१ ग्रॅम सोन्यात सुंदर ठसठशीत कानातले, ८ डिझाईन्स-प्रत्येक डिझाईन पाहताक्षणी आवडेल इतकी सुंदर
Updated:February 6, 2026 14:36 IST2026-02-05T18:30:52+5:302026-02-06T14:36:17+5:30

लग्नसराई निमित्ताने नविन कानातले घ्यायचे असतील तर सध्या ट्रेंडिंग असणारे कानातल्यांचे काही युनिक प्रकार पाहा...(1 gram gold earrings designs)
सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे सोन्याची हौस आपल्या बजेटमध्ये भागवायची असेल तर १ ग्रॅम सोन्याचे दागिने हा उत्तम पर्याय ठरू शकतो (latest patterns of gold earrings in 1 gram). त्याच प्रकारातले हे काही कानातले पाहा..(unique designs of gold earrings in 1 gram)
जर तुम्ही लेहेंगा, घागरा घालणार असाल तर त्यावर असे कानातले छान दिसतात.
पारंपरिक काठपदर साडी नेसणार असाल तर असे थोडा ट्रॅडिशनल टच देणारे टॉप्स घालायला हवेत. यामध्येही कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या मिळत आहेत.
मोत्याच्या कानातल्यांचं तर सौंदर्यच वेगळं असतं. शिवाय हे कानातले प्रत्येक वयोगटातल्या महिलेला शोभून दिसतात. त्यामुळे असा एखादा कानातल्यांचा जोड आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा.
खड्याचे कानातलेही कोणत्याही पेहरावावर आणि कोणत्याही कार्यक्रमात शोभून दिसतात. त्यामुळे असे कानातलेही घेऊन ठेवा.
हे एक सुंदर डिझाईन.. अगदी बघताक्षणीच आवडणारं आणि अगदी आपल्या बजेटमध्ये बसणारं
थोडे लोंबते कानातले आवडत असतील तर अशा पद्धतीचेही बरेच डिझाईन्स बाजारात मिळू शकतात. शिवाय तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.