर तुमच्यात काही नाराजी असेल आणि ती न सोडवताच तुम्ही दोघे रात्री झोपलात, तर हळूहळू मनातील अंतर वाढू लागते. वाद कितीही छोटा असो, जर तो रात्री झोपण्यापूर्वी मिटवला नाही, तर दुसऱ्या दिवशी तीच छोटी गोष्ट खूप मोठी वाटू लागते. यासाठीच, शक्यतो झोपण्यापूर्वी संवाद साधून मनातले सगळे विचार एकमेकांसमोर मांडा. अनेकदा एक छोटेस 'सॉरी' तुमच्या मनातील सर्व तक्रारी दूर करू शकते. प्रत्येक गोष्टीवर मोठा निर्णय घेणे गरजेचे नसते; कधीकधी फक्त सॉरी म्हटल्याने जर गोष्ट निवळत असेल, तर बोलून वाद संपवा आणि एकमेकांना मिठी मारून सर्व तक्रारी विसरून जा.

तुमच्या ९ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल-करा ‘हे’ बदल आजच...

Web Title : वैवाहिक जीवन को मजबूत बनाने के लिए: खुशहाल रिश्ते के दो नियम

Web Summary : वैवाहिक जीवन समझ और सम्मान पर टिका होता है। सार्वजनिक रूप से बहस करने से बचें और सोने से पहले विवादों को सुलझा लें। छोटी आदतें वैवाहिक खुशियों पर महत्वपूर्ण प्रभाव डालती हैं, जिससे एक मजबूत और स्थायी बंधन बनता है।

Web Title : Strengthen marriage: Two rules for a happy and romantic relationship.

Web Summary : Marriages thrive on understanding and respect. Avoid arguing publicly and resolve conflicts before bed. Small habits significantly impact marital happiness, fostering a strong and lasting bond.