Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > झोपेत असताना अचानक उंचावरून पडत असल्यासारखं का वाटतं? काय आहे या अजब भासाचं कारण...

झोपेत असताना अचानक उंचावरून पडत असल्यासारखं का वाटतं? काय आहे या अजब भासाचं कारण...

What is Hypnic Jerk : चांगली झोप लागणार असते, तेव्हा शरीराला अचानक असे झटके का येतात? चला समजून घेऊया की, आपला मेंदू आपल्यासोबत असा खेळ का खेळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:04 IST2026-04-29T09:04:10+5:302026-04-29T09:04:40+5:30

What is Hypnic Jerk : चांगली झोप लागणार असते, तेव्हा शरीराला अचानक असे झटके का येतात? चला समजून घेऊया की, आपला मेंदू आपल्यासोबत असा खेळ का खेळतो.

Why feel like falling in sleep science of hypnic jerk | झोपेत असताना अचानक उंचावरून पडत असल्यासारखं का वाटतं? काय आहे या अजब भासाचं कारण...

झोपेत असताना अचानक उंचावरून पडत असल्यासारखं का वाटतं? काय आहे या अजब भासाचं कारण...

What is Hypnic Jerk : झोपेची वेळ ही फारच महत्वाची आणि वेगळा अनुभव देणारी असते. म्हणजे काही लोकांना बेडवर पडल्या पडल्या झोप लागते, तर अनेकांना काही केल्या लवकर झोप लागत नाही. काही लोकांना तर फारच वेगळे अनुभव येतात. जसे की, बऱ्याच लोकांना झोप लागणार इतक्यात पायऱ्यांवरून घसरल्याचा भास होतो किंवा उंचावरून खाली पडल्याचा. आपल्या सोबतही असं कधी झालंय का? झालंही असेल तर घाबरण्याचं कारण नाही. ही फारच कॉमन बाब आहे, जी अनेकांसोबत होते. मेडिकल सायन्समध्ये या अजब स्थितीला हायप्निक जर्क म्हणजे स्लीप ट्विच असं म्हटलं जातं. पण खरा प्रश्न हा आहे की, चांगली झोप लागणार असते, तेव्हा शरीराला अचानक असे झटके का येतात? चला समजून घेऊया की, आपला मेंदू आपल्यासोबत असा खेळ का खेळतो.

काय आहे हायप्निक जर्क? 

हायप्निक जर्क स्नायूंचा एक इनवॉल्यूएंटरी ट्विच आहे, जो शरीर झोपेच्या स्थितीत जाताना होतो. हा झटका अनेकदा काही सेकंदाचा असतो, पण हा इतका जबर असतो की, व्यक्तीला धक्का बसतो आणि ती खडबडून जागी होते. अनेकदा यासोबत खाली पडण्याचं स्वप्न किंवा विजेचा शॉक लागल्याचाही भास होतो.

काय येतो असा झटका?

शरीर आणि मेंदूतील ताळमेळ बिघडणं - खरंतर असं होण्यामागचं एक फिक्स असं कारण समोर येऊ शकलेलं नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मेंदू आणि शरीरातील चुकीचा ताळमेळ जसे की, आपण झोपण्याच्या तयारीत असतो, आपलं शरीर, स्नायू रिलॅक्स होऊ लागतात. कधी-कधी मेंदू या आरामाच्या स्थितीला खाली पडणं समजतो. बचावासाठी मेंदू स्नायूंना लगेच आकुंचन पावण्याचा संकेत देतो, ज्यामुळे आपल्याला झटका बसल्यासारखं जाणवतं.

तणाव - जर आपला मेंदू दिवसभर तणावात राहिला असेल, तर तो झोपण्यावेळीही शांत राहत नाही. हाय अलर्ट मोडवर राहिल्याने नर्वस सिस्टीम मिसफायर करू शकते.

जास्त कॅफीन - झोपण्याआधी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पित असाल तर मेंदू अॅक्टिव होतो, ज्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो आणि झटका लागण्याचा धोका वाढतो.

थकवा आणि कमी झोप - जेव्हा आपण फार जास्त थकलेले असतो किंवा अनेक दिवसांपासून बरोबर झोपले नसाल, तर शरीर लवकर गाढ झोपेत जाण्याचा प्रयत्न करतं. ज्यामुळेही असा झटका येऊ शकतो.

ही गंभीर समस्या आहे का?

जास्तीत जास्त केसेसमध्ये हायप्निक जर्क पूर्णपणे सामान्य आणि सुरक्षित आहे. हा कोणत्याही गंभीर आजाराचा संकेत नाही. जर झटके पुन्हा पुन्हा येत असतील, यामुळे झोप पूर्ण होत नसेल किंवा झोपायची भीती वाटत असेल तर चिंतेचा विषय असू शकतो.

Web Title : सोते समय गिरने जैसा क्यों लगता है? जानिए कारण।

Web Summary : सोते समय अचानक झटके लगना आम है, जिसे हाइप्निक जर्क कहते हैं। यह मस्तिष्क के गलत संकेतों, तनाव, कैफीन या थकान के कारण होता है। आमतौर पर हानिरहित, लेकिन बार-बार होने से नींद में खलल हो तो ध्यान दें।

Web Title : Why Do We Feel Like Falling When Falling Asleep?

Web Summary : Hypnic jerks, sudden muscle twitches while falling asleep, are common. They're often due to mismatched brain signals, stress, caffeine, or fatigue. Usually harmless, frequent occurrences disrupting sleep warrant attention.