Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांच्या आरोग्यासाठी चहा का आहे घातक? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं कारण

लहान मुलांच्या आरोग्यासाठी चहा का आहे घातक? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं कारण

Tea side effects for children : पालक विचार करतात की, एक-दोन चमचे चहा दिलाच तर काय होणार...म्हणून नेहमीच त्यांना चहा दिला जातो. पण लहान मुलांना चहा देणं त्यांच्या तब्येतीसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 09:42 IST2026-05-16T09:40:07+5:302026-05-16T09:42:03+5:30

Tea side effects for children : पालक विचार करतात की, एक-दोन चमचे चहा दिलाच तर काय होणार...म्हणून नेहमीच त्यांना चहा दिला जातो. पण लहान मुलांना चहा देणं त्यांच्या तब्येतीसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

Why is tea harmful to children's health? Doctors explain the reason | लहान मुलांच्या आरोग्यासाठी चहा का आहे घातक? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं कारण

लहान मुलांच्या आरोग्यासाठी चहा का आहे घातक? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं कारण

Tea side effects for children : सकाळी झोपेतून उठल्या उठल्या गरमागरम चहा पिण्याची सवय भारतात कोट्यावधी लोकांना आहे. म्हणजे इतकी सवय की, चहाशिवाय त्यांचा दिवसच खऱ्या अर्थाने उजाडत नाही. बरं आपण घरात चहा पित असताना आपली लहाने मुले सुद्धा चहासाठी हट्ट करतात. आपल्याला माहीत आहेच की, लहान मुले मोठ्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. पालक विचार करतात की, एक-दोन चमचे चहा दिलाच तर काय होणार...म्हणून नेहमीच त्यांना चहा दिला जातो. पण लहान मुलांना चहा देणं त्यांच्या तब्येतीसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

लहान मुलांना चहा दिल्याने काय नुकसान होतं याबाबत अलिकडेच बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपा अग्रवाल यांनी सांगितले की, एका वर्षाच्या बाळाला नियमित लसीकरणासाठी आणले असता त्या बाळाचा रंग खूप फिकट दिसत होता आणि ते अशक्त दिसत होतं. पालकांशी बोलताना समजले की, ते बाळाला रोज थोडा चहा देत होते. त्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, लहान मुलांना चहा देणे टाळले पाहिजे.

लहान मुलांना चहा देण्याचं नुकसान

मेंदू आणि झोपेवर परिणाम

चहामध्ये कॅफिन असतं. लहान मुलांचा मेंदू अजून विकसित होत असतो, त्यामुळे कॅफिनमुळे त्यांची झोप बिघडू शकते. काही मुलांमध्ये चंचलपणा वाढणे आणि हृदयाचे ठोके वेगाने धडकणे असे परिणामही दिसू शकतात.

आयर्नची कमतरता आणि अॅनिमियाचा धोका

चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. हा घटक शरीराला अन्नातून आयर्न शोषून घेण्यापासून रोखतो. त्यामुळे मुलांमध्ये आयर्नची कमतरता निर्माण होऊन अॅनिमियाचा धोका वाढू शकतो.

पचनाच्या समस्या वाढू शकतात

लहान मुलांचं पोट अतिशय संवेदनशील असतं. चहातील कॅफिन आणि टॅनिनमुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

भूक कमी होऊ शकते

कॅफिनमुळे पोट भरल्यासारखे वाटतं. त्यामुळे मुलांची भूक कमी होते आणि ते पोटभर जेवत नाहीत. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.

पालकांनी काय करावे?

डॉक्टरांच्या मते, “फक्त एक चमचा चहा” सुद्धा मुलांसाठी योग्य नाही. जर मूल चहाची मागणी करत असेल तर त्याऐवजी पाणी, दूध किंवा हेल्दी स्नॅक्स द्यावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुले मोठ्यांची नक्कल करतात. त्यामुळे पालकांनी स्वतःच्या सवयींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title : बच्चों के स्वास्थ्य के लिए चाय क्यों है हानिकारक: डॉक्टरों ने बताए कारण

Web Summary : चाय में मौजूद कैफीन और टैनिन बच्चों में आयरन के अवशोषण को बाधित करते हैं, नींद में खलल डालते हैं और पाचन संबंधी समस्याएं पैदा करते हैं। डॉक्टर बच्चों को चाय न देने की सलाह देते हैं, इसके बजाय दूध, पानी या स्वस्थ नाश्ता देने का सुझाव देते हैं। माता-पिता को अपनी आदतों पर भी ध्यान देना चाहिए।

Web Title : Tea is harmful for children's health: Doctors explain the reasons.

Web Summary : Tea's caffeine and tannin content hinder iron absorption, harm sleep, and cause digestive issues in children. Doctors advise against giving tea to children, suggesting milk, water, or healthy snacks instead. Parents should also monitor their own habits.