Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > एंझायटी आणि डिप्रेशनला एकच समजण्याची करू नका चूक, पाहा दोन्ही स्थितींमध्ये काय असतो फरक

एंझायटी आणि डिप्रेशनला एकच समजण्याची करू नका चूक, पाहा दोन्ही स्थितींमध्ये काय असतो फरक

Anxiety and Depression : एंझायटी आणि डिप्रेशनमध्ये काय फरक आहे हे लोकांना माहीत नसतं. जर हेच माहीत नसेल तर योग्य तो उपायही करता येणार नाही. अशात समस्या अधिक वाढेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:50 IST2026-04-22T11:49:20+5:302026-04-22T11:50:39+5:30

Anxiety and Depression : एंझायटी आणि डिप्रेशनमध्ये काय फरक आहे हे लोकांना माहीत नसतं. जर हेच माहीत नसेल तर योग्य तो उपायही करता येणार नाही. अशात समस्या अधिक वाढेल.

What is the difference between anxiety and depression? | एंझायटी आणि डिप्रेशनला एकच समजण्याची करू नका चूक, पाहा दोन्ही स्थितींमध्ये काय असतो फरक

एंझायटी आणि डिप्रेशनला एकच समजण्याची करू नका चूक, पाहा दोन्ही स्थितींमध्ये काय असतो फरक

Anxiety and Depression : धावपळीचं जीवन, कामाचा वाढता ताण, स्पर्धा, कुटुंबाच्या वाढत्या जबाबदारी यामुळे हल्ली जास्तीत जास्त लोकांना मानसिक आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लाखो लोक स्ट्रेस, डिप्रेशन या गोष्टींचे शिकार झाले आहेत. पण यात गंमत अशी आहे की, मानसिक आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांमधील फरकच लोकांना माहीत नसतो. एंझायटी आणि डिप्रेशनमध्ये काय फरक आहे हे लोकांना माहीत नसतं. जर हेच माहीत नसेल तर योग्य तो उपायही करता येणार नाही. अशात समस्या अधिक वाढेल. त्यामुळे आज आपण एंझायटी आणि डिप्रेशन या दोन्हीतील फरक समजून घेणार आहोत. जेणेकरून योग्य तो उपाय करता येईल.

एंझायटी काय आहे? 

एंझायटी एक मानसिक आजाराचा प्रकार आहे. यात लोक भविष्यातील अनिश्चिततेवरून चिंतेत आणि भीतीत राहतात. या स्थितीत लोकांमध्ये सतत अस्वस्थता राहते. हृदयाचे ठोके वाढणे, सतत घाम येणे आणि झोप न लागणे अशा समस्या सतत होत राहतात. अनेकदा तर काही समस्या नसतानाही एंझायटी वाटू लागते. एंझायटीमुळे रोजची काम करण्यातही अडथळा निर्माण होतो.

डिप्रेशन काय आहे? 

एक्सपर्ट सांगतात की, व्यक्ती जेव्हा जास्त काळ निराश असेल किंवा उदास राहत असेल तर या स्थितीला डिप्रेशन म्हटलं जातं. या स्थितीत व्यक्तीला कशातही रस वाटत नाही. कोणत्याही कामात त्याचं मन लागत नाही. आत्मविश्वास कमी होतो. अनेक नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. डिप्रेशनमुळे विचार, वागणं आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडू लागतो.

डिप्रेशन आणि एंझायटीमध्ये फरक

एंझायटी आणि डिप्रेशनमध्ये फरक हा आहे की, एंझायटीमध्ये व्यक्ती भविष्याची चिंता करू लागतो. पुढे काय होईल, कसं होईल, कसं मॅनेज करायचं याचा सतत विचार करत असतो. तर डिप्रेशनमध्ये व्यक्ती आपल्या वर्तमानातील म्हणजे सध्या जगत असलेल्या जीवनाबाबत विचारत असतो. एंझायटीमध्ये शरीर हायपर अॅक्टिव होतं. तेच डिप्रेशनमध्ये व्यक्तीची एनर्जी कमी होऊ लागते.

जास्त धोकादायक काय?

एक्सपर्ट सांगतात की, दोन्ही स्थितीत खतरनाक असतात. डिप्रेशनला जास्त गंभीर मानलं जातं. कारण या स्थितीत व्यक्तीच्या मनात फार जास्त वाईट विचार येतात. काही केसेसमध्ये व्यक्ती आत्महत्येचाही विचार करू लागतो. एंझायटीमध्ये जास्त काळ राहाल तर हृदयरोग, झोपेची समस्या, मानसिक थरका अशा गोष्टी होतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी थेरपी, काउन्सेलिंग आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज असते.

Web Title : चिंता बनाम अवसाद: बेहतर मानसिक स्वास्थ्य के लिए मुख्य अंतर जानें

Web Summary : चिंता में भविष्य की चिंताएं शामिल हैं, जिससे बेचैनी और शारीरिक लक्षण होते हैं। अवसाद वर्तमान निराशा से उत्पन्न होता है, जिससे उदासीनता और कम ऊर्जा होती है। दोनों गंभीर हैं, लेकिन आत्महत्या के विचारों के कारण अवसाद अधिक खतरनाक हो सकता है। स्वस्थ होने के लिए थेरेपी और जीवनशैली में बदलाव महत्वपूर्ण हैं।

Web Title : Anxiety vs. Depression: Know the Key Differences for Better Mental Health

Web Summary : Anxiety involves future worries, causing restlessness and physical symptoms. Depression stems from present despair, leading to disinterest and low energy. Both are serious, but depression can be more dangerous due to suicidal thoughts. Therapy and lifestyle changes are crucial for recovery.