Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > कुणाच्या मयताला गेल्यास, गंभीर मीटिंगमध्ये किंवा ओरडा खाताना अचानक हसू येतं, इंटरेस्टिंग आहे याचं कारण...

कुणाच्या मयताला गेल्यास, गंभीर मीटिंगमध्ये किंवा ओरडा खाताना अचानक हसू येतं, इंटरेस्टिंग आहे याचं कारण...

Nervous Laughter : सायन्सच्या भाषेत याला नर्व्हस लाफ्टर म्हणजे घाबरल्यामुळे येणारं हसू म्हणतात. ही स्थिती नेमकी काय असते हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:53 IST2026-04-24T09:52:09+5:302026-04-24T09:53:57+5:30

Nervous Laughter : सायन्सच्या भाषेत याला नर्व्हस लाफ्टर म्हणजे घाबरल्यामुळे येणारं हसू म्हणतात. ही स्थिती नेमकी काय असते हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

Why does our brain make us laugh in serious situations, know the reason | कुणाच्या मयताला गेल्यास, गंभीर मीटिंगमध्ये किंवा ओरडा खाताना अचानक हसू येतं, इंटरेस्टिंग आहे याचं कारण...

कुणाच्या मयताला गेल्यास, गंभीर मीटिंगमध्ये किंवा ओरडा खाताना अचानक हसू येतं, इंटरेस्टिंग आहे याचं कारण...

Nervous Laughter : अनेकदा काही लोकांसोबत फारच विचित्र गोष्टी घडत असतात. म्हणजे कधी कधी तर एखाद्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो आणि ती गोष्ट नकळत आपल्यासोबत घडून जाते. आपण पाहिलं असेल की, एखाद्या सिरीअस मीटिंगमध्ये बसलेले असता, आपल्याला कुणीतरी ओरडत असतं किंवा एखाद्या दु:खद वातावरणात जसे की, अंत्यसंस्काराला गेले असाल तेव्हा अचानक हसू येतं. आपल्यासोबतही असं कधीना कधी झालं असेल किंवा कुणासोबत तरी असं होताना पाहिलं असेलच. कितीही रोखा पण यावेळी आलेलं हसू काही कंट्रोल होत नाही. सायन्सच्या भाषेत याला नर्व्हस लाफ्टर म्हणजे घाबरल्यामुळे येणारं हसू म्हणतात. ही स्थिती नेमकी काय असते हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

नर्व्हस लाफ्टर काय आहे?

सायकॉलॉजीमध्ये असं होण्याला 'असंगत भावना' म्हणजे इंकॉन्ग्रस इमोशन मानलं जातं. म्हणजे ही एक अशी कंडिशन आहे ज्यात कुणी अशा ठिकाणी भावना व्यक्त करतात, जिथे त्या व्यक्त करण्याची अजिबात गरज नसते. म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या भावना व्यक्त होणे. 

नर्व्हस लाफ्टर एक असं इमोशन आहे, ज्यात आनंद किंवा गंमतीने येणारं हसू नसतं, ते आपल्या शरीराचं एक डिफेन्स मेकॅनिज्म आहे. जेव्हा आपलं मन किंवा मेंदू एखाद्या गोष्टीमुळे असहज होतो, घाबरलेला असतो किंवा तणावात असतो, तेव्हा आपलं शरीर हा मानसिक दबाव रिलीज करण्यासाठी हसण्याचा सहारा घेतं.

घाबरल्यावर किंवा भितीत हसू का येतं?

व्यक्तीच्या या अजब वागण्यावर संशोधक अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहे. न्यूरोसायंटिस्टचं मत आहे की, मनुष्याच्या विकासाच्या सुरूवातीच्या काळात हसण्याचा जन्म यासाटी झाला होता, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना संकेत दिला जावा की, इथे कोणताही धोका नाही. सगळे सुरक्षित आहे. त्यामुळे जेव्हा आपण फार जास्त तणावात असतो किंवा वेदनेत असतो, तेव्हा आपला मेंदू त्या भीती आणि वेदनेपासून फोकस भटकवण्यासाठी स्वत:ला पॉझिटिव्ह सिग्नल देण्याचा प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न हसण्याच्या स्वरूपात बाहेर येतो.

आणखी एक कारण...

गंभीर वातावरणात हसण्याबाबत एका संशोधनातून समोर आलंय की, गंभीर वातावरणात हसू येण्याचं आणखी एक कारण म्हणजे भावनांचा ओव्हरफ्लो होणंही आहे. ज्याप्रमाणे एखाद्या क्यूट लेकराला बघून त्याचे गालगुच्छे घेण्याचा मन होतं, तसंच जेव्हा मेंदू फार जास्त तणावात किंवा चिंतेत असतो, तेव्हा मेंदू स्वत:ला बॅलन्स करण्यासाठी उलटी प्रतिक्रिया देतो. जसे की, रडण्याच्या ठिकाणी हसणे.

हसू कसं कंट्रोल कराल? 

कधी कधी नर्व्हस लाफ्टर येणं कॉमन आहे. पण यामुळे जर पुन्हा पुन्हा ऑफिस किंवा लोकांमध्ये लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागत असेल, तर हे हसणं कंट्रोल केलं पाहिजे. जेव्हाही आपल्याला चुकीच्या वेळी आणि ठिकाणी हसू येत असेल तर डीप ब्रीदिंग करा. रोज काही मिनिटे मेडिटेशन केल्यास मन स्थिर राहतं. यामुळे आपण भावनांवर कंट्रोल करणं शिकाल. आवडीच्या गोष्टी करा.

Web Title : अनुचित समय पर हंसी क्यों आती है: नर्वस हंसी के पीछे का विज्ञान

Web Summary : घबराहट में हंसी तनाव या অস্বস্তি से उत्पन्न एक रक्षा तंत्र है। यह तनावपूर्ण स्थितियों के दौरान संतुलन हासिल करने, सुरक्षा का संकेत देने या भारी भावनाओं को जारी करने का मस्तिष्क का प्रयास है। गहरी सांस लेने और ध्यान से इसे नियंत्रित करने में मदद मिल सकती है।

Web Title : Why We Laugh at Inappropriate Times: The Science Behind Nervous Laughter

Web Summary : Nervous laughter, a defense mechanism, arises from stress or discomfort. It's the brain's attempt to regain balance during tense situations, signaling safety or releasing overwhelming emotions. Deep breathing and meditation can help control it.